पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स राहणार क्वारंटाइन!
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 5 जून 2024 ला अंतराळात गेले होते. त्यांचा अंतराळ प्रवास आठ दिवसांचा होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे सुनीता विल्यमस आणि बुच विल्मोर सुमारे नऊ महिने अंतराळात अडकून पडले होते. त्यानंतर अखेर आज पहाटे सुनीता विल्यमस आणि त्यांचे सहकारी पृथ्वीवर सुखरूप परतले. स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलवरून फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांनी यशस्वी लँडिंग केले. मात्र अंतराळात जास्त वेळ घालवल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुनीता विल्यम्स अंतराळातून परत आल्यानंतर त्यांना कोणत्या आजाराची लागण होऊ शकते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
अंतराळात सुनीता विल्यम्स कशा करत होत्या टॉयलेटचा वापर, Astronot कशा प्रकारे करतात मलत्याग आणि लघवी
सुनीता विल्यम्स आज पहाटे पृथ्वीवर परतल्या आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांची हाडे आणि शरीरातील स्नायूंना गंभीर इजा होण्याची शक्यता आहे. आयएसएसमध्ये बसणारे अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये तरंगतात, ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. शरीरालानेहमी गुरुत्वाकर्षणाच्या विरोधामध्ये काम करावे लागते, यामुळे आपल्या शरीरातील हाडांचा व्यायाम होतो. पण अंतराळात गेल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते, स्नायूंची ताकद आणि हाडांची घनता पूर्णपणे कमी होते, ज्याचा परिणाम शरीराच्या वजनावर होतो.
अंतराळात जास्त वेळ राहिल्यामुळे हृदयावर गंभीर परिणाम होतो. पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण रक्त, पाणी आणि द्रव पदार्थ खाली खेचून घेतात. ज्यामुळे संपूर्ण शरीराची स्थिती विस्कळीत होऊन जाते. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणा नसल्यामुळे द्रवपदार्थ वरच्या दिशेने सरकतात, ज्यामुळे चेहऱ्यावर सूज येणे, नाक बंद होणे, डोक्यात दाब वाढणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात. तसेच शरीराचा संपूर्ण शरीराचा खालील भाग कमकुवत होऊन जातो. या समस्येला “फुगीर-डोके पक्षी-पाय सिंड्रोम” म्हणतात.
किडनी आतून सडल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ भयानक लक्षणे, वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला
अंतराळात जास्त वेळ राहिल्यामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अंतराळ आणि पृथ्वीवरील वातावरण अतिशय वेगळे आहे. या वातावरणात शरीराचा समतोल राखणं अतिशय कठीण होऊन जाते. अंतराळात अधिककाळ राहिल्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ झोप न आल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. अंतराळ मोहिमांमुळे अंतराळवीरांच्या विचार करण्याची क्षमता, प्रतिक्रिया वेळ आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते.