पोटातील अल्सर झाल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे
सतत तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींमुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. मात्र हल्ली पचनक्रियेसंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात दुखणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेक लोक या छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. मात्र पुढे जाऊन याचं छोट्या समस्या मोठ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
पोटातील अल्सरच्या रुग्णांमध्ये हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पोटातील अल्सर झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. पोटात अल्सर झाल्यानंतर लहान आतड्याच्या अस्तरात जखम तयार होते. ज्यामुळे पोट दुखी, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या समस्या वाढू लागल्यास आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आज आम्ही तुम्हाला पोटातील अल्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागल्यानंतर अचानक वजन कमी होऊ लागते. वजन कमी झाल्यानंतर शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. पोटात अल्सर झाल्यानंतर अचानक वजन कमी होऊ लागते. शिवाय या आजारामुळे भूक कमी होऊन जाते. ज्याचा परिणाम वजनावर होतो. त्यामुळे पोटासंबंधित समस्या जाणवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
पोटात अल्सर झाल्यानंतर पोटामध्ये असतात मळमळ होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे कोणताही पदार्थ खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. काही खाल्यानंतर सुद्धा वारंवार उलटी झाल्यासारखे वाटते. पोटात मळमळ होत असल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
अल्सर झाल्यानंतर ओटी पोटात दुखणे, पोटात दुखणे इत्यादी लक्षणे जाणवू लागतात. मात्र काही लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. तसेच योग्य डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
अपचन किंवा ऍसिडिटीची समस्या वारंवार उद्भवू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. जेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्यानंतर सतत ढेकर येण्यास सुरुवात झाल्यानंतर तपासणी करून घ्यावी.