चहा ठरतोय जास्त धोकादायक, कसा ते जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
‘लोक म्हणतात की दारू घरे उद्ध्वस्त करते, मी म्हणतो की दारूने फक्त काही घरे उध्वस्त केली आहेत पण चहाने प्रत्येक घर, प्रत्येक व्यक्ती उध्वस्त केली आहे’ हे वाक्य वाचून तुम्हाला घाम फुटला ना? पण हे विधान आमचं नाही तर हे योगाचार्य डॉ. विश्वदेव यांनी म्हटले आहे. योगाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, चहा हा दारूपेक्षा जास्त विषारी आहे.
योगाचार्यांनी म्हटले आहे की भारतात दारूच्या व्यसनाधीन लोकांपेक्षा जास्त चहाचे व्यसनी आहेत, जे सकाळी उठताच त्यांच्या शरीरात चहा नावाचे विष ओतत आहेत. चहाचे एकमेव काम म्हणजे पोटात गॅस आणि आम्लता निर्माण करणे आणि पचनसंस्था बिघडवणे. डॉक्टरांनी चहा पिण्याचे तोटे सांगितले आहेत आणि चहा दारूपेक्षा कसा जास्त विषारी आहे हे स्पष्ट केले आहे, आपण या लेखातून जाणून घेऊया आणि तुम्हीही चहाच्या आहारी गेला असाल तर हे नक्की वाचा (फोटो सौजन्य – iStock)
पचनसंस्थेवर होतो मोठा परिणाम
चहाचा सर्वाधिक प्रभाव पचनक्रियेवर पडतो
डॉक्टरांनी सांगितले की चहा हे सर्वात धोकादायक पेय आहे. त्याच्या सेवनाचा पचनसंस्थेवर सर्वात जास्त विपरीत परिणाम होतो. जर तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर चहा पीत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही तुमची पचनक्रिया बिघडवत आहात. चहा पिण्यामुळे गॅस आणि अॅसिडिटी होते आणि त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जगाचे आजार होऊ शकतात.
लठ्ठपणाचा धोका
सतत चहा पिण्याने लठ्ठपणा वाढतो
डॉक्टरांनी सांगितले की चहा पिऊन झाल्यानंतर गॅस-अॅसिडिटीची समस्या निर्माण होते. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, चहा तुम्ही पिता पण नंतर सतत तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत राहतो आणि हाच त्रास तुम्हाला लठ्ठपणाचा धोका निर्माण करू शकते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि लठ्ठपणा टाळायचा असेल तर चहा पिणे टाळणे उत्तम ठरेल.
रक्तदाब आणि डोकेदुखीची समस्या
उच्च रक्तदाबाचा त्रास चहामुळे वाढू शकतो
वाढत्या गॅस आणि आम्लतेमुळे तुम्हाला उच्च रक्तदाब आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ब्लड प्रेशर रुग्णांनी चहा पिणे टाळावे. सतत चहा पित असाल तर त्याचे प्रमाण तरी किमान करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्ती चहाशिवाय जगू शकत नाहीत त्यांनी समजून घ्यावे की,त्यांना चहाचे व्यसन लागले आहे आणि हे लवकर कमी करण्याची गरज आहे.
कोलेस्ट्रॉलचा – हार्ट अटॅक
हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो
चहा पिण्यामुळे गॅस आणि अॅसिडिटी होते आणि त्यामुळे तुमचे कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढू शकते. कोलेस्टेरॉल ही एक धोकादायक समस्या आहे ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. आपले हृदय चांगले राखायचे असेल तर शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली राखणे गरजेचे आहे आणि यासाठी तुम्ही चहाचे सेवन अति प्रमाणात करू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
ब्रेन हॅमरेज
ब्रेन हॅमरेजचा त्रास होऊ शकतो
डॉक्टरांनी सांगितले की गॅस-अॅसिडिटीमुळे तुम्हाला ब्रेन हेमरेज आणि पॅरालिसिसचा धोकादेखील असू शकतो. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही चहा सोडून द्यावा. बरेचदा तुम्ही जेव्हा पॅरालिसिसच्या केसच्या बाबतीत रिसर्च कराल तेव्हा या व्यक्तींनी जास्त चहाचे सेवन केल्याचेही आढळून येते. त्यामुळे चहा पिणे सहसा टाळावे. डॉक्टर म्हणाले की चहा पिऊन तुम्ही फक्त तुमचे आरोग्यच बिघडवत नाही तर तुमच्या पाहुण्यांचे आरोग्यही बिघडवत आहात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.