(फोटो सौजन्य: istock)
भारतात हृदयविकाराच्या रुगणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा एक चिंतेच विषय आहे कारण दरवर्षी हजारो लोक यामुळे आपले प्राण गमावतात. वेळेवर उपचार न मिळणे हे यामागचे मुख्य कारण! अनेकदा हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो मात्र वेळेवर उपचार न घेतल्याचे लोकांचा विनाकारण जीव जातो. वयोवृद्धांनाच काय तर तरुणांमध्येही हा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत, हृदयविकाराच्या गोल्डन अवरची भूमिका खूप महत्त्वाची बनते.
अनेकांना गोल्डन हवर काय ते ठाऊक नाही. डॉ. वैभव मिश्रा (वरिष्ठ संचालक – कार्डियाक सायन्सेस, मॅक्स हॉस्पिटल, नवी दिल्ली) यांनी सांगितले की, हा पहिला तास असतो जेव्हा हृदयविकाराची लक्षणे पहिल्यांदाच जाणवू किंवा दिसू लागतात. अशा परिस्थितीत, जर रुग्णाला या मौल्यवान तासात योग्य वैद्यकीय मदत मिळाली, तर त्याचे प्राण वाचण्याची शक्यता खूप वाढते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हृदयविकाराची लक्षणे
हृदयविकाराच्या वेळी, आपले शरीर काही विशिष्ट सिग्नल देते, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करणे आपल्या जीवावर बेतू शकते. अशात वेळीच या लक्षणांना ओळखा आणि जीवावर बेतणारा हा धोका वेळीच टाका
छातीत तीव्र वेदना होणे
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपल्या छातीत तीव्र ही वेदना जाणवत असतात. या वेदना बहुतेकदा छातीच्या मध्यभागी होते आणि डाव्या हातापर्यंत, मानेत किंवा जबड्यात पसरू शकतात.
श्वास घेण्यास त्रास होणे
यात अनेकदा असेही होते की, तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो अथवा गुदमरल्यासारखे वाटू लागते.
खूप घाम येणे
अनेकदा असे घडते की आपल्याला अचानक गरम होत नसतानाही घाम येऊ लागतो. याकडे दुर्लक्षित करणे तुमच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे असे होत असल्यास वेळीच यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
चिंता आणि थकवा
अचानक खूप चिंताग्रस्त होणे आणि काहीही न करता खूप अचानक थकवा जाणवते हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे संकेत ठरू शकते.
दुर्दैवाने, आपल्या देशात, बरेचदा लोक या लक्षणांकडे गॅस किंवा सामान्य अशक्तपणा समजून दुर्लक्ष केले जाते आणि याच विलंबामुळे स्थिती अधिक गंभीर होते आणि लोक जीवाला मुकतात.
डाळ खाण्याची 5 हजार जुनी पद्धत, कधीच वाढणार नाही शुगर; नसांमधून बाहेर फेकेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल
त्वरित कारवाई करणे अत्यंत महत्वाचे आहे
या गंभीर समस्येला तोंड देण्याचा एकाच मार्ग आहे आणि तो म्हणजे वेळेवर उपचार घेणे. तुम्हालाही हृदयविकाराची लक्षणे जाणवत असतील तर यांना दुर्लक्षित करू नका आणि वेळीच यावर योग्य ते उपचार घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर वेळीच जवळील रुग्णालयाला भेट द्या आणि यावर योग्य ते उपचार करा. सीपीआर ही एक जीव वाचवणारी पद्धत आहे जी हृदयविकाराच्या झटक्याच्या बाबतीत रुग्णाच्या श्वासोच्छवासाचे आणि हृदयाचे ठोके चालू ठेवण्यास मदत करू शकते. अधिकाधिक लोकांनी याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.
जागरूकता होणे महत्त्वाचे
सरकार, आरोग्य संस्था आणि आपण सर्वांनी मिळून हृदयविकार आणि ‘सुवर्णकाळ’ याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रत्येकाला या संकटाचे गांभीर्य आणि योग्य वेळी योग्य पावले उचलण्याचे महत्त्व समजेल तेव्हाच आपण या वाढत्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवू शकू आणि मौल्यवान जीव वाचवू शकू. लक्षात ठेवा, हृदयविकाराच्या झटक्यात प्रत्येक मिनिट मौल्यवान असतो. योग्य वेळी योग्य पावले उचलून आपण अक्षरशः एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.