(फोटो सौजन्य: Pinterest)
दुसऱ्या शतकात ईसापूर्वमध्ये जेव्हा रोमन इटलीला जिंकले तेव्हा तिथे आर्थिक वाढ झाली आणि व्यापाराचे नवे मार्ग खुले झाले. यानंतर रोमच्या राजधानीत अनेक प्रकारची नवीन कृषी उत्पादने येऊ लागली आणि रोमन पदार्थांमध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांचा वापर केला जाऊ लागला. रोमन स्वयंपाकघराशी संबंधित ‘दे रे कोसिनारिया’ या पुस्तकात ‘पोलस’ नावाच्या सूपचा उल्लेख करण्यात आला आहे. हा सूप एक प्रकारचे धान्य, चणे, बीन्स, कांदा, लसूण, चरबी आणि हिरव्या भाज्यांपासून तयार केला जातो. हा सूप मिनेस्ट्रोन सूपचे सुरुवातीचे रूप होते. याची कहाणी फार रंजक असून आज आपण ती सविस्तरपणे या लेखात जाणून घेणार आहोत.
Parenting Tips: 3 गोष्टीसाठी मुलांना कधीच ओरडू नये, लर्निंग स्किलवर होतो परिणाम; पालकांनी व्हा सावध
मिनेस्ट्रोन सूपची उत्पत्ती इटलीमध्ये झाली, पण सुरुवातीला ते शाही पदार्थ नव्हते. हो, अनेक शतकांपूर्वी जेव्हा लोकांकडे मर्यादित संसाधने होती, तेव्हा घरात उपलब्ध असलेल्या भाज्या आणि धान्यांचा वापर करून एक मिश्रित सूप तयार केले जायचे, हे सूप म्हणजेच मिनेस्ट्रोन सूप! त्यात सहसा उरलेल्या भाज्या, पास्ता, तांदूळ, बीन्स आणि कधीकधी थोड्या मांसचा वापर केला जायचा. त्याचा मुख्य उद्देश पोट भरणे आणि पोषण देणे हा होता, कारण तेव्हा अन्न वाया घालवणे हे पाप मानले जायचे. हे सूप त्यावेळी केवळ एक सूप नव्हते तर इटालियन कुटुंबांना एकत्र बांधून ठेवण्याचे एक साधन होते. लोक मोठमोठ्या भांड्यांमध्ये तासनतास शिजवून या सूपला तयार करायचे. शिजत असताना त्याचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळत असे… कष्टाळू लोकांसाठी हा सूप एक उर्जेचा स्रोत होता, याने पोट भरलेले राहायचे. तसेच दिवसभराच्या कामानंतर हे गरमा गरम सूप मानला शांती देऊन जायचे.
काळानुसार सूपमध्ये झाले बदल
कालांतराने, मिनेस्ट्रोन सूपची साधी मुळे पसरू लागली. त्याची साधेपणा, पौष्टिकता आणि आश्चर्यकारक चवीने लोकांचे लक्ष वेधले. लोक इटलीहून जगाच्या इतर भागात स्थलांतरित होत असताना, त्यांनी ही रेसिपी आपल्यासोबत घेतली. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये त्याला बनवण्यात आले आणि जसजशी त्याही ख्याती पसरली त्याच्या बनवण्याच्या पद्धतींमध्येही थोडाफार बदल होत गेला. प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक घटकांनुसार या सूपला एक नवीन चव जोडली जाऊ लागली. काही ठिकाणी त्यात अधिक भाज्या घालण्यात आल्या, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता आणि काही ठिकाणी स्थानिक मसाले देखील वापरले गेले. या विविधतेमुळे मिनेस्ट्रोन आणखी लोकप्रिय झाला.
10 देश जेथील खाण्याच्या नियमांविषयी ऐकून मन हेलावेल; शाकाहारी झाल्यास मिळते कठोर शिक्षा
जगभरातील लोकांच्या आवडीच्या बनला आहे मिनेस्ट्रोन सूप
आज, मिनेस्ट्रोन सूप फक्त इटालीमध्येच नाही तर जगभरात आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. जगभरातील मोठमोठ्या रेस्टॉरंट्सच्या मेन्यूमध्ये या सुपला विशेष स्थान देण्यात आले आहे. शेफ त्यांच्या सर्जनशीलतेचा वापर करून ते नवीन स्वरूपात सादर करतात, परंतु त्याची मूलभूत ओळख म्हणजे ताज्या भाज्या आणि पास्ता यांचे मिश्रण नेहमीच अबाधित राहते. ते आता फक्त गरिबांचे जेवण राहिले नाही तर शाही लोकांचे मेजवानीतही त्याला पसंती मिळाली आहे. पदार्थाचा उबदारपणा, पौष्टिक गुणधर्म आणि आरामदायी चव यामुळे हे सूप एक सदाहरित पदार्थ बनते. त्यामुळेच तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये मिनेस्ट्रोन सूप ऑर्डर कराल तेव्हा याच्या इतिहासाला उजाळा द्यायला विसरू नका.