महिलांमध्ये वाढते ब्रेन फॉगची समस्या! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंध इत्यादी अनेक गोष्टींमध्ये महिला कायमच व्यस्थ असतात. सतत काम करत राहिल्यामुळे आणि शरीरात वाढलेल्या तणावामुळे आरोग्याला हानी पोहचते. वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांशी लढताना महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासातून जावे लागते. हार्मोन्सचे असंतुलन, कामाचा वाढलेला तणाव, मासिक पाळीतील वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.याशिवाय महिलांमध्ये ब्रेन फॉगची समस्या दिसून येत आहे. ब्रेन फॉग झाल्यानंतर महिला बऱ्याचदा छोट्या मोठ्या गोष्टी लगेच विसरून जातात. याशिवाय काही वेळा कामावर लक्ष केंद्रित करताना अनेक समस्या उद्भवू लागतात. ब्रेन फॉग हा गंभीर आजार नसला तरीसुद्धा दैनंदिन जीवनावर अनेक परिणाम दिसून येतात.(फोटो सौजन्य – istock)
जीवनशैलीत होणारे बदल, हार्मोनच्या समस्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे काहीवेळा ब्रेन फॉगची समस्या उद्भवते. पण शरीराची योग्य काळजी घेतल्यास तुम्ही ब्रेन फॉगसारख्या सामान्य समस्येवर मात करू शकता. या आजाराची लागण झाल्यानंतर मेंदूच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होतात.आज आम्ही तुम्हाला ब्रेन फॉग म्हणजे काय?ब्रेन फॉगची लक्षणे? ब्रेन फॉग झाल्यानंतर शरीराची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ब्रेन फॉग प्रामुख्याने महिलांमध्ये जास्त दिसून येतो. वयाच्या चाळिशीनंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे ब्रेन फॉग किंवा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
ब्रेन फॉग झाल्यानंतर मेंदू अतिशय गोंधळलेल्या आणि सुस्त अवस्थेमध्ये जातो. यामध्ये व्यक्तीला दैनंदिन जीवनातील कामे किंवा कोणत्याही गोष्टींवर लक्ष केंद्रित करताना अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय मेंदू पूर्णपणे थकून गेल्यासारखा वाटतो. ही समस्या प्रामुख्याने अनियमित झोप, रात्री जास्त वेळ जागे राहणे, स्ट्रेस, जास्त स्क्रीन टाइम, सोशल मीडियाचा अतिवापर, गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे ब्रेन फॉगची लक्षणे दिसून येतात. वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरोन आणि टेस्टोस्टेरोन हार्मोन्सच्या पातळीमध्ये अनेक बदल होतात. शरीरातील हार्मोन्स मेंदूवर नियंत्रणात ठेवतात. पण या हार्मोन्सची पातळी कमी झाल्यानंतर ब्रेन फॉगची समस्या उद्भवते.
नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. झोपेमुळे मेंदूच्या स्नायूंना आराम मिळतो आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय रोजच्या आहारात फळे, पालेभाज्या, ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेल्या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. शरीर हायड्रेट असणे अतिशय महत्वाचे आहे. नियमित ३ ते ४ लिटर पाणी प्यावे, ज्यामुळे मेंदू सक्रिय राहतो. मेडिटेशन, व्यायाम, योगासने केल्यामुळे मानसिक तणाव, स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.
ब्रेन फॉगपासून बचावाचे उपाय:
दररोज पुरेशी आणि शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे. ध्यान किंवा योगासारख्या तंत्रांनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. मोबाइल आणि संगणकाचा वापर मर्यादित ठेवा.
ब्रेन फॉग म्हणजे काय?
ब्रेन फॉग ही एक संज्ञानात्मक समस्या आहे, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष केंद्रित करणे, स्पष्टपणे विचार करणे आणि स्मरणशक्तीत अडचण येते. याच्या लक्षणांमध्ये गोंधळ, विस्मृती, थकवा, सुस्ती आणि एकाग्रतेचा अभाव यांचा समावेश होतो.