(फोटो सौजन्य: istock)
आजच्या काळात महिलांमध्ये सोलो ट्रॅव्हलिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढतोय. स्वतःसोबत वेळ घालवणं, नवीन ठिकाणं शोधणं आणि अनोखे अनुभव घेणं यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. भारतात अनेक ठिकाणं अशी आहेत जी केवळ निसर्गसौंदर्य आणि संस्कृतीसाठीच नाही तर सुरक्षित वातावरणासाठी देखील प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊ या महिलांसाठी परफेक्ट ठरणारी ५ डेस्टिनेशन्स.
उत्तराखंडातील चमत्कारिक धबधबा ज्याच्या पाण्यात दडलेत औषधी गुणधर्म; आंघोळ करताच दूर होतात सर्व रोग
१. ऋषिकेश, उत्तराखंड
योग नगरी म्हणून प्रसिद्ध असलेलं ऋषिकेश शांत वातावरण, गंगा आरती आणि योगा-ध्यान केंद्रांसाठी ओळखलं जातं. साहसप्रेमींसाठी येथे रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग आणि ट्रेकिंगचे पर्याय आहेत. किफायतशीर होस्टेल्स आणि हॉटेल्स सहज मिळतात. महिलांसाठी हे ठिकाण सुरक्षित मानलं जातं.
२. जैसलमेर, राजस्थान
“गोल्डन सिटी” म्हणून ओळखला जाणारा जैसलमेर आपल्याला थार वाळवंटातील अद्भुत अनुभव देतो. किल्ला, हवेल्या, आणि कॅमल सफारी ही मुख्य आकर्षणं आहेत. राजस्थानी खाद्यपदार्थ, लोकसंस्कृती आणि स्थानिक लोकांची आदरातिथ्य यामुळे हा प्रवास संस्मरणीय ठरतो. महिला प्रवासी येथे निर्धास्तपणे फिरू शकतात.
३. अल्लेप्पी, केरळ
जर तुम्हाला पाण्याच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडत असेल तर अल्लेप्पी सर्वोत्तम ठिकाण आहे. हिरवेगार नारळाचे झाड, बॅकवॉटर हाउसबोट राईड आणि केरळचे पारंपरिक खाद्य या प्रवासाला वेगळं रूप देतात. येथे महिलांच्या सुरक्षिततेला पर्यटन क्षेत्रात विशेष महत्त्व दिलं जातं.
४. धर्मशाला, हिमाचल प्रदेश
डोंगरप्रेमींसाठी धर्मशाला आणि मॅक्लोडगंज अप्रतिम ठिकाणं आहेत. तिबेटी संस्कृती, बौद्ध मठ, शांत कॅफे आणि ट्रेकिंग मार्ग यामुळे हा प्रवास अनोखा वाटतो. येथील लोक अतिशय मैत्रीपूर्ण आहेत आणि महिलांना रात्रीसुद्धा सुरक्षितपणे फिरता येतं.
५. पुद्दुचेरी
फ्रेंच आर्किटेक्चर, स्वच्छ समुद्रकिनारे आणि रंगीत रस्ते पुद्दुचेरीला एक वेगळाच आकर्षकपणा देतात. ऑरोविल आश्रम, योगा सेंटर आणि आरामदायी कॅफे येथे शांतता आणि रिलॅक्सेशनचा अनुभव देतात. सुरक्षित वातावरणामुळे महिला प्रवाशांसाठी हे आदर्श डेस्टिनेशन ठरतं.
सोलो ट्रिपसाठी काही खास टिप्स