पाय आणि कंबर सतत दुखते? किडनीसंबंधित असू शकतात 'हे' गंभीर आजार
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे सेवन, पचनाच्या समस्या, मानसिक तणाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी रक्त शुद्ध करण्याचे काम करते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी किडनी अतिशय महत्वाची ठरते. पण किडनीच्या कार्यात अडथळे आल्यानंतर शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात.(फोटो सौजन्य – istock)
किडनीसंबंधित आजार झाल्यानंतर हातापायांमध्ये वेदना होणे किंवा कंबर दुखणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर बऱ्याचदा किडनी स्टोनची समस्या उद्भवतात. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात अतिशय तीव्र वेदना होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
किडनी स्टोन झाल्यानंतर छोटे छोटे खड्डे मूत्रमार्गात जमा होण्यास सुरुवात होते.हा स्टोन हळूहळू लघवीद्वारे बाहेर पडून जातील. मूत्रमार्गात जमा झालेले स्टोन बाहेर पडून जाताना खूप जास्त वेदना होतात. पण किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर किडनीमधील स्टोन बाहेर पडून जात नाहीत, ज्यामुळे लघवी करताना वेदना होणे, ओटीपोटात वेदना होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. याशिवाय बऱ्याचदा किडनी स्टोन तोडून किंवा सर्जरी करून काढावा लागतो. किडनीमध्ये मिनरल्स, ऍसिड आणि सॉल्ट एकत्र मिळून किडनी स्टोन तयार होतात. सुरुवातीला हे स्टोन अतिशय लहान लहान कण असतात, मात्र हळूहळू हे स्टोन मोठे होतात आणि मूत्रमार्गात अडथळे निर्माण करतात.
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. यामध्ये मिनरल्स, अॅसिड आणि इतर अनेक घटक आढळून येतात. कॅल्शिअम, सोडिअम, ऑक्सालेट आणि यूरिक अॅसिड शरीरात जमा झाल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे किडनी स्टोन होतो. शरीरात सर्व घटक एकत्र मिक्स झाल्यानंतर मूत्रमार्गात बारीक बारीक खडे होतात.
किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन (मुतखडा) म्हणजे किडनीमध्ये खनिजे आणि क्षारांचे लहान गोळे तयार होणे. हे दगड मूत्रमार्गातून लघवीवाटे बाहेर पडतात, ज्यामुळे वेदना होऊ शकतात.
किडनी स्टोनची लक्षणे कोणती?
पाठीत आणि बाजूला तीव्र वेदना.लघवीचा रंग बदलणे किंवा लघवी करताना जळजळ होणे.मळमळ, उलट्या आणि ताप.
किडनी स्टोन कसे टाळता येतात?
भरपूर पाणी प्या आणि दररोज २-३ लिटर द्रवपदार्थ सेवन करण्याचे लक्ष्य ठेवा. मिठाचे सेवन कमी करा आणि सोडियम-समृद्ध, ऑक्सलेट-समृद्ध पदार्थ टाळा. तुम्हाला किडनी स्टोनचा धोका असल्यास, डॉक्टरांना भेटून योग्य मार्गदर्शन घ्या.