आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
आतड्यांचा कॅन्सर होण्याची कारणे?
आतड्यांच्या कॅन्सरची त्वचेवर दिसून येणारी लक्षणे?
कॅन्सर होण्याची कारणे?
जगभरात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालील जमीन सरकते. कारण हा अतिशय भयानक आणि गंभीर आजार आहे. मागील काही वर्षांपासून कोलोन कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पौष्टिक घटकांचा अभाव, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. जगभरात वेगाने वाढणाऱ्या आतड्यांच्या कॅन्सर जीवनशैलीतील चुकांमुळे होण्याची शक्यता असते. पोटदुखी, मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल किंवा शौचात रक्त येणे इत्यादी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता, वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istock)
दिवसभरात न चुकता करा ३ लीटर पाण्याचे सेवन! शरीराला होतील अद्भुत फायदे, महिनाभरात दिसून येईल बदल
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर केवळ शरीराच्या अतंर्गत अवयवांचं नाहीतर त्वचेवर सुद्धा गंभीर लक्षणे दिसू लागतात. त्वचेवर लालसरपणा, गाठी, रंग बदलणे, शरीरावरील जखमा लवकर न भरणे इत्यादी लक्षणे लक्षणे दिसू लागतात. आज आम्ही तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर पोटात वेदना होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, त्वचेवर गाठी येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. हे बदल हात, पाय आणि शरीराच्या इतर अवयवांवर सुद्धा दिसू लागतात. कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्याचे गंभीर नुकसान होते आणि कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते. त्वचेवर लालसरपणा किंवा कठीण गाठी जाणवू लागल्यास दुर्लक्ष करू नये.
बऱ्याचदा आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर तो त्वचेच्या पेशींमध्ये पसरण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्वचा लाल होणे, कठीण गाठी तयार होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. काहीवेळा अंगावर आलेल्या गाठीमुळे तीव्र वेदना होण्याची शक्यता असते. ही लक्षणे कॅन्सर मूळ जागेपासून पुढे सरकू लागल्यामुळे दिसून येते.
त्वचेवर लालसरपणा किंवा सूज जाणवू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता उपचार करावेत. याशिवाय काहीवेळा त्वचेचा रंग अतिशय गडद होऊन जातो. शरीरातील मेटाबॉलिक बदल किंवा कॅन्सर उपचारांचा परिणाम झाल्यानंतर त्वचेच्या रंगात अनेक बदल दिसू लागतात.
Ans: रेक्टममध्ये असामान्य पेशींची वाढ होणे म्हणजे कोलन कॅन्सर.
Ans: शौचातून रक्तस्त्राव किंवा शौचाच्या रंगात बदल. पोटात दुखणे, पेटके येणे किंवा सूज येणे.
Ans: अनियंत्रित पेशी वाढ, आनुवंशिकता.






