वाढत्या वयात महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत 'ही' विटामिन
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. सतत थकवा, अशक्तपणा किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला सतत दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. वयाच्या तिशीनंतर शरीरातील हार्मोन्स वेगाने बदलतात. ज्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. तर वयाच्या तिशीनंतर पाहिलं मुलं जन्माला आल्यानंतर महिलांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. शरीरात वारंवार अशक्तपणा, थकवा किंवा हाडांमधील वेदना वाढू लागतात. त्यामुळे कामाच्या धावपळीमध्ये महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. बदलेल्या जीवनशैलीमुळे हल्ली वयाच्या तिशीमध्येच महिलांना आरोग्यासंबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.(फोटो सौजन्य – istock)
प्रोबायोटिकयुक्त दह्यात मिक्स करून खा ‘हे’ पदार्थ, शरीरात वाढलेला लठ्ठपणा होईल कायमचा कमी
शरीरात सतत जाणवू लागलेल्या थकवा, अशक्तपणामुळे शरीरात विटामिनची कमतरता उद्भवू लागते. शरीरात उद्भवू लागलेली विटामिनची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे नेहमीच आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वयाच्या तिशीमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी कोणती विटामिन महत्वाची असतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात विटामिनची कमतरता जाणवू लागल्यास त्वचेवर सुरकुत्या येणे, त्वचा कोरडी पडणे, सतत थकवा अशक्तपणा जाणवणे, वजन वाढणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात.
शरीरासाठी मॅग्नेशिअम अतिशय महत्वाचे आहे. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता जाणवू लागल्यानंतर गॅस, ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे आहारात मॅग्नेशियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. मॅग्नेशियम युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची भूक नियंत्रणात राहते आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होऊन जाते. मॅग्नेशियम शरीरातील वॉटल रिटेंशन कमी करते, ज्यामुळे शरीर कायम फिट आणि हेल्दी राहते.
निरोगी आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियम असणे आवश्यक आहे. शरीरात उद्भवू लागलेली कॅल्शियमची कमतरता आरोग्याला हानी पोहचवते. त्यामुळे आहारात कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आहारात दूध, सोयाबीन इत्यादी कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन करावे. हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे. कॅल्शिअममुळे शरीरात भरपूर कोलेजनचे निर्माण होते. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. चमकदार त्वचेसाठी कॅल्शियम अतिशय महत्वाचे आहे.
महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचे विटामिन म्हणजे सोडिअम. शरीरात निर्माण झालेल्या सोडिअमच्या कमतरतेमुळे पाठ आणि कंबरेच्या वेदना उद्भवू लागतात. या वेदना बऱ्याचदा अतिशय तीव्र होतात. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली सोडिअमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मिठाचे योग्य प्रमाणात सेवन करावे. ज्या महिलांना व्हेरिकोज व्हेन्स आणि स्ट्रेच मार्क्सची समस्या असेल अशांनी आहारात सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे.