heart shape place (फोटो सौजन्य- pinterest)
जर तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी रोमँटिक व्हेकेशनचा विचार करत असाल हे ठिकाण सर्वोत्तम आहे. जगात असे काही ठिकाणे आहेत जे हृदयाच्या आकाराचे आहेत. अनेक लोकांना याबाबतीत माहिती नाही आहे म्हणून इथे गर्दी देखील नसते. तुम्हाला सुट्ट्यानां खास बनवायचं असेल तर या ठिकाणी नक्कीच फिरायला जा.
राजस्थानच्या ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट द्या; सुंदर, ऐतिहासिक आणि रोमांचक राज्य
जगात अनेक विचित्र ठिकाणे आहेत जे त्यांच्या विशिष्टांसाठी प्रसिद्ध आहे. काही ठिकाणे आपल्या सणांनासाठी प्रसिद्ध आहे तर काही ठिकाणे आपल्या ऐतिहासिक कारणांमुळे प्रसिद्ध आहे. काही ठिकाणे मंदिर तर काही हिल स्टेशन साठी प्रसिद्ध आहेत. मात्र असे काही टूरिस्ट पॉइंट आहेत जे आपल्या आकारामुळे प्रसिद्ध आहेत. जगात अशे काही बेट म्हणजेच आयलंड आहेत आणि तलाव आहेत जे हृदयाच्या आकाराचे आहेत. इथे कपल्स रोमांटिक व्हेकेशन घालवू शकतात. भारतात सुद्धा अशी ठिकाण आहे जे हृदयाच्या आकाराची आहे. चला बघुयात असे कोणते ठिकाण आहेत.
कोरल ने बनलेला दगळ
ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलैंडमध्ये ग्रेट बैरियर रीफमध्ये एक सुंदर हृदयाच्या आकाराचा खडक आहे. याला हार्ट रीफ म्हंटल जात. हे कोरलने बनलेला आहे. निळ्या समुद्राच्या मधात असलेला खडक खूप सुंदर दिसतो. इथे बोटीने पोहोचता येते. ही जागा एयरली बीच पासून 78 किलोमीटर दूर आहे. ग्रेट बैरियर रीफ मध्ये जवळपास ३ हजार रिफ म्हणजे कोरलने बनलेले खडक आहे.
क्रोएशियाचे बेट
क्रोएशिया युरोप मध्ये असलेला एक देश आहे. जो आपल्या सुंदरतेसाठी जगात प्रसिद्ध आहे. पण इथे एक खास प्रकारचे बेट आहे ज्याची नेहमीच चर्चा होते. त्या बेटाचे नाव गेल्स्नजाक आहे. हा बेट हृदयाच्या आकाराचा आहे. याला लव्हर आयलंड असेही म्हंटले जातात. हे खूप लहान बेट आहे. त्याचप्रमाणे, फिजीमध्येही हृदयाच्या आकाराचे एक बेट आहे ज्याला तावरुआ म्हणतात. त्यावर एक खाजगी रिसॉर्ट आहे जो २५ एकरवर पसरलेला आहे.
हृदयाच्या आकाराचा तलाव
जपानमधील होक्काइडोच्या घनदाट जंगलात टोयोनी नावाचा एक खूप जुना तलाव आहे. त्याचा आकार हृदयासारखा आहे. लोक येथे हायकिंग करून पोहोचतात. उंच दाट झाडांनी वेढलेले हे तलाव खूप सुंदर दिसते. हे लोकांचे आवडते पिकनिक स्पॉट आहे.
कॅनडामध्येही हार्ट लेक नावाचा एक तलाव आहे ज्याचा आकार अगदी हृदयासारखाच आहे. लोक इथे ट्रेकिंग करतात. हिवाळ्यात हे सरोवर गोठते.
इटलीचे स्कॅनो लेक देखील खूप सुंदर आहे. हे ३ हजार वर्षे जुने तलाव आहे. यामध्ये लोक मासेमारी आणि पोहण्याचा आनंद घेऊ शकतात.
भारतात हृदयाच्या आकाराचा तलाव
भारतच्या केरळमध्ये वायनाड नावाने एक जागा आहे जो एक हिल स्टेशन आहे. इथे चेम्ब्रा नावाचा एक तलाव आहे जो हृदयाच्या आकाराचा आहे. इथे खूप लोकल लोक फिरायला जातात. इथे फिरायला जाण्याचा उत्तम वेळ सप्टेंबरते मार्च आहे. हा तलाव कधी सुकत नाही. या तलावाच्या जवळपास अनेक धबधबे आहेत जे तुमच्या व्हेकेशनला संस्मरणीय बनवेल. हे ठिकाण प्री वेडिंग शूट साठी देखील बेस्ट आहे.
एक असे मंदिर जिथे लोक आपली इच्छा नाही तर तक्रारी घेऊन जातात…..