चेहऱ्याची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी 'या' पद्धतीने घरीच करा दही फेशिअल
सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची जास्त काळजी घेतली जाते. बदलत्या ऋतूंनुसार स्किन केअर रुटीनमध्ये सुद्धा बदल केला जातो. वातावरणात सतत होणारे बदल, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा दिसून येतो. त्यामुळे यासमस्यांकडे दुर्लक्ष न करता त्वचेची जास्त काळजी घ्यावी. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे खराब झालेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतात, मात्र या ट्रीटमेंटमुळे त्वचा जास्त काळ सुंदर दिसत नाही. कालांतराने त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
ग्लास स्किन मिळवण्यासाठी Vitamin-E करेल तुमची मदत; फक्त ‘या’ पद्धतींचा अवलंब करा
चेहऱ्यावरचा हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करून घेतात. मात्र यामुळे सुद्धा त्वचेमध्ये फारसा बदल दिसून येत नाही. अशावेळी तुम्ही खराब झालेली त्वचा पुन्हा सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करू शकता.घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसू लागते. त्वचेसंबंधित सर्वच समस्या दूर होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी दह्याचे फेशिअल घरी कसे करावे, याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर करून फेशिअल केल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार होईल.
फेशिअल करण्याआधी चेहरा स्वच्छ क्लीन करून घेणे आवश्यक आहे. त्वचा क्लीन करून घेतल्यामुळे धूळ, माती निघून जाते. यासाठी सगळ्यात आधी साधं दही घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून १ मिनिटं दही त्वचेवर तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल. याशिवाय चेहऱ्यावर साचून राहिलेली माती किंवा धूळ कमी होईल.
फेशिअल करताना स्क्रबिंग करणे आवश्यक आहे. यासाठी वाटीमध्ये दही घेऊन त्यात कॉफी पावडर टाकून मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण हातांच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारेल. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या.
उन्हाळ्यात चेहरा सतत तेलकट होतो? जाणून घ्या चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
स्क्रबिंग केल्यानंतर मसाज करावा. यासाठी २ चमचे दही, १ चमचा मध आणि अर्धा चमचा व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेऊन वाटीमध्ये मिश्रण तयार करा. तयार करून घेतलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने ६ ते ७ मिनिटं व्यवस्थित मसाज करा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून नंतर तेल किंवा घरी असलेले साधे मॉइश्चरायजर लावा.
दही फेशिअल केल्यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर होते. याशिवाय चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन त्वचा जास्त तेलकट किंवा चिकट होत नाही. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी दही फेशिअल करावे.