सगळीकडेच सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत चालले आहे. याचा परिणाम आरोग्यासह त्वतेवरही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. उन्हाळा हा ऋतू तेलकट त्वचा म्हणजेच ऑयली स्किन असणाऱ्यांसाठी खूपच नुकसानदायक ठरतो. कारण उष्णता, घाम आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा यामुळे दिवसभर चेहरा चिकट वाटतो. चिकटपणासोबतच त्वचेच्या समस्या जसे पिंपल्स, ब्लिमिशेस इत्यादी देखील होऊ लागतात.
आपला चेहरा स्वच्छ, सुंदर दिसावा अशी आपल्यापैकी बहुतेकांची इच्छा असते, अन्यथा आपल्याला कधीकधी लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. काही घरगुती उपायांनी आपण चेहऱ्यावर चमक आणू शकतो. हे उपाय तेलकट त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. तेलकट त्वचेचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या स्किन केअर रूटीनमध्ये २ गोष्टींचा समावेश केला तर त्यांच्या चेहऱ्यावरील चिकटपणा निघून जाईल.






