शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा; 'हे' असणार यंदाचे खास आकर्षण (Photo Credit - X)
परेड मध्ये जवान आणि विद्यार्थी ओळीने राष्ट्रध्वजाला सलामी देतात. बघणार्यांसाठी हे फार मनोरंजक दृश्य असते. परेड मध्ये सहभागी चित्ररथ म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील प्रमुख कलात्मक प्रदर्शन असून ते राज्यसंस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक संदेशांचे दर्शन घडवतात.
यंदाचे चित्ररथ सुद्धा रंगबेरंगी, कलात्मक आणि विविध थीमवर आधारित रथ असून समाजाला एक दिशा नक्की देतील, लोकांना विचार करायला भाग पाडतील आणि समाजामध्ये देशप्रेमाची जनजागृती होईल तसेच महाराष्ट्रात होत असणाऱ्या कामाविषयी लोकांना पूर्ण माहिती मिळेल अशी आशा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मैदानात चित्ररथ बनविणाऱ्या टीम चे कला दिग्दर्शक नितीन शिंदे यांनी नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली आहे.






