वयाच्या चाळीशीत चेहऱ्यावर दिसून येईल तारुण्य! रोजच्या आहारात नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. शरीरासह त्वचेमध्ये होणारे बदल लगेच दिसून येतात. त्यामुळे वाढत्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याची आणि त्वचेची जास्त काळजी घ्यावी. वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या चक्रात अनेक बदल होतात. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा कोरडी पडणे, वांग इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा महिला दुर्लक्ष करतात, मात्र असे केल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपल्बध असलेल्या केमिकल युक्त प्रॉडक्टचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, ज्यामुळे त्वचा आणखीनच खराब होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
Vitamin च्या कमतरतेमुळे होतोय AMH पातळीवर परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
वयाच्या चाळिशीनंतर त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यास कोणत्याही केमिकल युक्त क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय स्किन केअर रुटीनमध्ये बदल करून त्वचेला सूट होणारे प्रॉडक्ट वापरावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वयाच्या चाळीशीमध्ये कायम तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे शरीरासह आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतील.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप आवडते. पण त्वचा कायम तरुण आणि सुंदर ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन करावे. यामुळे त्वचेमध्ये अनेक बदल दिसून येतात. डार्क चॉकलेटमध्ये 70 टक्के कोकोआ असते. याशिवाय यामध्ये फ्लेवेनॉइड्स आढळून येते, त्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून डार्क चॉकलेटचे सेवन करावे.
बेरीजमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. याशिवाय त्वचेमधील कोलेजन वाढवण्यासाठी आहारात बेरीजचे सेवन करावे. रोजच्या आहारात बेरीज खाल्यामुळे त्वचा अधिक तरुण आणि सुंदर दिसते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी नियमित बेरीजचे सेवन करावे.
शरीरात कमी झालेली रक्ताची पातळी भरून काढण्यासाठी आहारात नेहमी डाळिंब खावे. डाळिंबाचे दाणे किंवा डाळिंबाचा रस प्यायल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आढळून येतात. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी डाळिंबाचे दाणे नियमित खावे. यामुळे सुरकुत्या होऊन त्वचा सुंदर दिसते.