पिंपल्सने भरलेली त्वचा उठावदार करण्यासाठी विटामिन ई कँप्सूलचा 'या' पद्धतीने करा वापर
बदलते वातावरण, सतत आहारात होणारे बदल, वेगवेगळ्या महागड्या क्रीमचा वापर इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवसुद्धा दिसून येतो. रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला इजा पोहचण्याची अशक्यता असते. त्यामुळे आहारात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे जास्त सेवन करू नये. बऱ्याचदा चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमांचे डाग आल्यानंतर त्वचा अतिशय खराब आणि निस्तेक होऊन जाते. अशावेळी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. पण सतत केल्या जाणाऱ्या केमिकल युक्त प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचेचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात वेगवेगळे महागडे प्रॉडक्ट न वापरता त्वचेला सूट होणाऱ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी विटामिन ई कॅप्सूलचा वापर केला जातो. यामध्ये असलेले घटक खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारतात आणि त्वचा कायम निरोगी ठेवतात. त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी अनेक महिला कोरफड जेल आणि विटामिन ई कॅप्सूल एकत्र करून लावतात. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर होते. त्वचेच्या सर्वच समस्या दूर होतात. आज आम्ही तुम्हाला विटामिन ई कॅप्सूल त्वचेला लावल्यामुळे चेहऱ्याला नेमके काय फायदे होतात? कशा पद्धतीने विटामिन ई कॅप्सूलचा वापर करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
व्हिटामिन ई कॅप्सूल त्वचेवर लावल्यास चेहरा मुलायम आणि मऊ होतो. याशिवाय त्वचेसंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी ही कॅप्सूल अतिशय प्रभावी आहे. चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स आणि मुरुमांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी व्हिटामि ई कॅप्सूलचा वापर करावा. वाढत्या वयात त्वचेमध्ये होणाऱ्या बदलांपासून आराम मिळ्वण्यासाठी या कॅप्सूलचा वापर करावा.सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी कॅप्सूल अतिशय प्रभावी ठरते.
वाटीमध्ये कोरफड जेल किंवा खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात विटामिन ई कॅप्सूल मिक्स करा. कँप्सूल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर तयार केलेले मिश्रण लावून हलक्या हातानी मसाज करून घ्या. यामुळे त्वचेवरील काळे डाग, पिंपल्स आणि डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी या कॅप्सूलचा वापर करावा.
खराब झालेलं त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी विटामिन कॅप्सूल अतिशय प्रभावी ठरते. पण कॅप्सूल लावताना ती त्वचेवर थेट लावू नये. यामुळे चेहऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. त्वचेवर अतिरिक्त पिंपल्स किंवा रॅश येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे विटामिन ई कॅप्सूल लावताना त्यात तेल किंवा कोरफडचा रस मिक्स करून लावावा.