वयाच्या चाळीशीमध्ये त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी अंघोळीपूर्वी चेहऱ्यावर लावा 'हा' पदार्थ
वयाच्या प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा महिला स्वतःच्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाहीत. आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल, मासिक पाळीच्या चक्रातील असंतुलन, हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. वय वाढल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या येणे, वांग येणे, त्वचा निस्तेज होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळ येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
हाता-पायांवरील काळवटपणा दूर करेल Bubble Mask; वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. वेगवेगळ्या क्रीम आणि महागडे फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करून त्वचेचे सौदंर्य वाढवले जाते. मात्र या ट्रीटमेंट आणि क्रीमचा प्रभाव जास्तकाळ त्वचेवर दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी अंघोळीपूर्वी त्वचेवर कोणते पदार्थ लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
वयाच्या चाळिशीनंतर तुम्ही चेहऱ्यावर दही आणि हळद पेस्ट लावू शकता.हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा अतिशय उजळदार दिसू लागेल. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हळद अतिशय प्रभावी ठरते. वाटीमध्ये दही घेऊन त्यात हळद मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार करून घेतलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळा ठेवून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास त्वचा अतिशय उजळदार, मऊ आणि चमकदार होईल.
वय वाढल्यानंतर आहारात सुद्धा बदल करणे आवश्यक आहे. कारण वय वाढल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आणि हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे विटामिनची कमतरता निर्माण होऊ लागते. शरीरात विटामिन सी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. या सुरकुत्या कमी करण्यासाठी पपई फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. फेसपॅक तयार करण्यासाठी पपईची पेस्ट करून संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेमधील सर्व घाण स्वच्छ होईल आणि चेहरा चमकदार दिसेल.
पूर्वीच्या काळापासून ते अजूनही सगळीकडेच कोरफड जेलचा वापर त्वचेसाठी केला जात आहे. कोरफड जेल त्वचेवर लावल्यामुळे त्वचा अधिक चमकदार आणि उठावदार दिसू लागते. याशिवाय यामध्ये असलेले घटक चेहरा थंड करतात. कोरफड जेलमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म चेहऱ्यावर आलेले मोठे डाग कायमचे नष्ट करून टाकतात. यासाठी नियमित कोरफडच्या आतील गार काढून संपूर्ण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. काहीवेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.