(फोटो सौजन्य – iStock)
इंटरनॅशनल ट्रिप करावी अशी अनेकांची इच्छा असते. मात्र याचा खर्च सामान्यांना परवडण्याजोगा नसतो, ज्यामुळे अनेकांचे हे स्वप्न स्वप्नच बनून राहते. पण आता असे होणार आहे कारण आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका सुंदर ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत जिथे कमी खर्चात तुम्हाला अविस्मारणीय असा प्रवास करता येईल. व्हॅटिकन सिटी हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर कला, संस्कृती आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातूनही एक अद्भुत ठिकाण आहे. भारतीय प्रवाशांसाठी, येथील सहल एक संस्मरणीय अनुभव असू शकते, तुम्हाला फक्त त्याचे योग्य नियोजन करावे लागेल. भारतीय प्रवासी व्हॅटिकन सिटीला कसे भेट देऊ शकतात. इथे फिरण्यासाठी कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत आणि व्हिसा प्रक्रिया काय आहे ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
व्हॅटिकन सिटी कुठे आहे?
व्हॅटिकन सिटी हे इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी वसलेले एक अत्यंत लहान पण महत्वाचे स्वतंत्र राष्ट्र आहे. केवळ ०.४९ चौ.किमी क्षेत्रफळ असलेले हे जगातील सर्वात लहान देश आहे. येथे अंदाजे ८०० लोकसंख्या आहे आणि ही मुख्यतः चर्चशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी असतात. हे रोमन कॅथोलिक धर्माचे वैश्विक केंद्र म्हणून ओळखले जाते.
भारतातून व्हॅटिकन सिटीला कसे जावे?
भारतातील प्रमुख महानगरांमधून (दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू) रोमच्या लिओनार्डो दा विंची-फ्युमिचिनो (Fiumicino) आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे थेट किंवा एक स्टॉप वाल्या फ्लाइट्स उपलब्ध आहेत. भारतातून रोमला पोहोचण्यास सुमारे १० ते १४ तास लागतात. रोम विमानतळावरून तुम्ही मेट्रो, लोकल ट्रेन, बस किंवा टॅक्सीने सहज व्हॅटिकन सिटीपर्यंत पोहोचू शकता. व्हॅटिकन सिटी रोमच्या अगदी जवळ असून, सेंट पीटर्स बॅसिलिका किंवा सिस्टीन चॅपेलकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हा एक सोयीस्कर व किफायतशीर पर्याय आहे.
व्हिसा प्रक्रिया काय आहे?
व्हॅटिकन सिटीला भेट देण्यासाठी स्वतंत्र व्हिसा लागत नाही, कारण हे इटलीच्या सीमेमध्ये आहे. त्यामुळे भारतीय प्रवाशांसाठी “शेंजेन व्हिसा” आवश्यक आहे. तुम्ही हा व्हिसा इटालियन दूतावास किंवा VFS Global च्या केंद्रामार्फत मिळवू शकता. अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते:
इन्फ्लुएंसरने दाखवले जगातले सर्वात महाग आणि सोनेजडीत हॉटेल, भाडं इतकं की ऐकूनच हार्ट अटॅक येईल
व्हॅटिकन सिटीतील प्रमुख पर्यटनस्थळे
व्हॅटिकन सिटी धर्म, कला आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय समृद्ध आहे. येथे काही प्रमुख आकर्षणे खालीलप्रमाणे:
भारतीय प्रवाशांसाठी सूचना
व्हॅटिकन सिटीला भेट देताना धार्मिक स्थळांचे आदरपूर्वक पालन करणे गरजेचे आहे. ड्रेस कोडचे पालन करणे (खांदे व गुडघे झाकलेले असावेत), शांतता राखणे आणि फ्लॅश फोटोग्राफी टाळणे आवश्यक आहे. हंगामानुसार, विशेषतः उन्हाळ्यात (मे ते ऑगस्ट), येथे गर्दी अधिक असते, त्यामुळे अगोदरच तिकीट बुक करून सकाळी लवकर पोहचणे उत्तम ठरेल.
भारतातून व्हॅटिकन भेट देण्याचा खर्च