सद्गुरूंनी सांगितली दही लावण्याची योग्य पद्धत
दही हे एक उत्कृष्ट आंबवलेले आणि प्रोबायोटिक अन्न आहे. हे आपले पोट, लहान आतडे, मोठे आतडे आणि पचन यांचे आरोग्य सुधारते. पण तुम्हाला माहीत आहे का की दही बनवताना एखादी छोटीशी चूक झाली तर त्याने आपल्या आतड्यांचे नुकसान होऊ शकते. दही बनवताना कोणती चूक करू नये हे सद्गुरूं जग्गी वासुदेवांनी सांगितले आहे.
एका इन्स्टाग्राम रीलमध्ये, UCLA ब्रेन-गट मायक्रोबायोम सेंटरचे संस्थापक Dr. Emeran Mayer आणि ईशा फाऊंडेशनचे सद्गुरू जग्गी वासुदेव, आंबवलेल्या पदार्थांबद्दल माहिती देत होते. यामध्ये विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ याबाबतही चर्चा करण्यात आली आणि यादरम्यान सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी सांगितले की, दही कोणत्या ऋतूमध्ये किती काळ साठवावे आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती? त्यांनी सांगितले की अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की विविध प्रकारचे आंबवलेले पदार्थ खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि इन्फ्लेमेटरी मार्कर कमी होतात. ते म्हणाले की वनस्पती-आधारित आहाराइतकेच वेगवेगळे आंबवलेले पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या आहारात फक्त तेच आंबवलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजे ज्यात जिवंत सूक्ष्मजंतू असतात, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)
जास्त वेळ फर्मेंट करू नये
जास्त काळ दही लावण्यासाठी घेऊ नये
सद्गुरु म्हणाले की फर्मेंटेशन हे शरीरासाठी फायदेशीर आहे मात्र ते शरीराला फायदेशीर ठरेल इतकेच दिवस केले पाहिजे. फर्मेंटेशन करताना त्यावर नियंत्रण असायला हवे. जर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त पदार्थ आंबवले तर ते तुमच्या आतड्यातील सूक्ष्मजंतूंना आधार देण्याऐवजी स्वतःचे बायोम तयार करण्यास सुरवात करेल. त्यामुळे लहान-मोठ्या आतड्यांचे आरोग्य बिघडू लागते.
दही लावण्याची योग्य पद्धत
दही लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे
दही लावताना वेळेकडे लक्ष दिले पाहिजे. जास्त काळ साठवलेल्या दह्यामुळे जास्त प्रमाणात फर्मेंटेशन होऊ शकते ज्यामुळे आतडे, पोट आणि पचन खराब होते. दही सेट करण्याचा योग्य मार्ग म्हणजे ते जास्त वेळ सेट होऊ देऊ नका. खाताना दही गोड किंवा थोडे आंबट असावे. सद्गुरूंच्या मते खूप आंबट दही खाण्यास योग्य नाही, त्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
किती वेळात लागते दही?
दही लागण्यासाठी किती वेळ लागतो
सद्गुरूंनी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दही सेट करण्याच्या वेगवेगळ्या वेळा सांगितल्या आहेत. जेथे उन्हाळ्यात दही फक्त 4 ते 5 तास सेट करावे. हिवाळ्यात, आपण ते थंडीत सेट करण्यासाठी रात्रभर ठेऊ शकता कारण उष्णता नसल्याने दही सेट व्हायला वेळ लागते. तसंच पावसाळ्यातही तुम्ही दही सेट करण्यासाठी रात्री लाऊ शकता. गोड दही हवे असेल तर दही लावण्याची ही योग्य पद्धत आहे.
थंडीत दही खाणे योग्य कि अयोग्य? जाणून घ्या, फायदे आणि नुकसान
दही कसे काढावे
दही काढण्याची योग्य पद्धत
दही गोठले की ते ज्या भांड्यात लावले आहेत त्यातून काढताना योग्य पद्धतीने काढावे. सद्गुरूंच्या म्हणण्यानुसार, दही विचित्र पद्धतीने किंवा मधूनच काढण्याऐवजी, एका काठावरुन हलक्या हाताने काढले पाहिजे. दह्याचा गोडवा कमी होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही काय खात आहात हे जाणून घेणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तुम्ही ते कसे खात आहात हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. तसंच रात्रीच्या वेळी सहसा दही खाणे टाळावे
दही लावण्याचा कालावधी?