सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चावून खा 'हा' पांढरा पदार्थ
भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे मसाले, भाज्या, फळे आणि इतर आवश्यक गोष्टी नेहमीच उपलब्ध असतात. त्यातील अतिशय प्रभावी आणि गुणकारी पदार्थ म्हणजे लसूण पाकळी. नाजूक दिसणारी लसूण पाकळी संपूर्ण शरीरासाठी अतिशय महत्वाची आहे. लसूणमध्ये अनेक आवश्यक गुणधर्म आढळून येतात. लसूण पाकळीचा वापर जेवण बनवताना, फोडणी देताना तर अनेक घरगुती औषधांसाठी सुद्धा केला जातो. लहान मुलांसह काही मोठ्यांना लसूण खायला आवडत नाही. पण लसूण खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. मागील अनेक शतकांपासून लसूणचे सेवन केले जात आहे. आजीबाईच्या बटव्यातील अतिशय प्रभावी औषध म्हणजे लसूण.(फोटो सौजन्य – istock)
सतत कोरडा खोकला येतो? मग नागवेलीच्या पानांचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, शरीरातील कफ पडून जाईल बाहेर
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात लसूणचे सेवन करावे. लसूण खाल्यामुळे सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. लसूण आरोग्यासंबंधित अनेक गंभीर आजारांपासून शरीराची सुटका करते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी लसूण चावून खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. याशिवाय रोजच्या आहारात नियमित लसूण खाल्यास पावसाळ्यातील सर्वच आजारांपासून शरीर कायमच निरोगी राहील.
शरीरात वाढलेले उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात लसूण खावी. लसूण खाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला कोलेस्ट्रॉलचा पिवळा थर कमी होतो आणि आरोग्य सुधारते. कोलेस्टरॉलमुळे बंद झालेल्या हृदयाच्या सर्व रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यासाठी लसूण खावी. याशिवाय लसूण खाल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीच्या आजारांचा प्रसार झपाट्याने होतो. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. त्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात लसूण खावा. यामुळे सर्दी, खोकला आणि आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवणार नाही.
लसूणमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे पोटाचा संसर्ग होत नाही. शरीरात साचलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी लसूण किंवा लसूणच्या रसाचे चमचाभर सेवन करावे. यामुळे शरीर डिटॉक्स होण्याचं मदत होते. तसेच बिघडलेली पचनक्रिया सुधरण्यासाठी लसूण खाणे अतिशय गुणकारी आहे. यामुळे हाडांमध्ये वाढलेला कमकुवतपणा नष्ट होतो. हाडे निरोगी राहतात.
सकाळी उठल्यानंतर कच्चा लसूण सोलून घ्या. त्याच्या वरील साल काढून लसूण पाकळी चावून खा. त्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करा. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण क्षणार्धात स्वच्छ होईल.