फोटो सौजन्य: iStock
उन्हाळ्यात अनेकदा सुट्ट्यांच्या निमित्ताने आपण सर्वेच जण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवतो. पण अशावेळी बाहेर पडताना आपण आपल्यासोबत नेहमीच पुरेश्या प्रमाणात पाणी, सन स्क्रीन आणि इतर गोष्टी ठेवत असतो. कित्येक जण उन्हाळयात आपली स्किन टॅन होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेत असतात. पण याच मोसमात फक्त त्वचेची नाही तर डोळ्यांची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात जर आपण आपल्या डोळ्यांची नीट काळजी घेतली नाही तर मग यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. तीव्र सूर्यप्रकाश, धूळ, घाम आणि संसर्ग निर्माण करणारे विषाणू आणि बॅक्टेरिया एकत्रितपणे डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
प्रोटीनसाठी दररोज चिकन खाताय? तर सावधान! मृत्यू येतोय जवळ, नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा
सूर्याच्या तीव्र किरणांमुळे डोळ्यांची नाजूक त्वचा आणि रेटिनाचे नुकसान होऊ शकते. तसेच UV किरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा आणि संसर्ग होऊ शकतो.
उन्हाळ्यात हवेत उडणारी धूळ आणि घाण डोळ्यांत जाऊ शकते, जे जळजळ, खाज आणि लालसरपणा निर्माण करू शकते, ज्यामुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह किंवा एलर्जिक रिएक्शन निर्माण करू शकतो.
उन्हाळ्यात, घामामुळे आपण अनेकदा हात न धुता डोळ्यांना स्पर्श करतो, ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा विषाणू डोळ्यांपर्यंत पोहोचतात.
लग्नाचा विचार सुरु आहे? आधी जोडीदाराला तपासा मगच पुढचं पाऊल टाका… आयुष्याचं सोनं होईल
उन्हाळ्यात अनेक जण थंड पाण्यात पोहण्यास प्राधान्य देतात. हे क्लोरीनयुक्त किंवा दूषित पाणी डोळ्यांत जाऊ शकते. परिणामी, डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो.