जागतिक शाकाहारी दि
दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक शाकाहारी दिन साजरा केला जातो. शाकाहाराबाबत आपल्या मनात येणारा एक नेहमीचा प्रश्न म्हणजे- “शाकाहारी लोक प्रथिने किंवा प्रोटीन्स कुठून मिळवतात?” याचे उत्तर अनेकांना माहीत असते. सगळ्यांचा आवडता पदार्थ आणि जो शतकानुशतके भारतीय स्वयंपाकघरांमध्ये ज्याचा वापर होतो, ते म्हणजे पनीर.
व्हेज पदार्थाला द्या शाही तडका, घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट ‘पनीर बिर्याणी’
प्रथिने, कॅल्शियम आणि अन्य आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असलेले पनीर ताकद, ऊर्जा आणि उत्साह राखण्यास मदत करते. जेवणात त्याचा समावेश केल्याने केवळ पौष्टिक, संतुलित आहारच मिळत नाही तर शाकाहारी आहारात वैविध्यासोबतच तो रुचकर देखील होतो.
पनीरच्या आरोग्यदायी फायद्यांसोबतच चवीबद्दल शेफ तेजा परुचुरी म्हणतात, “पनीर हा एक असा घटक आहे जो अनेक पाककृतींमध्ये वापरता येतो. तो ग्रील्ड, स्टिअर-फ्राईड, सॅलडमध्ये टाकून, करीमध्ये मिसळून किंवा पक्वान्नातही वापरला जातो. आणि या सगळ्या पदार्थात घातल्यानंतरही त्याची चव खूप छान असते. वेगवेगळ्या पाककृतींमध्ये पनीरचा वापर केल्याने, त्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे स्वाद मिसळले जातात. यामुळे पदार्थ रुचकरही बनतो आणि पोषकही.”
दक्षिण भारतीय शैलीतील पालक पनीर नारळाच्या दुधासह
पालक पनीर या आवडत्या उत्तर भारतीय पदार्थात नारळाच्या दुधामुळे एक वेगळीच खास चव येते. उकळत्या पाण्यात थोडा वेळ पालक शिजवून घेऊन त्याची प्युरी करून घ्यावी. मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची त्यात घातली जाते. पनीर घातल्याने थोडी उग्र असलेल्या या भाजीला एक वेगळीच चव येते आणि क्रिमी स्मूथिंगसाठी नारळाचे दूध आहेच. जीरा भात, परोठा, नीर डोसा किंवा डोश्यासोबत ते चांगले लागते. रेसिपीची लिंक
पनीर चिली 65
पनीर चिली 65 ही एक इंडो-फ्यूजन डिश आहे. यात कुरकुरीत तळलेले पनीर लसूण, कढीपत्ता आणि आशियातील खास चवींच्या मिश्रणासह एकत्र केले जाते. केचप, चिली सॉस, सोया आणि मध एकत्र करून चवीचे योग्य ते संतुलन केले जाते. ज्यामुळे ते एक अप्रतिम नाश्ता ठरते. पराठा, फ्राईड राईस किंवा लसूण नानसह एक योग्य पर्याय ठरतो. रेसिपीची लिंक
पनीर चिली 65
पनीर चिली 65 ही एक इंडो-फ्यूजन डिश आहे. यात कुरकुरीत तळलेले पनीर लसूण, कढीपत्ता आणि आशियातील खास चवींच्या मिश्रणासह एकत्र केले जाते. केचप, चिली सॉस, सोया आणि मध एकत्र करून चवीचे योग्य ते संतुलन केले जाते. ज्यामुळे ते एक अप्रतिम नाश्ता ठरते. पराठा, फ्राईड राईस किंवा लसूण नानसह एक योग्य पर्याय ठरतो. रेसिपीची लिंक
मसाला पोडीसोबत कुरकुरीत पनीर पॉपकॉर्न
मसाला पोळीसोबत कुरकुरीत पनीर पॉपकॉर्न हा नाश्त्यासाठी एकदम योग्य पदार्थ आहे. यात पनीरचे मऊ तुकडे मॅरीनेट केले जातात. मग ते मसालेदार पिठातून काढून घेऊन ब्रेडक्रम्स आणि पोळीमध्ये घोळवले जातात. नंतर ते सोनेरी होईपर्यंत तळले जातात. पोडीमध्ये केलेला शेवटचा टॉस याला फायनल टच देतो. मसालेदार मेयोनेज, पुदिन्याची चटणी किंवा लिंबू पिळून याची अत्यंत अशी सुरेख चव अनुभवता येते.
दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
रेस्टॉरंटसारखे पनीर लबाबदार
पनीर लबाबदार हा एक मस्त चवीचा करी पदार्थ आहे. यात काजू-टोमॅटोच्या बटरी ग्रेव्हीत पनीरचे मऊ तुकडे असतात. रेस्टॉरंटचा फील देण्यासाठी त्यात कसुरी मेथी आणि अतिरिक्त स्वादासाठी किसलेले पनीर घालून बनवलेली ही डिश नान, रोटी किंवा पुलावसोबत सुंदर लागते.