Maharashtra Breaking News Updates Today:
10 Jul 2026 09:10 AM (IST)
Minor Student Gives Birth Ashram School : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी भागातील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. या अत्याचारामुळे ही विद्यार्थिनी गरोदर राहिली होती. कळवण पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याची कायदेशीर प्रक्रियेनंतर बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
10 Jul 2026 09:05 AM (IST)
Mumbai Lakes Water Level: मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. मुंबईला दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रांमध्ये सध्या पावसाने दमदार बॅटिंग सुरू ठेवली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने आणि मोठी वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, या सर्व सातही धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा आता ४८.५९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
10 Jul 2026 09:02 AM (IST)
Vaibhav Suryavanshi: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा महत्त्वाचा सामना सध्या खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेकीचा (Toss) कौल भारतीय संघाच्या बाजूने लागला आणि कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ (Playing 11) खेळाडूंमध्ये बदल करण्यात आला, मात्र हा बदल फलंदाजीत न करता केवळ गोलंदाजीच्या फळीत करण्यात आला. त्यामुळे स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनला या सामन्यातही संधी मिळाली नसून, त्याला सलग तिसऱ्या सामन्यात बेंचवरच बसावे लागले आहे.
दुसरीकडे, संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेल्या १५ वर्षीय युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. अभिषेक शर्मासोबत सलामीला आलेल्या वैभवने केवळ १० चेंडूंत १५ धावा केल्या. या छोट्या खेळीत त्याने १ षटकार आणि १ चौकार लगावला, परंतु तो खेळपट्टीवर फार काळ टिकू शकला नाही.
10 Jul 2026 08:42 AM (IST)
Weather Forecast IMD : गेल्या चार-पाच दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आता काहीसा कमी होताना दिसत आहे. राज्यात जरी मॉन्सून उशिराने दाखल झाला असला, तरी अवघ्या ५ ते ६ दिवसांच्या धुव्वाधार पावसामुळे जून महिन्याची सरासरी भरून निघाली आहे. या जोरदार बॅटिंगमुळे राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत मोठी आणि दिलासादायक वाढ झाली आहे. अनेक सखल भागांत साचलेले पाणी ओसरत असून, दरडी कोसळलेल्या भागांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
सातारा आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात आजही हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासाठी आज 'येलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे. पाऊस कमी होत असला तरी डोंगराळ भागात किंवा घाटातून प्रवास करताना नागरिकांनी आणि पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ब्रिस्टल : फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने काउंटी ग्राऊंडवर भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना ९ गडी राखून जिंकला. या विजयासह, यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर आता नव्या मालिकेची कामगिरी समोर आली आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना ११ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडने १५९ धावांचे लक्ष्य केवळ १३.५ षटकांत पूर्ण केले, म्हणजेच संघाने ३६ चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. १५० पेक्षा जास्त धावा केल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे. एकूणच, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताला केवळ दोनदाच अधिक चेंडू शिल्लक असताना पराभव पत्करावा लागला आहे.






