Maharashtra Breaking News Updates Today:
Parliament Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
New Delhi : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार दोन महत्त्वाचे अजेंडे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यातील पहिला अजेंडा ‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर करणे, तर दुसरा परिसीमन प्रक्रिया लागू करणारा कायदा संमत करणे आहे. हा कायदा मंजूर झाल्यास देशातील लोकसभेच्या जागांची संख्या वाढून ८०० पेक्षा जास्त होईल. यासाठी सरकार ‘इंडिया’ आघाडीत फूट पाडण्याचीही तयारी करत असल्याचे समजते.
समाजवादी पक्ष आणि इतर काही पक्षांना महिला आरक्षण विधेयकाबाबत आक्षेप नाही. मात्र, त्यांचे म्हणणे आहे की, संसदेत महिलांच्या जागा वाढवण्याबाबत चर्चा केली जाते, तेव्हा त्या जागांवर आरक्षणाची नेमकी काय स्थिती असेल हेदेखील स्पष्ट करावे. सध्या लोकसभेच्या जागांमध्ये एससी आणि एसटींसाठी आरक्षणाची तरतूद आहे. समाजवादी पक्ष आणि इतर पक्षांची मागणी आहे की, महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या ३३ टक्के जागांमध्येही अंतर्गत आरक्षणाची तरतूद करण्यात यावी.
09 Jul 2026 06:47 PM (IST)
India Rain Alert/Weather Update: गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जून महिना संपूर्ण गेल्याने चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आगे. गेले टिन ते चार दिवसांमध्ये राज्यात आणि देशभरात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यासह 18 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने कोणत्या स्वरूपाचा इशारा दिला आहे त्याबाबत जाणून घेऊयात.
09 Jul 2026 06:37 PM (IST)
Business Ideas : करिअर घडवण्याच्या पद्धती आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. पूर्वी असे मानले जायचे की, चांगल्या नोकरीसाठी आणि मोठ्या कमाईसाठी कॉलेजची पदवी (Degree) असणे सर्वात महत्त्वाचे आहे; पण आता हा विचार झपाट्याने बदलत आहे. डिजिटल युगात असे अनेक व्यवसाय आहेत, जे सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रोफेशनल डिग्रीची गरज नसते. जर तुमच्याकडे कामाची योग्य समज, कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि लोकांची गरज ओळखण्याची कला असेल, तर तुम्ही स्वतःचा एक यशस्वी व्यवसाय उभा करू शकता.
09 Jul 2026 06:23 PM (IST)
India Rain Alert/Weather Update: गेले काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जून महिना संपूर्ण गेल्याने चिंता वाढली होती. मात्र जुलै महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आगे. गेले टिन ते चार दिवसांमध्ये राज्यात आणि देशभरात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र राज्यासह 18 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
09 Jul 2026 06:13 PM (IST)
PM Narendra Modi ON Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. भाषणात त्यांनी सांगितले की, भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांनी जागतिक स्तरावर एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे देशाच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याचा पुरावा असल्याचे वर्णन करून ते म्हणाले की, दहशतवादी छावण्यांवरील हल्ल्यांचे पडसाद जगभर उमटले.
09 Jul 2026 06:05 PM (IST)
Supreme Court on OBC Reservation: धर्मांतर करून इस्लाम स्वीकारणाऱ्या व्यक्तींना इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणाचा लाभ मिळावा की नाही, याबाबतचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. या प्रकरणी तमिळनाडू सरकारने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमति याचिका (एसएलपी) दाखल केली आहे.
09 Jul 2026 06:00 PM (IST)
देशाच्या अनेक भागांमध्ये मागील काही काळापासून जोरदार पावसाने जोर धरला आहे. काही झाली तर पाऊस इतका पडला आहे की पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले असून लोकांचे घराबाहेर पडणे ही कठीण झाले आहे. पुराच्या अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच अलीकडे एकदा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. देशात गॅस सिलेंडरची कमतरता भासत असतानाच सोशल मीडियावर बाहेर होत असलेल्या या व्हिडिओत एक दोन नव्हे तर तब्बल 3000 सिलेंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसून आले. नदीमध्ये वाहणारी ही सिलेंडर पाहून अनेकांना धक्का बसला तर घटना नक्की कुठली असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
09 Jul 2026 05:50 PM (IST)
धाराशिव : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील ७ हजार ६२९ शेतकऱ्यांची कर्ज खात्यांची माहिती सहकार विभागाच्या पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात आली असून, या पात्र लाभार्थ्यांना एकूण ५३ कोटी १६ लाख ८ हजार रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
09 Jul 2026 05:40 PM (IST)
India Vs England 4th T20 Live Updates: आज भारत अन् इंग्लंड यांच्या टी 20 सिरिजमधील चौथा सामना होणार आहे. आजचा सामना खऱ्या अर्थाने भारतीय संघासाठी महत्वाचा असणार आहे. आज हा सामना रात्री काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ स्थितीचा असणार आहे. आजच्या सामन्यात इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.
09 Jul 2026 05:30 PM (IST)
मुळशी पॅटर्न सिनेमातून महाराष्ट्रभरात आपल्या अभिनयाचा बोलबाला गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा अँग्री यंग मॅन अभिनेता ओम भुतकर बोहल्यावर चढल्याच्या चर्चा संपूर्ण सोशल मीडियावर होत आहेत. ओम भुतकरने लग्न केलं असल्याच्या चर्चांसहित लग्नाचे फोटोजही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. याबाबत ओम भुतकरने त्याच्या चाहत्यांना कोणत्याही प्रकारची चाहूल लागू दिली नव्हती. त्याच्या लग्नाबाबत कोणत्याही चर्चा ऐकण्यात नव्हत्या. अचानक त्याच्या लग्नाचे फोटोज समोर आल्याने त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ओम भुतकर खरंच बोहल्यावर चढला आहे की चर्चेत असणारे फोटोज त्याच्या आगामी सिनेमाचे शूटिंग? या गोष्टी अद्याप अधिकृतरित्या जाहीर नाहीत.
09 Jul 2026 05:20 PM (IST)
राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना याबाबत मोठे विधान केले आहे.
09 Jul 2026 05:10 PM (IST)
Maharashtra Political: शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अलीकडील भेटीनंतर राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम (Yogesh Kadam) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे दर्शवते की संजय राऊत कोणाशीही खऱ्या अर्थाने एकनिष्ठ राहू शकत नाहीत.
09 Jul 2026 05:01 PM (IST)
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) स्पर्धा आता सर्वात रोमांचक आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. प्रथमच या स्पर्धेत ४८ संघानी भाग घेतला होता. यापैकी ४० संघाचा प्रवास संपला आहे तर फक्त ८ संघ विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहेत. ट्रॉफीच्या रेससोबतच गोल्डन बूट पुरस्कारासाठीची शर्यतही रंगली आहे. किलियन एमबाप्पे, लिओनेल मेस्सी आणि अर्लिंग हालंड यांच्यात हा पुरस्कार जिंकण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. सध्या अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे गोल्डन बूटसाठीची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूंना सिल्व्हर आणि ब्राँझ बूट पुरस्ताक दिले जातात.
09 Jul 2026 04:57 PM (IST)
राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना याबाबत मोठे विधान केले आहे. वाचा सविस्तर...
09 Jul 2026 04:47 PM (IST)
शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अलीकडील भेटीनंतर राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. या मुद्द्यावर भाष्य करताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम (Yogesh Kadam) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे दर्शवते की संजय राऊत कोणाशीही खऱ्या अर्थाने एकनिष्ठ राहू शकत नाहीत. वाचा सविस्तर...
09 Jul 2026 04:37 PM (IST)
सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये टी 20 सिरिज सुरू आहे. आज त्याचा चौथा सामना खेळवला जाणार आहे. मात्र हा दौरा भारतीय संघासाठी कठीण ठरताना दिसून येत आहे. अद्याप भारतीय संघाला एकही विजय मिळवता आलेला नाहीये. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे. मात्र इंग्लंड दौऱ्यात सलग मिळत असलेल्या पराभवांमुळे आता भारतीय संघाचे आयसीसी रँकिंगमधील अव्वल स्थानही धोक्यात आले आहे. वाचा सविस्तर...
09 Jul 2026 04:27 PM (IST)
राज्यभर गाजत असलेल्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर आता सातारा जिल्ह्यातही राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महावितरण कंपनीकडून घरगुती तसेच उद्योग-व्यवसायिक ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. १०) दुपारी २ वाजता कृष्णानगर येथील महावितरण कार्यालयावर आक्रमक आंदोलन छेडण्यात येणार आहे. वाचा सविस्तर...
09 Jul 2026 04:23 PM (IST)
परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. आरटीओ विभागातील कथित गैरव्यवहारांप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली.
09 Jul 2026 04:20 PM (IST)
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने ‘नवभारत कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विषयांवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर बोलताना कलाकार म्हणून देशाप्रती असलेली जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे ती म्हणाली. कलाकारांकडे त्यांच्या कलेच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची ताकद असल्याचेही तिने नमूद केले. वाचा सविस्तर...
09 Jul 2026 03:59 PM (IST)
देशभरात पेट्रोलमधील इथेनॉलचे (E20 ब्लेंड) प्रमाण वाढल्याने वाहनांच्या कार्यक्षमतेबाबत एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचा दावा आहे की E20 पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत आहे आणि इंधनाची बचत कमी होत आहे. याचदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता या चिंतांचे स्पष्टीकरण दिले आहे. गडकरी यांनी स्पष्ट केले की, E20 पेट्रोलमुळे वाहनाच्या इंधनाच्या बचतीवर किंचित परिणाम होऊ शकतो, परंतु त्यामुळे इंजिनचे कोणतेही नुकसान होणार नाही.
09 Jul 2026 03:50 PM (IST)
मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या सततच्या पावसामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला असून शहरातील जलाशयांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसानंतर, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाल्याचे अहवालांवरून दिसून येते.
09 Jul 2026 03:40 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांच्या टी- २० मालिकेतील चौथा सामना आज ९ जुलै रोजी ब्रिस्टल येथील काउंटी ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सामना रात्री १०:०० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक त्यापूर्वी अर्धा तास, म्हणजेच रात्री ९:३० वाजता होईल. भारतीय संघासाठी हा सामना करो किंवा मरो असा असणार आहे. कारण टीम इंडिया मालिकेत आधीच ०-२ ने पिछाडीवर आहेत. जर भारतीय संघाला मालिका गमवायची नसेल तर त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितित जिंकावा लागेल.
09 Jul 2026 03:30 PM (IST)
पराजधानीचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठे लॉजिस्टिक हब आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांसह जागतिक दर्जाचे विमानतळ विकसित करण्याची घोषणा जीएमआर एअरोचे कार्यकारी संचालक एस. जी. के. किशोर आणि नागपूर विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत भांडारकर यांनी बुधवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
मिहान इंडियाने २५ जून रोजी जीएमआर एअरोला विमानतळ हस्तांतरण केल्यानंतर कंपनीच्यावतीने आगामी तीन दशकांतील योजनांची माहिती देण्यात आली. गुजरात, ओरिसापासून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक शक्य आहे. त्यासाठी कार्गो हबच्या दिशेने प्रयत्न करण्यात येतील.
09 Jul 2026 03:20 PM (IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार,9जुलै) रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका टीका केली. मिसिंग लिंक दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या विधानांवरून राज ठाकरे यांनी आज चांगलयच शब्दांत समाचार घेतला. यावेळी त्यांनी त्यांनी नफडणवीसांची मिमिक्री देखील केली. तसेच, सरकारवर हल्लाबोल करून सत्तेतील लोकांच्या मुजोरीबाबतही सवाल उपस्थित केले
09 Jul 2026 03:10 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर फंलदाज अभिषेक शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळत आहे. अभिषेकने त्याच्याबद्दलच्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट हटवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात शर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने, अद्याप न हटवलेल्या URLs ची माहिती देत एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यावर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी सांगितले की, अभिषेक शर्माच्या व्यक्तिमत्व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या खटल्यात अंतरिम आदेश जारी करतील.
09 Jul 2026 02:40 PM (IST)
‘ज्या गद्दाराने आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशाप्रकारच्या बैठका घेतल्या तर यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते,’ अशा खरमरीत शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. याचे कारण म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार बुधवारी (८ जुलै) एका बैठकीनिमित्त विधानभवनात गेले होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात त्यांच्या पक्षाची बैठक घेतली. लक्षणीय बाब म्हणजे, एकनाथ शिंदे यांनीदेखील मंत्रिमंडळाची बैठक सोडून दालनात येऊन शरद पवार यांचे स्वागत केले.
09 Jul 2026 02:35 PM (IST)
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अस्थायी जागेसाठी जून २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत जर्मनीचा अत्यंत धक्कादायक आणि ऐतिहासिक पराभव झाला आहे. युरोपसाठी राखीव असलेल्या दोन जागांच्या शर्यतीत पोर्तुगाल (१३४ मते) आणि ऑस्ट्रियाने (१३१ मते) बाजी मारली, तर जर्मनीला केवळ १०४ मतांवर समाधान मानावे लागले. संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासामध्ये जर्मनीचा हा पहिलाच मोठा पराभव मानला जात असून, या निकालामुळे भारतीय राजनैतिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
09 Jul 2026 02:25 PM (IST)
आज सलग चौथ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केले की, इराणसोबतचा अंतरिम करार संपुष्टात आला आहे. यामुळे पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची महागाई आणि व्याजदरांबद्दलची चिंता पुन्हा वाढली आहे. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर होत आहे. एमसीएक्सवर (MCX) आज सलग चौथ्या दिवशी सोने आणि चांदीच्या व्यापाराची सुरुवात घसरणीने झाली.
09 Jul 2026 02:10 PM (IST)
महाराष्ट्र विधानभवन परिसरात आज (9 जुलै 2026) शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी झाडांवर चढत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे विधानभवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांची मोठी कसरत करावी लागली.
09 Jul 2026 02:10 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नाटो शिखर परिषदेदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. पत्रकार परिषदेत इराणवरील अमेरिकेच्या कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प यांनी चुकून ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ ऐवजी ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ जपान’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. तुर्कस्तानमध्ये सुरू असलेल्या नाटो शिखर परिषदेदरम्यान ट्रम्प पत्रकारांशी संवाद साधत होते.
09 Jul 2026 02:05 PM (IST)
सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमिनीच्या हद्दीच्या वादाने बुधवारी हिंसक वळण घेतले. जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आले आणि त्याचे रूपांतर तलवार व दगडांनी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले असून संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. घडलेली घटना वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावातील आहे.
09 Jul 2026 02:00 PM (IST)
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पेट्रोलमधील इथेनॉलच्या मुद्यावर भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलमधील इथेनॉलचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या केजरीवाल यांनी सांगितले की, ते २९ वाहन उत्पादक कंपन्यांना पत्र लिहून या विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगणार आहेत.
09 Jul 2026 01:59 PM (IST)
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसशी संबंधित कथित फंडिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने पक्षाच्या बँक खात्यांमधील सुमारे ४४० कोटी रुपयांच्या निधीवर तपास सुरू करत ही खाती गोठवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेच्या या धडक कारवाईमुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
09 Jul 2026 01:55 PM (IST)
राष्ट्रीय महामार्गावरील काशीमीरा परिसरातील घोडबंदर गावात, ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५० फूट उंच ब्राँझ धातूच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारकाला अवघ्या २० महिन्यांतच गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या स्मारकाच्या चौथऱ्यावर पावसाचे पाणी झिरपत असल्याचे दिसून आले असून, त्यामुळे स्मारकाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
09 Jul 2026 01:45 PM (IST)
रिलायन्स जिओने 55 किमतीचा नवीन जिओटीव्ही प्रो पॅक सादर केला आहे. या नवीन प्लॅनद्वारे तुम्ही जिओटीव्ही मोबाईल ॲपवरून एक हजारांहून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल पाहू शकता. हा नवीन प्लॅन केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित करणारा कमी खर्चाचा पर्याय शोधणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. अवघ्या ५५ रुपयांच्या या प्लॅनद्वारे वापरकर्त्यांना मोबाईलवर १००० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स पाहण्याची सुविधा मिळते. चित्रपट, मालिका, बातम्या, क्रीडा आणि मनोरंजन अशा विविध प्रकारचे चॅनेल्स एकाच प्लॅनमध्ये उपलब्ध असल्याने हा प्लॅन अनेकांसाठी आकर्षक ठरू शकतो.
09 Jul 2026 01:40 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नाटो शिखर परिषदेदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. पत्रकार परिषदेत इराणवरील अमेरिकेच्या कारवाईचे समर्थन करताना ट्रम्प यांनी चुकून ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’ ऐवजी ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ जपान’ असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. तुर्कस्तानमध्ये सुरू असलेल्या नाटो शिखर परिषदेदरम्यान ट्रम्प पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाबद्दल भाष्य करताना अमेरिकेच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले.
09 Jul 2026 01:35 PM (IST)
अमेरिका आणि इराण (US-Israel Iran War) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला असून, दोन्ही देशांमधील संघर्षामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या हवाई कारवाईनंतर इराणने कठोर प्रतिक्रिया देत अमेरिकेला “दादागिरी आणि वचनभंगाची किंमत मोजावी लागेल” असा थेट इशारा दिला आहे. यासोबतच जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्री व्यापार मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीबाबतही इराणने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
09 Jul 2026 01:30 PM (IST)
आज सलग चौथ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी जाहीर केले की, इराणसोबतचा अंतरिम करार संपुष्टात आला आहे. यामुळे पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची महागाई आणि व्याजदरांबद्दलची चिंता पुन्हा वाढली आहे. याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरांवर होत आहे. एमसीएक्सवर (MCX) आज सलग चौथ्या दिवशी सोने आणि चांदीच्या व्यापाराची सुरुवात घसरणीने झाली.
09 Jul 2026 01:25 PM (IST)
जर तुमचे भारतीय नौदलात सामील होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. इंडियन नेव्हीने एसएससी ऑफिसर (SSC Officer) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत, ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२६ आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण २७५ उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
09 Jul 2026 01:15 PM (IST)
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या मेटाने आता आपले पहिले AI इमेज जनरेटर ‘Muse Image’ सादर केले आहे. या नव्या AI मॉडेलच्या मदतीने अधिक वास्तवदर्शी, वैयक्तिक आणि उच्च दर्जाच्या प्रतिमा तयार करता येतील, असा कंपनीचा दावा आहे. Meta च्या AI विभागाने विकसित केलेल्या या मॉडेलचे नेतृत्व कंपनीचे चीफ AI ऑफिसर अलेक्झांडर वँग करत आहेत.
09 Jul 2026 01:05 PM (IST)
युवा भारतीय टेनिसपटू अर्णव पापरकर विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. हा १८ वर्षीय खेळाडू मुलांच्या एकेरीमध्ये खेळत आहे. तिसऱ्या फेरीत त्याचा सामना जपानच्या रयो ताबाटाशी झाला. भारतीय खेळाडूने हा सामना ६-२, ६-२ असा सहज जिंकला. दुसऱ्या फेरीत अर्णवने तिसऱ्या मानांकित अमेरिकन खेळाडू कीटन हेन्सचा पराभव केला होता.
09 Jul 2026 12:59 PM (IST)
राज्यात शिक्षक संघटनांनी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे. आज ९ जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलनात जर कोणी शाळा बंद ठेवून सहभागी झाले, तर संबंधितांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
09 Jul 2026 12:47 PM (IST)
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवलंय... आळंदीतील गांधी वाड्यातील मुक्कामानंतर सकाळी 6 वाजता पालखी मार्गस्थ झालीय... पिंपरी-चिंचवड आणि विश्रांतवाडी मार्गे पालखी संगमवाडीत येणारय... तिथे दोन्ही माऊलींचा पालखी संगम होणारय... टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकरी वारीत सहभागी झाले आहेत.
09 Jul 2026 12:34 PM (IST)
विधानभवनासमोर क्रांतीकारी संघटना आक्रमक, सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी, रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
09 Jul 2026 12:26 PM (IST)
सावंतवाडीतील न्हावेली गावात गेल्या 3 दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. गावासाठी स्वतंत्र वायरमनची मागणी करणाऱ्या सरपंचांवर महावितरणच्या अधिकाऱ्याने अरेरावीची केलीय. वायरमन देणार नाही, काय करायचे ते करून घ्या, अशा मुजोर भाषेमुळे ग्रामस्थ संतापलेत. अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी नागरिक करतायत.
09 Jul 2026 12:15 PM (IST)
कोल्हापुरात ऐतिहासिक छत्रपती शाहू मिलची पडझड सुरूच, मुसळधार पावसामुळे शाहू मिलची संरक्षक भिंत ढासळली, कोटीतीर्थ तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडील भिंतीचा काही भाग कोसळला, कोल्हापुरात सुरू असणाऱ्या पावसाचा परिणाम, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या ऐतिहासिक ठेव्याचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज
09 Jul 2026 12:00 PM (IST)
जर तुम्हाला वाटत असेल की आयआयटी (IIT) मध्ये शिकण्याची संधी केवळ इंजिनिअरिंग किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांनाच मिळते, तर हा समज पूर्णपणे बरोबर नाही. आता आर्ट्स (कला शाखा), ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स (सामाजिक शास्त्रे) चे विद्यार्थी देखील GATE XH परीक्षेच्या माध्यमातून देशातील प्रतिष्ठित IITs आणि इतर टॉप संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेऊ शकतात. नॉन-टेक्निकल बॅकग्राउंड असलेल्या विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IITs) सह इतर संस्थांमध्ये शिक्षण आणि संशोधनाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाते.
09 Jul 2026 11:50 AM (IST)
रोहित शेट्टीच्या सुपरहिट ‘गोलमाल’ फ्रँचायझीचा पाचवा भाग ‘गोलमाल ५’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटासंदर्भात एक मोठे अपडेट समोर आले असून, ‘जवान’ फेम अभिनेत्री प्रियामणी या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे.
09 Jul 2026 11:40 AM (IST)
ईपीएफओने एक मोठी डिजिटल सुधारणा पूर्ण केली असून, त्यामुळे लाखो सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सर्व पीएफ सदस्यांची माहिती यशस्वीरित्या एका केंद्रीकृत डेटाबेसमध्ये हस्तांतरित करण्यात आली. नुकत्याच झालेल्या या सुधारणेनंतर, ईपीएफओच्या ऑनलाइन सेवा, ज्या स्थगित करण्यात आल्या होत्या, त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या म्हणण्यानुसार, नवीन प्रणालीअंतर्गत, पीएफ दावे आता ईपीएफओ कार्यालयातील अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी आपोआप तपासले जातील. अर्जातील कोणत्याही चुका किंवा त्रुटी सुरुवातीलाच लक्षात येतील. चला जाणून घेऊया, हे नवीन पोर्टल तुमचे काम कसे सोपे करेल.
09 Jul 2026 11:30 AM (IST)
ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला पूर आल्याने मोहने जलशुद्धीकरण केंद्रातील पंपांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यातच नदीच्या तीव्र प्रवाहामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची (KDMC) मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा गेल्या ४८ तासांपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीच्या पूर्व व पश्चिम भागातील हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा फटका बसला आहे. बेतुरकर पाडा परिसरातील महिला बादल्या, टब आणि ड्रममध्ये थेट पावसाचे पाणी साठवून आपली गरज भागवत आहेत, तर काही नागरिकांवर हे पावसाचे पाणी गाळून आणि उकळून पिण्याची वेळ आली आहे.
09 Jul 2026 11:20 AM (IST)
जर तुम्ही अविवाहित महिला इंजिनिअरिंग पदवीधर (Engineering Graduate) असाल आणि भारतीय सेनेत (Indian Army) अधिकारी बनण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. भारतीय सेनेने ६८ व्या शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) तांत्रिक महिला अभ्यासक्रमासाठी (Technical Women Course) अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३० पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांना ८ जुलै २०२६ ते ६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण एप्रिल २०२७ पासून बिहारमधील गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) मध्ये सुरू होईल.






