Maharashtra Breaking News Updates Today:
राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ, जे मूळ महाराष्ट्राचे रहिवासी आहेत, त्यांनाच आता बाईक-टॅक्सी चालवता येईल. याशिवाय, बाईक-टॅक्सी चालवणाऱ्यांना मराठी भाषा येणेही बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची ओळख, कागदपत्रांची पडताळणी निश्चित करण्यासाठी नियमावलीत आवश्यक बदल करण्यात येत आहेत.
08 Jul 2026 06:20 PM (IST)
Baramati Water Supply: बारामती शहराला नीरा डाव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यावर आधारित पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने काही दिवसांपूर्वी नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाले होते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करण्यासाठी बारामती नगरपरिषदेकडून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता.
08 Jul 2026 06:05 PM (IST)
India Vs England T20 Series: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. त्यानंतर 3 सामन्यांची वनडे सिरिज देखील खेळवली जाणार आहे. टी 20 सिरिजमधील 3 सामने पूर्ण झाले आहेत. कालच्या म्हणजेच तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा विकेटकिपर असलेल्या जोस बटलरने एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. कालच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा तब्बल 125 रन्सने पराभव करत या सिरिजमध्ये आघाडी घेतली आहे.
08 Jul 2026 06:00 PM (IST)
अरुणाचल प्रदेशातील ताक्तसिंग (Taktsing) सीमावर्ती भागात चीनने भारताची जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. बुधवारी (८ जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी हा मुद्दा सरकारसमोर ठामपणे मांडणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
08 Jul 2026 05:50 PM (IST)
PCMC Building Collapse: गेल्या आठवडाभरापासून पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आजही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील मोशी भागात एक इमारत पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. मोशी कचरा डेपोजवळ ही इमारत आहे. घटना घडली त्यावेळी इमारतीत त्यावेळी काही लोक असल्याची माहिती आहे.
08 Jul 2026 05:40 PM (IST)
सिनेमा पाहण्यासाठी आतुरलेले डोळ्यांना काही काळ सुखाची अनुभूती मिळणार तर काही डोळ्यांसाठी ही उत्सुकता आणखीन दाट करण्याची पर्वणी ठरणार आहे. अभिनेता रणबीर कपूर स्टारर सिनेमा ‘रामायण‘चा ट्रेलर 18 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. एकंदरीत, सिनेमाच्या निर्मात्यांकडून प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांअगोदर, हनुमान जयंतीच्या निमित्ताने सिनेमात असणारा रणबीर कपूरचा लुक प्रसिद्ध करण्यात आला होता. सिनेमात रणबीर प्रभू रामांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दाक्षिणात्य सिनेमात आपल्या सौंदर्य आणि साधेपणाने संपूर्ण सिनेचाहत्यांचे मन जिकणारी अभिनेत्री सई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे. KGF सिनेमाचा हिरो यश या सिनेमात रावण म्हणून झळकणार आहे. तसेच अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
08 Jul 2026 05:30 PM (IST)
महाराष्ट्रभरात गेल्या काही दिवसांपासून जसे पावसाच्या चर्चा आहेत त्याचप्रमाणे मराठी सिनेप्रेमींच्या चर्चेत मीरा जगन्नाथ हे नाव गेल्या काही काळापासून आहे. अगदी आठ्वड्याभरापूर्वी मीराच्या मुंबईतील नव्या घरी पूजा पार पडली आणि गेला आठवडा पावसाने मुंबईत हजेरी लावली. तेव्हापासून पावसाने काही विश्रांती घेतली नाही. अशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आनंदाची बातमी देणाऱ्या मीराने अचानक तिची तारेवरची कसरत शेअर केल्याने तिच्या चाहत्यांनी तिच्यासाठी सहानभूती दाखवली आहे.
08 Jul 2026 05:20 PM (IST)
मुंबई: भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित “देख ले! इंडिया” या माहितीपट बुधवारी लोक भवन येथे दाखवण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा उपस्थित होते. युनिसेफ महाराष्ट्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शासकीय अधिकारी, दिव्यांग हक्क कार्यकर्ते आणि क्रीडापटू सहभागी झाले.
08 Jul 2026 05:10 PM (IST)
मुंबईतील आपल्या वार्षिक बिजनेस समिटच्या तिसऱ्या एडिशनमध्ये व्हॉट्सअॅपने आज मेटा बिजनेस एजंट एआयची घोषणा केली. हे एआय प्रत्येक व्यवसायाला त्याच्या प्रत्येक ग्राहकासाठी, प्रत्येक क्षणी उपलब्ध राहण्यास मदत करेल, जिथे त्यांच्या पाठीशी अथांग टीम काम करत आहे असे त्यांना वाटेल. मेटा बिजनेस एजंट व्यवसायांना व्यापक प्रमाणावर जलद आणि अधिक वैयक्तिकृत ग्राहक अनुभव देण्यास सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
08 Jul 2026 05:01 PM (IST)
सातारा : सातारा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेले आहेत. या बिघाडामुळे पश्चिम भागातील अनेक परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सततच्या पावसामुळे डोंगर उतारावरील माती जलवाहिनीवर कोसळल्याने पाइपलाइनवर मोठा दाब निर्माण झाला. परिणामी जलवाहिनीला तडे जाऊन मोठ्या प्रमाणात पाणी गळू लागले. घटनेची माहिती मिळताच सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले.
08 Jul 2026 04:57 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या क्रूर हल्ल्याचे प्रकरण आता एका मोठ्या राजकीय वादात रूपांतरित झाले आहे. एनआयसीयू (NICU) वॉर्डमध्ये बेड उपलब्ध नसल्याच्या कारणावरून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी एका महिला स्त्रीरोगतज्ज्ञ व नर्सिंग कर्मचाऱ्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी या लज्जास्पद घटनेवरून उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. वाचा सविस्तर...
08 Jul 2026 04:47 PM (IST)
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता कमालीचा वाढला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे सर्व मार्ग बंद होताना दिसत आहेत. तुर्कीची राजधानी अंकारा येथे आयोजित नाटो (NATO) शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात झालेला तात्पुरता सामंजस्य करार (MoU) आता पूर्णपणे संपुष्टात आला असल्याचे त्यांनी जाहीर केले. ट्रम्प यांच्या या अनपेक्षित आणि मोठ्या निर्णयामुळे इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने केलेले मध्यस्थीचे सर्व राजनैतिक प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. वाचा सविस्तर...
08 Jul 2026 04:37 PM (IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई वाहतुकीवर परिणाम झाला. याचदरम्यान पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पात भूस्खलन झाल्याने हा मार्ग जवळपास 20 तास बंद ठेवावा लागला. या घटनेनंतर विरोधकांनी प्रकल्पावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सरकारवर जोरदार टीका केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर उत्तर देत विरोधक आणि ट्रोलर्सवर निशाणा साधला. वाचा सविस्तर...
08 Jul 2026 04:27 PM (IST)
खगोलप्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे. आगामी १२ ऑगस्ट रोजी अवकाशात एक असा दुर्मिळ योगायोग घडणार आहे, जो मानवी आयुष्यात क्वचितच पाहायला मिळतो. शास्त्रज्ञांच्या मते, शेकडो किंवा हजारो वर्षांतून एकदाच असा ‘खगोलीय दुहेरी ठसा’ उमटतो, जिथे एकाच दिवशी खग्रास सूर्यग्रहण आणि भव्य उल्कावर्षाव (Meteor Shower) एकत्र अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी खगोलप्रेमींना कोणत्याही महागड्या उपकरणाची गरज भासणार नाही. वाचा सविस्तर...
08 Jul 2026 04:17 PM (IST)
एकीकडे अमेरिका-इराणमध्ये युद्धाचा पुन्हा भडका उडला आहे तर दुसरीकडे टॅरिफचा विषय पुन्हा टांगणीला आहे. भारताने अमेरिकेला भारतीय आयातीवर १२.५% अतिरिक्त शुल्क लावण्याचा आपला प्रस्ताव मागे घेण्याचे आवाहन केले आहे. सक्तीच्या मजुरीचा समावेश असलेल्या व्यापारी प्रथांसंबंधी कलम ३०१ अंतर्गत सुरू असलेल्या चौकशीअंतर्गत हा प्रस्ताव आहे. भारताचे म्हणणे आहे की, या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी पुरेसे पुरावे किंवा देश-विशिष्ट मूल्यांकन उपलब्ध नाही. नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर...
08 Jul 2026 04:07 PM (IST)
JEE Advanced Success Story: आपल्याला ठाऊक आहे की, सामान्यतः १४ वर्षांची मुले आठवी किंवा नववीत शिकत असतात. परंतु, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी-चौरा येथील रहिवासी युवराजने या वयात अशी कामगिरी केली आहे, जिचे स्वप्न लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षांच्या तयारीनंतरही पूर्ण करू शकत नाहीत. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्याने देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली ‘JEE Advanced’ यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. विशेष म्हणजे, युवराजने हिंदी माध्यमातून शिक्षण घेत आणि ऑनलाइन तयारीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे हे सिद्ध झाले आहे की, गुणवत्ता, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीसमोर वय आणि भाषा यासारख्या अडचणीने फरक पडत नाही. वाचा सविस्तर...
08 Jul 2026 03:59 PM (IST)
राज्यातील राजकीय वातावरणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. आधी शिवसेना ठाकरे गटातून खासदार फुटल्यानंतर आता महाविकास आघाडीमधूनही आमदार आणि खासदार फुटणार असल्याच्या चर्चाना वेग आला आहे. अश्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (मंगळवार, 7 जुलै) गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे चर्चाना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बंद दाराआड बैठक पार पडली. नर्मदा प्रकल्पाच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा झाली असून राज्यातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटाच्या खासदारांबाबत महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
08 Jul 2026 03:50 PM (IST)
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. यजमान इंग्लंडने टीम इंडियाला १२५ धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लंडला ५ सामन्याच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी मिळाली. इंग्लंडने प्रथम फंलदाजी करत २०१ धावांचा डोंगर उभारला. लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघ केवळ ७६ धावांवर सर्वबाद झाला. या पराभवामुळे भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. जो टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघावर यापूर्वी कधीही नोंदवला नव्हता.
08 Jul 2026 03:40 PM (IST)
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) सप्टेंबर-नोव्हेंबर २०२६ च्या सीए (CA) परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. यासोबतच परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. उमेदवार सीए फाउंडेशन, सीए इंटरमीडिएट आणि सीए फायनलसाठी सीए सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर (SSP) जाऊन अर्ज करू शकतात.
08 Jul 2026 03:30 PM (IST)
सातारा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व संपर्कापासून कोसो दूर असलेल्या कांदाटी खोऱ्यातील नागरिकांच्या वेदनेचा महापूर थांबायचे नाव घेत नाही. जनसुविधांचा हरताळ, मूलभूत सुविधांची कमालीची वानवा त्यातच वर्षानुवर्षे आपत्ती झेलत निसर्गाच्या प्रकोपाशी दोन हात करत कशीबशी जगणारी इथली भाबडी जनता गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाप्रलयात पुरती भेदरली आहे.
सततच्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठमोठी झाडे व दरडी कोसळल्या असून रस्ते आणि काही पूलही खचले आहेत. परिणामी कांदाटी खोऱ्यातील तब्बल १६ गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
08 Jul 2026 03:20 PM (IST)
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) इयत्ता ८ वीचे सामाजिक शास्त्राचे सुधारित पुस्तक प्रसिद्ध केले आहे. या नवीन पुस्तकात भारताचे स्वातंत्र्य, फाळणी आणि स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषतः काँग्रेसची भूमिका, विनायक दामोदर सावरकर यांचा ‘स्वराज’चा विचार आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित माहिती नवीन पद्धतीने मांडण्यात आली आहे. या बदलांमुळे शिक्षण आणि इतिहासाच्या क्षेत्रात पुन्हा एकदा नवीन चर्चा सुरू झाली आहे.
08 Jul 2026 03:10 PM (IST)
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी- २० सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. मंगळवारी (दि. ७) ट्रेंट ब्रिजवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला १२५ धावांनी पराभूत केले. मोठ्या फरकाने झालेल्या पराभवानंतर संजू सॅमसनला संघातून वगळण्यावरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजू्च्या कमबॅकबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
08 Jul 2026 02:59 PM (IST)
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेने शिंदे गटाची मोठी राजकीय कोंडी केली आहे. या प्रकरणात शिंदे गटाच्या नगरसेवकाचे नाव समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढे येत दोषींना कोणतेही राजकीय संरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
08 Jul 2026 02:51 PM (IST)
जेथून राज्याचा कारभार चालवला जातो त्या मंत्रालयचा मंत्रालयातील वीजपुरवठा सकाळी सातपासून खंडित झाला आहे. कर्मचारी कामासाठी दाखल झाले, मात्र वीज नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. संगणक आणि इतर यंत्रणा बंद असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला. दरम्यान, वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.
08 Jul 2026 02:42 PM (IST)
सिंहस्थसाठी नाशिकमध्ये महापालिकेने उभारलेले तात्पुरते ऑफिस पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले आहे. तपोवन परिसरात ही ऑफिस होते.
08 Jul 2026 02:30 PM (IST)
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीची पाणीपातळी वाढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
08 Jul 2026 02:21 PM (IST)
राज्यात उद्यापासून पुढील चार ते पाच दिवस पावसाची विश्रांती राहणार आहे. विदर्भासह मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाची वाट पाहावी लागणा आहे, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ डॉ प्रवीण कुमार यांनी दिली.
08 Jul 2026 02:09 PM (IST)
अलिबागमध्ये रस्त्यावरील पावसामुळे भगदाड पडले आहे. यात एकाला पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. चांगू कमळू घरत असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
08 Jul 2026 02:00 PM (IST)
NEET-UG परीक्षेबाबत केंद्र सरकार एक मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षापासून या परीक्षेचे संपूर्ण स्वरूप बदलू शकते. आता ही परीक्षा एकाच दिवशी पेन-पेपर मोडमध्ये घेण्याऐवजी संगणक आधारित असेल आणि ५ ते ६ दिवसांत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित केली जाईल. परीक्षेची सुरक्षा, पारदर्शकता वाढवणे आणि पेपर लीकसारख्या घटना रोखणे हा या बदलाचा मुख्य उद्देश आहे.
08 Jul 2026 01:55 PM (IST)
राम मंदिर दान चोरी प्रकरणी ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यांवर गंभीर आरोप झाले. या आरोपांप्रकरणी राय आणि मिश्रा यांनी राजीनामेदेखील दिले. त्यांच्या राजीनाम्यांनंतर अयोध्येतील वातावरण शांत होईल असे वाटत होते. परिस्थिती थोडी शांत झाली असतानाच, चंपत राय यांच्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापले.
08 Jul 2026 01:45 PM (IST)
संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीच्या निमित्ताने आयोजित केला जातो. या ३४१ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ७ जुलै रोजी श्री क्षेत्र देहू येथून झाले आहे. पालखी विविध गावांतून मार्गस्थ होऊन २४ जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी दाखल होईल. आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानंतर २९ जुलै रोजी पालखी पंढरपूरवरून परतीच्या प्रवासाला निघेल.
08 Jul 2026 01:35 PM (IST)
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी होणार किंवा बाहेरून पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या कार्याध्यक्ष आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या सर्व चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत अफवा फेटाळून लावल्या आहेत.
08 Jul 2026 01:25 PM (IST)
मराठी मनोरंजन विश्वात गेल्या काही महिन्यांत अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘सुना येती घरा’, ‘आमच्या लाडक्या नाईकबाई’, ‘विसरू नको तू मला’, ‘कृष्णाईच्या लेकी’, ‘बाई तुझा आशीर्वाद’ यांसारख्या मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या आवडत्या कलाकारांना नव्या भूमिकांमध्ये पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
08 Jul 2026 01:15 PM (IST)
हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने तिचा पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी शोध सुरु केला. तेव्हा थरारक कट उघडकीस आला. महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आणि पुरावे मिटण्यासाठी तिने मृतदेह महाराष्ट्राच्या सीमेवर आणून पुरल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
08 Jul 2026 01:05 PM (IST)
मध्य पूर्वेतील तणाव थोडा ओसरला असं वाटत असताना पुन्हा युद्धाची ठिणगी पडली आहे. अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या घडामोडींदरम्यान, आता पुन्हा जगाच्या २०% तेलाची गरज भागवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा तणावाचे कारण बनत आहे. सर्व काही सुरळीत चाललं असताना सोमवार आणि मंगळवारी २४ तासांच्या आत इराणने सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर तिहेरी हल्ला सुरु केला आणि अमेरिकेने ताज्या हल्ल्याने त्याला प्रत्युत्तर दिले. या सगळ्याचा काय परिणाम सुरु झालाय?
08 Jul 2026 12:50 PM (IST)
अभिनेता दिलजीत दोसांझ याची प्रमुख भूमिका असलेला दिग्दर्शक हनी त्रेहान यांचा ‘सतलुज’ चित्रपट नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ZEE5 वरून अचानक हटवण्यात आल्यानंतर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (DSGMC)ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे, तर चित्रपटाचे विविध ठिकाणी सार्वजनिक प्रदर्शन करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे.
08 Jul 2026 12:40 PM (IST)
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उल्हास नदीला मोठा पूर आला आहे. नदीवरील मोहिली, दहिवली-मालेगाव, शेलू आणि पाषाण येथील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अनेक मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नेरळ ते कळंब-पाषाण परिसरातील अनेक गावांचा संपर्क तात्पुरता तुटला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
08 Jul 2026 12:35 PM (IST)
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील शाळांशी संबंधित UDISE+ (Unified District Information System for Education Plus) २०२५-२६ चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल देशातील सरकारी आणि खाजगी शाळांच्या सद्यस्थितीचे सर्वात मोठे अधिकृत चित्र मांडतो. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या, शिक्षकांची उपलब्धता, शाळांमधील मूलभूत सुविधा, डिजिटल शिक्षण, ड्रॉपआउट (शाळा सोडण्याचे प्रमाण), विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर आणि मुलींचा सहभाग अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंचे मूल्यमापन करतो.
08 Jul 2026 12:25 PM (IST)
पश्चिम बंगालमधील १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीचा पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला आहे. गुन्ह्याची जागा दाखवण्यासाठी नेले असताना आरोपीने कथितरित्या पोलिसाची सर्व्हिस गन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या कारवाईनंतर या प्रकरणाची देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
08 Jul 2026 12:20 PM (IST)
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी संतापजनक व्हिडओ व्हायरल होत असतात. लोक कधी कुठे काय अतरंगी, चुकीचे घडताना दिसले की ते रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक लाजिरवण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे नागरि जाण आणि पालकांच्या संस्कारावर टिका केली जात आहे.
08 Jul 2026 12:15 PM (IST)
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात आपत्तींची मालिकाच सुरू आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खवटी येथे डोंगर खाली आल्याने घडलेल्या घटनेला 24 तास होण्याच्या आधीच दहिवली गावात भूस्खलन झाल्याने चार घरे मातीत गाडली गेली. दहीवली शेलारवाडी येथे डोंगराचा काही भाग खचल्याने डोंगराच्या पायथ्याशी असलेली ७ पैकी ४ घरे ढिगाऱ्याखाली गाडली गेली यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला बचावली आहे. यातील ३ घरे बंदावस्थेत असल्याने काहींचे प्राण वाचले आहेत.
08 Jul 2026 12:10 PM (IST)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि डिजिटल लर्निंगच्या या युगात शिकण्याच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत. आज इंटरनेट, ऑनलाइन कोर्सेस आणि एआय टूल्सच्या मदतीने लोक घरबसल्या नवनवीन कौशल्ये शिकू शकतात. यामुळे अनेक जण पारंपारिक पदवी अभ्यासक्रमांच्या (Degree Courses) उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले आहेत. असे असले तरी, काही यशस्वी कथा हे सिद्ध करतात की कौशल्यांसोबतच योग्य वेळी घेतलेली पदवी देखील करिअरची दिशा बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते
08 Jul 2026 12:10 PM (IST)
जेव्हा सामना हातातून निसटत आहे असे वाटत होते, तेव्हा लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा आपल्या संघाचा तारणहार म्हणून पुढे आला. अर्जेंटिनाने शेवटच्या ११ मिनिटांत इतका उत्कृष्ट खेळ दाखवला की, २-० ने पिछाडीवर असूनही, त्यांनी ३-२ ने विजय मिळवला. गतविजेत्या विश्वविजेत्यांच्या या रोमांचक विजयात मेस्सीने बरोबरीचा गोल करून महत्त्वाची भूमिका बजावली, तर एन्झो फर्नांडिसने अतिरिक्त वेळेत विजयी गोल करून संघाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. या सामन्यात सहभागी होऊन, मेस्सीने फिफा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बाद फेरीचे सामने खेळण्याचा मिरोस्लाव्ह क्लोझच्या सर्वकालीन विक्रमाची बरोबरी केली.
08 Jul 2026 12:05 PM (IST)
राज्यातील पावसाचा जोर कायम असून मुसळधार पावसाने अनेक भागांना झोडपून काढलं आहे. पावसामुळे पाणी साचणे, झाडं पडणं अशा अनेक दूर्घटनांमध्ये 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील भांडुप परिसरातून बेस्ट बसचा विचित्र अपघात घडला आहे. भांडुपमधील कोकण नगर येथील क्रिटिकल रुग्णालय परिसरात भरधाव बेस्ट बसने एका पादचारीला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी जखमी झाला असून त्याच्यांवर जवळील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत.
08 Jul 2026 12:00 PM (IST)
गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर आकांक्षा चमोलाने दुसऱ्यालग्नाबाबत मोठा खुलासा केला. आकांक्षाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी भविष्यात तिचा निर्णय बदलू शकतो, असे मत व्यक्त केले.
08 Jul 2026 11:50 AM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अलिशान कार घेऊन देण्याच्या हट्टावरून आई-वडिलांसोबत झालेल्या वादानंतर 20 वर्षीय प्रयांश कोकरे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाईलच्या व्यसनामुळे त्याच्या स्वभावात चिडचिड वाढल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
08 Jul 2026 11:40 AM (IST)
बईच्या दादरमधून एक धक्कादायक आणि काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. दादर रेल्वे स्टेशनवर एका नराधमाने थेट रेल्वे रुळावर उतरून महिलेला मारहाण केली आहे. सर्वात अमानवीय बाब म्हणजे स्टेशनवर शेकडो प्रवासी असाताना कोणीही त्या महिलेच्या बचावासाठी पुढे आलेला नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
08 Jul 2026 11:30 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये 9 व्या वर्धापनदिनाचा उत्साह अजूनही सुरुच आहे. हा उत्साह आणखी वाढवण्यासाठी आता गेममध्ये एक खास ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा एक बॅटल इन युनिसन ईव्हेंट आहे. यामध्ये प्लेअर्सना टास्क पूर्ण केल्यानंतर विविध गेमिंग रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ट्रॉफीपासून वेपन लूट क्रेटपर्यंत विविध रिवॉर्ड्सची यादी समाविष्ट आहे. याचा वापर प्लेअर्स गेममध्ये शत्रूंवर विजय मिळवू शकतात. बॅटल इन यूनिसन ईव्हेंटमध्ये तुम्ही केवळ प्रीमियम वेपन स्किनच नाही तर एक्सक्लूसिव ट्रॉफी आणि डिस्क होवर स्काईबोर्ड देखील अनलॉक करू शकतात.
08 Jul 2026 11:25 AM (IST)
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे घरासमोरील उघड्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर महावितरणच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
08 Jul 2026 11:20 AM (IST)
दरवर्षी पालखी सोहळा आयोजित केला जातो. सरकारकडून वारकऱ्यांसाठी अनेक दिलासादायक निर्णय घेतले जातात. त्यातच आता राज्य शासनाच्या निर्णयानुसार ६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व परतणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या टोलमाफी नसलेल्या बसेसलाही या कालावधीत टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.
08 Jul 2026 11:10 AM (IST)
अमेरिका इराणमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यात निर्माण झाली आहे. होर्मुझमध्ये तीन व्यापारी जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर लष्करी कारवाई केली आहे. यामुळे मध्यूपर्वेत वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






