Maharashtra Breaking News Updates Today:
मुंबई: मुंबईसह संपूर्ण उपनगर, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर-
06 Jul 2026 06:27 PM (IST)
मुंबई: मानखुर्द भागात घर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आणि या घटनेसाठी प्रशासकीय अपयशाला जबाबदार धरले. ‘त्यांनी अनधिकृत बांधकामे, कथित भ्रष्टाचार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कामकाजाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली.
06 Jul 2026 06:21 PM (IST)
Modi Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच याबाबत घोषणा होणार आहे. काही मंत्र्यांना थेट कॅबिनेटमधून नारळ मिळेल, नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे सांगितले जात आहे.
06 Jul 2026 06:13 PM (IST)
मुंबई: सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे झालेल्या १२ जणांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त करत, शिवसेना आमदार (विधान परिषद) नीलम गोऱ्हे यांनी बाधित कुटुंबांसाठी मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली. राम मंदिराशी संबंधित वादावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, कोणत्याही स्तरावर काही अनियमितता झाली असल्यास, दोषींवर निष्पक्ष कारवाई केली जावी.
06 Jul 2026 05:58 PM (IST)
गेल्या पाच दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर अचानक रस्त्याला भगदाड पडल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्याला एवढा मोठा भगदाड पडल्याने परिसरात खळबळ उडाली असून वाहनचालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी मयूर पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या रस्त्याची पाहणी करून तातडीने दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी यापूर्वीच महापालिका अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
06 Jul 2026 05:49 PM (IST)
कर्जत : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पळसदरी-ठाकूरवाडी येथे सोमवारी पहाटे दरड कोसळून पाच वाहनांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत दोन चारचाकी आणि तीन दुचाकी वाहने मलब्याखाली अडकून त्यांची हानी झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डोंगरावरील वस्तीला जाणाऱ्या रस्त्यावर वाहने जाऊ शकत नसल्याने नागरिकांनी रस्त्यालगत शेडमध्ये ही वाहने उभी केली होती. पहाटे अचानक दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आले. त्यामुळे वस्तीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून काही ठिकाणी रस्त्याचाही भाग खचला आहे.
06 Jul 2026 05:37 PM (IST)
केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी आणि शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी केली घटनास्थळाची पाहणी
डोंबिवलीतील लोढा हेवन, गावदेवी चौक परिसरात रस्त्यावरून धावणाऱ्या रिक्षा आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) कचरा वाहून नेणाऱ्या वाहनावर अचानक भलेमोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे.
या अपघातात वाहनचालकाच्या पायाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
06 Jul 2026 05:26 PM (IST)
नाशिकमध्ये उद्या ढगफुटीची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व दिंडोरी येथील शाळा व कॉलेज बंद राहणार आहे.
06 Jul 2026 05:12 PM (IST)
मानखुर्द इमारत दुर्घटनाप्रकरणी 2 जणांना अटक झाली असून रविवारी इमारत कोसळून सहा जणांचा झाला होता मृत्यू
06 Jul 2026 05:00 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी ७ जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे खेळला जाईल. मागील सामना गमावल्यामुळे भारत मालिकेत ०-१ ने मागे आहे. श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताचा हा तिसरा टी-२० आंतरराष्ट्रीय पराभव होता. यापूर्वी संघ आयर्लंडविरुद्धही दोन सामने हरला होता. जर भारताला मालिका जिंकायची असेल, तर त्यांना तिसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.
06 Jul 2026 04:52 PM (IST)
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट यूजी २०२६ (NEET UG 2026) ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा नोटीस जारी केला आहे. जर तुम्ही देखील रिफंडच्या पैशांची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. एनटीएने बँक खात्याची माहिती कन्फर्म (निश्चित) केलेल्या उमेदवारांच्या खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, ज्या उमेदवारांच्या बँक खात्याच्या माहितीत काही चूक आहे किंवा ज्यांनी अद्याप आपली माहिती अपडेट केलेली नाही, त्यांच्याकडे आपली चूक सुधारण्यासाठी आता खूपच कमी वेळ शिल्लक राहिला आहे.
06 Jul 2026 04:44 PM (IST)
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि पायाभूत सुविधांनाही बसू लागला आहे. अशीच एक घटना कल्याण तालुक्यातील टिटवाळा-बल्ल्यानी मार्गावर दिसून आली असून या मार्गावरील अचानक रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या भगदाडामुळे अपघाताचा धोका वाढला असून, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
06 Jul 2026 04:30 PM (IST)
लहान मुलांच्या आवडीच्या चॉकलेटबाबत अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये वळवळणाऱ्या अळ्या आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलासाठी खरेदी केलेले चॉकलेट उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचा दावा संबंधित पालकांनी केला असून, त्यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
06 Jul 2026 04:18 PM (IST)
भारत विरुद्ध इंग्लंड टी-२० मालिकेतील तिसरा सामना मंगळवार, ७ जुलै रोजी खेळला जाईल. हा सामना ट्रेंट ब्रिज येथे होणार आहे. विशेष म्हणजे, हा सामना रात्री १०:०० वाजता सुरू होईल. मालिकेतील पहिला सामनाही रात्री १०:०० वाजता सुरू झाला होता, त्यानंतर दुसरा सामना सायंकाळी ७:०० वाजता झाला. हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल, कारण पराभव झाल्यास मालिका जिंकण्याची कोणतीही संधी संपुष्टात येईल.
06 Jul 2026 04:08 PM (IST)
पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील महत्त्वाची पर्यटन स्थळे बंद करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थान, सप्तश्रृंगी देवस्थान तसेच दुगारवाडी धबधबा, हरिहर गडसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार, 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी केला असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात ढगफुटीसदृश अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत.
06 Jul 2026 03:55 PM (IST)
कोल्हापूर: कोल्हापूर येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा धाक दाखवत अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर आचार करतांना देखील व्हिडीओ काढण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातून चार अल्पवयीन मुले आहेत. वाचा सविस्तर
06 Jul 2026 03:50 PM (IST)
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या टेनिसपटू जॅनिक सिनरने विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) मध्ये आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली आहे. सिनरने जपानच्या पात्रता फेरीतील खेळाडू शिंतारो मोचिझुकीला ६-३, ७-६(०), ६-३ अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यासह, सिनरने सलग पाचव्यांदा विम्बल्डनच्या अंतिम ८ मध्ये स्थान मिळवले. दरम्यान, जपानची स्टार खेळाडू नाओमी ओसाकाने सेंटर कोर्टवर शानदार कामगिरी करत, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आर्यना सबालेन्काला ६-२, ७-६(२) अशा सरळ सेट्समध्ये पराभूत करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रथमच प्रवेश केला. वाचा सविस्तर
06 Jul 2026 03:45 PM (IST)
आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत लक्षणीय घट होत आहे. जागतिक स्तरावर ताणलेली राजकीय परिस्थिती आणि नंतर जगाने घेतलेला सुटकेचा श्वास यासगळ्यानंतर तेल जगतात परिस्थिती चांगलीच निवळली आहे. त्यामुळे पुढील ७ ते १० दिवसांत भारतीय इंधन बाजारात बदल होण्याची शक्यता आहे. जर कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीजवळ राहिल्या, तर भारतीय तेल विपणन कंपन्या पुढील १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून नफा-तोटा समान पातळीवर आणू शकतील. याचा अर्थ, त्यांचा खर्च आणि कमाई समान होईल. ही सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठी बातमी असणार आहे. कारण यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वाढते. वाचा सविस्तर
06 Jul 2026 03:40 PM (IST)
दिल्ली: दिल्लीतील लोधी कॉलनी परिसरात २८ वर्षीय नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर झालेल्या लव्ह मॅरेजला अवघे अडीच महिने झाले असताना घडलेल्या या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला असून, पोलिसांकडून आत्महत्या, अपघात आणि घातपात अशा सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे. नेमकं प्रकरण काय?
06 Jul 2026 03:35 PM (IST)
पिंपरी : शाळेतील प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांचे वेतन, शैक्षणिक सहलींचा खर्च अशा प्रकरणांत आर्थिक गैरव्यवहार करून शैक्षणिक संस्थेची ४ कोटी ९८ लाख ६६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील बी-स्कूल येथे घडला आहे. याप्रकरणी शाळेच्या माजी संचालकाविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
06 Jul 2026 03:30 PM (IST)
खोमेनी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली असून कॉलेज ब्रिजवरुन यात्रा मार्गस्थ झाली आहे. या ब्रिजवर खामेनेईंना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी उमसळली आहे. लोक खामेनेंईच्या अंतिम दर्शनाशी रस्ते, पादचारी पूल आणि आसपास इमारतींवर उभे राहून वाट पाहत आहेत.
نمایی از پل کالج در خیابان انقلاب اسلامی؛ مراسم تشییع پیکر مطهر «آقای شهید ایران» و شهدای خانواده ایشان. ۱۴۰۵/۴/۱۵#باید_برخاست pic.twitter.com/wo0kU0Cp25
— KhameneiNews (@khameneinews) July 6, 2026
06 Jul 2026 03:25 PM (IST)
MDS Exam Attendance Rules देशभरातील डेंटल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पोस्टग्रेजुएट (PG) डेंटल विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता एमडीएस (MDS) च्या विद्यापीठीय परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान ८० टक्के बायोमेट्रिक उपस्थिती असणे अनिवार्य करण्यात आले आहे. राष्ट्रीय दंत आयोगाने (National Dental Commission – NDC) सर्व डेंटल कॉलेजेस आणि विद्यापीठांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ज्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती ८० टक्क्यांपेक्षा कमी असेल, त्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेला बसू दिले जाऊ नये. जर एखाद्या संस्थेने या नियमाचे पालन केले नाही, तर त्या संस्थेवरच कडक कारवाई करण्याचे निश्चित केले जाईल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर
06 Jul 2026 03:20 PM (IST)
Netanyahu India Statement : जेरुसलेम : अमेरिका आणि इस्रायलमधील मतभेदांच्या चर्चेदरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताबाबत एक मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स यांनी अमेरिकेला इस्रायलचा एकमेवर मित्र असल्याचे म्हटले होते. यावर नेतन्याहूंनी प्रत्युत्तर देते भारतासारखे विश्वासू मित्र इस्रायलकडे असल्याचे म्हटले आहे. नेमकं काय म्हणाले नेतन्याहू जाणून घेऊयात.
06 Jul 2026 03:15 PM (IST)
Nashik Rain Devendra Fadnavis News Marathi : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबईतील परिस्थिती विशेषतः गंभीर आहे. मुंबईत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक आणि पुण्यालाही इशारा देण्यात आला आहे. याचदरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर भागांसाठी अत्यंत गंभीर हवामान इशारा जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
06 Jul 2026 03:10 PM (IST)
Indian Cricket Team ICC Rankings: सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन सामने झाले आहेत. दरम्यान पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. त्याआधी भारत अन् आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची सिरिज झाली. त्यात देखील भारताचा पराभव झाला. त्यामुळे आयसीसी रॅंकिंगमध्ये भारताला मोठे नुकसान झाले आहे. वाचा सविस्तर
06 Jul 2026 03:05 PM (IST)
Ram Mandir Donation Scam: अयोध्या येथील राम मंदिरात दान चोरीच्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. राज्य सरकारने या संदर्भात कारवाई केली असली तरी विरोधी पक्ष यासंदर्भात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. राम मंदिराचे महासचिव चंपत राय आणि त्यांचे सहकारी अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस कडून सातत्याने केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेवर सडकून टिका केली आहे. वाचा सविस्तर
06 Jul 2026 02:59 PM (IST)
रत्नागिरीच्या कशेडी घाटात दरड कोसळली. खवटीजवळ दरड कोसळली, वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे. 250 मीटरपर्यंत दरडीचा मलबा रस्त्यावर कोसळला.
06 Jul 2026 02:50 PM (IST)
वाशिममध्ये पावसामुळे पूल कोसळला. अनसिंग-रामतांडा मार्गावरील पूल कोसळला. पूल कोसळल्यानं गावाचा संपर्क तुटला. ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
06 Jul 2026 02:41 PM (IST)
डोंबिवलीत वाहनावर झाड कोसळलं. केडीएमसीच्या कचरा टेम्पोवर झाड पडलं. टेम्पो आणि रिक्षावर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहनचालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. आपत्कालीन विभागाला फोन केला असता KDMC कडून कोणतीही मदत आली नसल्याचं बोललं जात आहे.
06 Jul 2026 02:30 PM (IST)
मुंबईवरून कोकणात येणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या उशिरा धावत आहेत. तुतारी एक्सप्रेस दोन तास उशिराने धावत आहे. मंगलरूएक्सप्रेस चार तास, तर कोकण कन्या एक्सप्रेस आणि पुणे एरणाकुलम साडेतीन तास उशिराने धावत आहे.
06 Jul 2026 02:21 PM (IST)
आज दुपारनंतर प्रचंड वेगाने वारे वाहणार असून अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांनी केले आहे. फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात निवेदन दिले. यामध्ये त्यांनी पाऊस आणि पूरपरिस्थितीच्यादृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचे सांगितले. नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. कोणीही अत्यावश्यक कारण असल्याशिवाय प्रवास करु नये. तरुणांनी या काळात पर्यटनासाठी धबधबे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले
06 Jul 2026 02:12 PM (IST)
आळंदी परिसरात इंद्रायणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे नदीवरील सर्व प्रमुख पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरात प्रवेश करणे धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीकडे प्रवास न करण्याचे आवाहन केले असून, प्रवासात असलेल्यांनी सुरक्षित ठिकाणीच थांबण्याचा सल्ला दिला आहे.
06 Jul 2026 02:03 PM (IST)
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन सिंहगड घाट परिसरात नागरिक आणि पर्यटकांच्या प्रवेशावर ६ व ७ जुलै रोजी तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव वनविभागाने हा निर्णय घेतला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
06 Jul 2026 01:50 PM (IST)
मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी (६ जुलै) पहाटे मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून एका घरावर दरड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
06 Jul 2026 01:45 PM (IST)
तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पाऊस, दाट धुके आणि वेगवान वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे, पर्यटकांची मोठी गर्दी आणि खराब हवामानामुळे शहरासह महाबळेश्वर–पाचगणी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली.
06 Jul 2026 01:40 PM (IST)
भारताचा आत्मा गावांमध्ये वसतो,” हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विधान आजच्या आधुनिक डिजिटल युगातही तितकेच सत्य आहे. कोणत्याही देशाच्या, विशेषतः भारतासारख्या विशाल आणि कृषीप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा ग्रामीण भागातच असतो. गावांचा विकास झाल्याशिवाय देशाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकत नाही. याच जागतिक विचाराला समोर ठेवून, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार ६ जुलै रोजी जगभरात ‘जागतिक ग्रामीण विकास दिन’ (World Rural Development Day) साजरा केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे आणि त्यांना शहरांच्या तोडीस तोड सुविधा उपलब्ध करून देणे, हा या दिवसाचा मुख्य हेतू आहे.
06 Jul 2026 01:38 PM (IST)
ठाणे येथून एक सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन गेमिंग आणि गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याच्या आमिषाला एक २६ वर्षीय तरुण बळी पडला. या तरुणाची तब्बल 1.36 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर भामट्यांनी शिताफीने जाळे विणून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी ठाणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
06 Jul 2026 01:02 PM (IST)
ऑन ड्यूटी नेमप्लेट झाकून (लपवून) ठेवणे अथवा उलटी लावणे तसेच मुद्दाम खिशात मोबाईल ठेवून नेमप्लेट दिसणार नाही, याची काळजी घेण्याच्या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे. ड्यूटीवर असताना नेमप्लेट लपवल्यास थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सातत्याने असे अनुभव सर्वसामान्य नागरिकांना येत असतात या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिले आहेत. पुणे शहरात वाहतूक नियमन किंवा कारवाईदरम्यान अनेक पोलिस कर्मचारी गणवेशाच्या वरच्या खिशात मोबाईल फोन ठेवतात. त्यामुळे त्यांच्या नावाची पाटी (नेमप्लेट) पूर्णपणे झाकली जाते. अथवा, नेमप्लेट खाली लटकेल (नाव दिसणार नाही) अशा पद्धतीने ती लावली जाते. परिणामी, संबंधित पोलिस कर्मचार्याचे नाव नागरिकांना दिसत नाही. त्यांची ओळख पटविणे कठीण होते. काही ठिकाणी कारवाई करतानाच नेमप्लेट झाकण्याची पद्धत रूढ झाल्याचेही वरिष्ठांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाच्या पारदर्शकतेवर तसेच शिस्त यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
06 Jul 2026 12:48 PM (IST)
लॉरेन्स बिश्नोई टोळीने महाराष्ट्रात देखील पाय रोवले आहेत. धक्कादायक म्हणजे, आता या टोळीकडून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि त्यांच्याकडून खंडण्या उकळण्यासारखे गंभीर प्रकार सुरू झाले आहेत. लॉरेन्स बिश्णोई टोळीचा कुख्यात फरार सदस्य शुभम लोणकर हा महाराष्ट्राच्या सुरक्षा यंत्रणांसाठी मोठी डोकेदुखी बनला आहे. अलीकडेच, काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना लोणकरकडून सलग सहावी धमकी मिळाल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने आमदाराची सुरक्षा ‘वाय-प्लस’ पर्यंत वाढवली आहे. विधानसभेतील या गदारोळाने गुन्हेगारी जगताचा एक नवीन चेहरा पुन्हा समोर आणला आहे.
06 Jul 2026 12:36 PM (IST)
नवले पूल परिसरात एका ट्रक चालकाला धमकावून त्याला लुटत ट्रक घेऊन पसार झालेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला होता. आनंद गजानन जामकर (वय २५, रा. सुरेखा पॅलेस, बाणेर), व्यंकटेश महादेव देवणे (वय २२, रा. निर्वाणा पॅलेस, बावधन), स्वराज वैजनाथ टाक (वय २४, रा. सिंहगड काॅलेज कर्मचारी वसाहत, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ट्रक चालक २९ वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
06 Jul 2026 12:29 PM (IST)
मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली असून विक्रोळीजवळ ओव्हरहेड वायरवर प्लास्टिक पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भांडूप आणि कांजूरमार्ग स्टेशनमधील घटना, मुंबईकडील वाहतूक ठप्प, तर ठाणे-कल्याणच्या दिशेने सेवा व्यवस्थित
06 Jul 2026 12:24 PM (IST)
प्राचार्याकडून खंडणी उकळल्याचे प्रकरण आणि नुकतेच कॅफे चालकाला जबरदस्तीने कॅफे बंद करण्यास सांगत त्या कॅफेची तोडफोड केल्याचे प्रकरण ताजे असताना पोलिसांनीच बुधवार पेठेत तरुणांना धमकावून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे मात्र, पुणे पोलिसांची लक्तरे वेशीला टांगली जात आहेत. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात विवेक पाटील तसेच राहुल दाभाडे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २४ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
06 Jul 2026 12:12 PM (IST)
मावळ तालुक्यातील पाटण गावात सोमवारी (६ जुलै) पहाटे मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून एका घरावर दरड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
06 Jul 2026 12:00 PM (IST)
दिल्लीतील लोधी कॉलनी परिसरात 28 वर्षीय नवविवाहित आकृती सुतार हिचा इमारतीवरून पडून संशयास्पद मृत्यू झाला. लग्नाला तीन महिनेही पूर्ण झाले नसताना घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
06 Jul 2026 11:50 AM (IST)
कोकणासह मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवार मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा परिणाम मध्य रेल्वेच्या (central railway) रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. सोमवारी सकाळी कर्जत ते खोपोली दरम्यान रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने रुळाखालची खडी वाहून गेली. सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील लोकल सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. ठाकूरवाडी (TKW) आणि मंकी हिल लूप केबिन (MHLC) दरम्यानच्या अप मेन लाईनवर (UPML) डोंगराचा मोठा मलबा आणि दगड कोसळले आहेत. या घटनेमुळे मुंबई विभागातील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून, मध्य रेल्वेला अनेक महत्त्वाच्या गाड्या तात्काळ रद्द करून दुसऱ्या मार्गाने वळवाव्या लागल्या आहेत.
06 Jul 2026 11:40 AM (IST)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण पॅराग्लाइडिंग करण आहे. त्याला पॅराग्लाइंडिंग राइड टेकऑफ करण्यासाठी डोंगराच्या कड्यावरुन धाऊन घेत जात आहेत. परंतु खराब हवामानामुळे आणि वेगवान वाऱ्यामुळे नीट उडता येत नाही. गाइडचे आणि तरुणाचे नियंत्रण सुटल्याने टेकऑफ करताच काटेरी झाडांमध्ये कोसळतात. खाली एक खोल मोठी दरी असते. परंतु सुदैवाने ते आपला तोल सावरतात. कोणलाही गंभीर दुखापत झाला का नाही हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु हा थरारक व्हिडिओ सध्या चिंतेचे कारण बनत आहे.
06 Jul 2026 11:30 AM (IST)
इंस्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सशुल्क जाहिरातींप्रकरणी केंद्र सरकारने Meta ला बजावलेल्या नोटीसवर कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मेटाने अशा प्रकारच्या कंटेंटबाबत 'झिरो-टॉलरन्स' धोरण असल्याचा दावा करत AI च्या मदतीने कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे.
06 Jul 2026 11:29 AM (IST)
विधानसभा सभागृहाची आजची बैठक अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर11.10 वाजता स्थगित झाली आहे. पुढील बैठक मंगळवार दिनांक 07 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणार असल्याची अध्यक्षांनी जाहीर केले
06 Jul 2026 11:20 AM (IST)
मोठ्या गाजावाजात उभारण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाला पहिल्याच जोरदार पावसाचा फटका बसल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच या मार्गावर खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर आज (6 जुलै) पहाटे मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळील स्लॅबचा काही भाग कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
06 Jul 2026 11:10 AM (IST)
पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही उमटू लागले आहेत. ब्रिटनची राजधानी लंडन येथे रविवारी (०५ जुलै) हजारो काश्मिरी नागरिकांनी पाकिस्तानविरोधात लंडन काश्मीर मिलियन मोर्चा काढला. या मोर्चात पाकिस्तान सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र निदर्शने झाली. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देत PoK च्या स्वातंत्र्या मागणी करण्यात आली.
06 Jul 2026 11:00 AM (IST)
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि वादांनंतर प्रदर्शित झालेला सतलज हा दिलजीत दोसांझचा बहुप्रतिक्षित चित्रपट रिलीजच्या अवघ्या 48 तासांतच भारतातील OTT प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे. 3 जुलै 2026 रोजी ZEE5 वर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच हा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.






