Maharashtra Breaking News Updates Today
Monsoon Rain Alert : दोन दिवसांपूर्वीपर्यंत उत्तर भारतातील राज्यांमध्ये मुसळधार धुमाकूळ घालणारा मान्सूनचा पाऊस आता पुन्हा एकदा ओसरताना दिसत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या पावसाची चिन्हे नसून, मान्सूनचा हंगाम सुरू असतानाही राजस्थानच्या बहुतांश भागांत नागरिकांना कडक उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे. मात्र, एकीकडे हा दिलासा असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील १४ राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तीव्र इशारा (हाय अलर्ट) जारी केला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील १२ तासांत काही राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ७५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडणे किंवा मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका लक्षात घेता संबंधित भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या मान्सूनचा मुख्य पट्टा हरियाणा आणि उत्तर प्रदेशपासून थेट मणिपूरपर्यंत विस्तारलेला आहे.
13 Jul 2026 06:27 PM (IST)
Indian Cricket Team: सध्या भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. सूर्यकुमार यादवचा आयपीएलमध्ये फॉर्म खराब असल्याने त्याच्याकडून भारतीय संघाचे टी 20 कर्णधारपद काढून घेण्यात आले होते आणि श्रेयस अय्यरवर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र त्याला देखील अद्याप कर्णधार म्हणून एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवचे भारतीय टी 20 संघात पुनरागमन होणार का हे पहावे लागणार आहे.
13 Jul 2026 06:13 PM (IST)
कापूस, खरीप हंगामातील प्रमुख व्यापारी पिकांपैकी एक आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक सहाय्य देण्यासाठी, प्रति हेक्टर मदत दिली जात आहे. या मदतीसाठी अर्ज १० जुलै २०२६ पासून i-Khedut पोर्टलवर सुरू झाले आहेत. या उपक्रमाचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर सर्वात मोठ्या रोजगारदात्यांपैकी एक असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रालाही होण्याची अपेक्षा आहे. नेमका कोण घेऊ शकतं फायदा? कोण ठरेल पात्र?
13 Jul 2026 05:58 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेला १४ जुलैपासून सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅम येथील एडजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. याआधी दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताला ४ -० ने व्हाईटवॉश मिळाला. टी-२० मालिकेतील या दारुण पराभवानंतर , भारतीय संघ आता एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ बदला घेण्याचा प्रयत्न करेल.
13 Jul 2026 05:50 PM (IST)
व्हॉट्सॲपचे (WhatsApp) लोकप्रिय फीचर, “व्हॉट्सॲप युझरनेम,” जे या वर्षाच्या अखेरीस सुरू होणार होते, ते आता स्थगित करण्यात आले आहे. व्हॉट्सॲपची मूळ कंपनी, मेटाने सरकारला आश्वासन दिले आहे की, सरकारसोबतची चर्चा पूर्ण होईपर्यंत ते हे फीचर सुरू करणार नाहीत. मिळालेल्या एका वृत्तानुसार, सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मेटाने सरकारला आधीच एक लेखी प्रतिसाद सादर केला आहे, ज्याची सध्या छाननी सुरू आहे. आपल्या प्रतिसादात, मेटाने स्पष्ट केले आहे की, या फीचरमुळे फसवणूक वाढू शकते अशी सरकारची चिंता असूनही, त्यांना व्हॉट्सॲप युझरनेम फीचर का सुरू करायचे आहे.
13 Jul 2026 05:40 PM (IST)
माथेरान येथे रविवारी मोठ्या संख्येने पर्यटक वर्षासहली साठी आले होते. सायंकाळी माथेरान नेरळ असा प्रवास करीत असताना वाहने मिळत नव्हती आणि काही पर्यटक टेम्पो मधून नेरळ येथे येत होते. त्या टेम्पोला माथेरान घाटात अपघात झाला आणि त्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून त्या टेम्पो मध्ये 17 ते 18 पर्यटक प्रवास करीत होते.
13 Jul 2026 05:30 PM (IST)
फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धा सध्या निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. ४ संघ सेमनिफायनलसाठी निश्चित झाले आहेत. २० जुलैला अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्याआधी फुटबॉल चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. फिफा विश्वचषक २०३० मध्ये संघाची संख्या ४८ वरुन ६४ होण्याची शक्यता आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी २०३० च्या फिफा पुरुष विश्वचषकातील संघांची संख्या ६४ पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला जाईल, असे महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे
13 Jul 2026 05:20 PM (IST)
पंतप्रधान, केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री यांना गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली सलग ३० दिवस कोठडीत ठेवले तर त्यांना पदावरून हटवण्याऐवजी निलंबित केले जावे, अशी शिफारस एका संसदीय समितीने केली आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध करूनही ही शिफारस केली आहे. समितीने अशीही एक प्रणाली प्रस्तावित केली आहे, ज्यानुसार अशा व्यक्ती आरोपातून निर्दोष सुटल्यास किंवा विहित कालावधीत खटल्याची सुनावणी न झाल्यास, निलंबन आपोआप संपुष्टात येईल.
13 Jul 2026 05:10 PM (IST)
राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी भेसळयुक्त दूध आणि बनावट दुग्धजन्य पदार्थांवर कारवाई करण्यात आली असून त्याचा परिणाम राज्यातील दूधपुरवठ्यावरही होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या दुधाला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत असल्याचा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
13 Jul 2026 04:57 PM (IST)
अमेरिकेच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली आणि इराणविरोधी (Iran) कठोर भूमिकेसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या अचानक झालेल्या निधनाने जागतिक राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या निधनानंतर इराणी प्रसारमाध्यमांनी आणि सरकारी यंत्रणांनी ज्या प्रकारची तीव्र व आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे, त्यामुळे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. वाचा सविस्तर...
13 Jul 2026 04:47 PM (IST)
भारताजी स्टार नेमबाज नीरु धांडाने शनिवारी ११ जुलै रोजी इटलीतील लोनाटो येथे झालेल्या असलेल्या आयएसएसएफ (ISSF) शूटिंग शॉटगन विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या ट्रॅप प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. नीरुने आपल्या कारकिर्दीतील पहिले वैयक्तिक आयएसएसएफ विश्वचषक सुवर्णपदक जिंकले. हरियाणाच्या नीरुने विश्वचषक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत देशाला गौरव मिळवून दिला. यासह ट्रॅप शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. वाचा सविस्तर...
13 Jul 2026 04:37 PM (IST)
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी पत्रक सापडल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर जिल्ह्यातील हे अशा प्रकारचे पहिलेच पत्रक असून, त्यामुळे परिसरात व्यापक चर्चा सुरू झाली आहे. हे पत्रक खरोखरच नक्षलवादी संघटनेने जारी केले आहे की दुसऱ्या एखाद्या गटाने खळबळ माजवण्याचा हा प्रयत्न आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. वाचा सविस्तर...
13 Jul 2026 04:27 PM (IST)
मुंबईत एका महिन्यात 50 टक्के परताव्याचे आमिष दाखवत मोहोसिन मुलानी यांची तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. मित्राच्या माध्यमातून आरोपींनी विश्वास संपादन करून रोख रक्कम स्वीकारली आणि पसार झाले. एल.टी. मार्ग पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
13 Jul 2026 04:17 PM (IST)
आज दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याचा ३ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास, समृद्ध शेती, विकसित वस्ती आणि प्रगत जीवनशैलीची साक्ष देणारा आहे. जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात असलेल्या पाचखेड येथे नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाने केलेल्या उत्खननातून लोहयुगीन वस्तीचे महत्त्वपूर्ण पुरावे समोर आले. या उत्खननात घरांचे अवशेष, लोखंडी वस्तू, मातीची भांडी, तांदळाचे दाणे तसेच इतर धान्यांचे पुरावे आढळले. या निष्कर्षांवरून सुमारे ३ हजार वर्षांपूर्वी या भागात भात, गहू, तूर आणि मूग यांसारख्या पिकांची लागवड होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचा सविस्तर...
13 Jul 2026 04:07 PM (IST)
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने असा एकही विभाग अथवा क्षेत्र सोडले नाही जेथे भ्रष्टाचार केला नाही. ‘जाऊ तिथे खाऊ’ या म्हणीप्रमाणे केवळ भ्रष्टाचारच केला आहे. राम मंदिरातील भक्तांच्या देणगीवर दरोडा टाकून भाजपा आरएसएसवाल्यांचे पोट भरले नाही म्हणून की काय त्यांनी ‘लाडकी बहिण’ योजनेवरही दरोडा टाकला आहे. सत्तेतील सावत्र भावांनी बहिणींनाही सोडले नाही. हे सरकार आहे का दरोडेखोरांची टोळी? असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
13 Jul 2026 04:00 PM (IST)
अमेरिका-इराणधील लष्करी तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे एक विशेष लष्करी विमान Tu-214PU इराणची राजधानी तेहरानमध्ये दाखल झाले आहे. रशियाचे Tu-214PU हे विमान एअरबोर्न कमांड पोस्ट किंवा डूम्सडे प्लेन म्हणूनही ओळखले जाते. हे विमान युद्ध किंवा अणुयुद्धासारख्या परिस्थितींमध्ये वापरण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे विमान अत्यंत सुरक्षित आणि एनक्रिप्टेड प्रणालींनी सुसज्ज असून यामुळे राष्ट्राध्य किंवा वरिष्ठ लष्करी अधिकारी अवकाशातूनच सशस्त्र दलांना आदेश देऊ शकतात. या विमानाचा कमाल वेग ताशी सुमारे ८५० किलोमीटर असून, त्याची विनाथांबा उड्डाण करण्याची क्षमता (रेंज) सुमारे ६,५०० किलोमीटर आहे. परंतु, हे विमान इराणमध्ये का पाठवण्यात आले याबाबत रशियाने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र यामुळे संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे.
13 Jul 2026 03:55 PM (IST)
India Vs England ODI Series: नुकतीच भारत अन् इंग्लंड टी 20 सिरिज पार पडली. इंग्लंडने भारताविरुद्ध मालिका जिंकली आहे. उद्यापासून भारत अन् इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सिरिज सुरू होणार आहे. या सिरिजबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. उद्या विराट कोहली अन् रोहित शर्मा खेळताना दिसणार आहेत. मात्र उद्याच्या सामन्यात विराट कोहली माजी कर्णधार सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडताना दिसणार आहे. वाचा सविस्तर
13 Jul 2026 03:50 PM (IST)
CBSE Free Online Courses 2026: आजच्या काळात प्रत्येक गोष्ट पूर्वीपेक्षा अधिक प्रगत झाली आहे. आता बदल घडण्यासाठी वर्षांचा काळ लागत नाही, तर महिने किंवा आठवड्यांच्या वेगाने बदल पाहायला मिळत आहेत. स्वतःला आजच्या काळाशी सुसंगत ठेवण्यासाठी अप-टू-डेट राहणे अत्यंत आवश्यक आहे. यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर काम करणे. आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी किंवा व्यवसायात नफा मिळवण्याच्या दृष्टीने नवीन कौशल्ये शिकणे खूप गरजेचे बनत चालले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नवीन तंत्रज्ञानाच्या या युगात स्पर्धा अत्यंत उच्च पातळीवर आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलांना योग्य दिशा आणि तंत्रज्ञान शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. वाचा सविस्तर
13 Jul 2026 03:45 PM (IST)
भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने SEBI ने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आचारसंहिताही अधिक कडक केली आहे. नवीन नियमांनुसार हितसंबंधांचे संघर्ष टाळण्यासाठी, गुंतवणुकीवरील देखरेख वाढवण्यासाठी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या नियमांमधील बदल
13 Jul 2026 03:40 PM (IST)
इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमामुळे (Iran Nuclear Program) जागतिक राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ माजली आहे. मध्य पूर्वेतील (Middle East) तणाव कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध राजनैतिक प्रयत्न आणि शांतता करार घडवून आणण्याचे सत्र सुरू असतानाच, फ्रान्सने अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे. फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बारो (Jean-Noël Barrot) यांनी उघडपणे जाहीर केले आहे की, जोपर्यंत तेहरान (इराणची राजधानी) आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे आणि अधिकृतपणे सोडून देत नाही, तोपर्यंत त्यांच्यावरील जागतिक निर्बंधांमध्ये (Sanctions) एक टक्काही सूट दिली जाणार नाही. फ्रान्सच्या या विधानामुळे शांततेच्या आशेने सुरू असलेल्या वाटाघाटींना मोठा धक्का बसला आहे. वाचा सविस्तर
13 Jul 2026 03:35 PM (IST)
अमेरिका-इराणमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटून उठला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली असून मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान इराणने खामेनेईंच्या आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हत्येचा बदला घेण्याचे निश्चित केले असून १३ नेत्यांची यादी तयार केली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या रिवेंज लिस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतान्याहू, कीर स्टारमर, इमॅन्युएल मॅक्रॉन, जॉर्जिया मेलनी आणि फ्रेडरिक मर्झ यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या दफनविधीनंतर ही यादी समोर आली आहे. मात्र, इराण सरकारने या यादीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
Trump orders MILITARY to BOMB IRAN ‘at levels they’ve NEVER SEEN BEFORE’ if he’s ASSASSINATED
Says Israeli intel on ‘Iranian plot’ NOT NEW — ‘Israel came up with NOTHING’
ADMITS Iran could SUCCEED: ‘I HOPE YOU’LL MISS ME’#teenager #FursuitFriday #VolkaWasHere #Iran #War pic.twitter.com/6bi3sItmBv
— Shadow Truthland (@Shadowtruthland) July 10, 2026
13 Jul 2026 03:30 PM (IST)
कोरेगाव, ता. 13 : जगात भारी सायकल वारी…एकच गाव कोरेगाव…अशा घोषणा देत आज सकाळी येथील सरस्वती विद्यालयाच्या मैदानावरून कोरेगाव सायकल प्रेमी फाऊंडेशनच्या सायकल वारीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. या वारीत कोरेगाव शहर व परिसरातील शंभरवर सायकल प्रेमी सहभागी झाले असून, त्यात १५ महिला व मुलींचा सहभाग आहे. वाचा सविस्तर
13 Jul 2026 03:25 PM (IST)
महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ई-केवायसी (e-KYC) आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रियेनंतर 92 लाखांहून अधिक महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळल्याचा दावा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर
13 Jul 2026 03:20 PM (IST)
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marriag: बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे तिसरे लग्न आता केवळ एक वैयक्तिक बाब राहिलेली नसून; त्यामुळे नव्या राजकीय वादाची ठिणगीदेखील पडली आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नावरुन त्यांनी निशाणा साधला आहे. अशा प्रकरणांकडे ‘लव्ह जिहाद’ची उदाहरणे म्हणून पाहिले पाहिजे का, असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वाचा सविस्तर
13 Jul 2026 03:15 PM (IST)
आधुनिक युद्धाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. आजच्या काळात प्रत्यक्ष रणांगणावर एकही गोळी झाडण्यापूर्वी किंवा सैन्याची हालचाल होण्यापूर्वी खरी लढाई अंतराळात आणि सेन्सर्सच्या साहाय्याने लढली जाते. युद्धाचा एक साधा नियम आहे – जी बाजू शत्रूला प्रथम पाहते, परिस्थिती समजून घेते आणि त्वरित निर्णय घेते, तीच बाजू युद्धावर नियंत्रण मिळवते. यालाच लष्करी भाषेत गुप्तचर, निगराणी आणि टेहळणी म्हणजेच ‘आयएसआर’ (ISR – Intelligence, Surveillance, and Reconnaissance) प्रणाली म्हटले जाते. भारत आणि चीन यांच्यातील ३,४८८ किलोमीटर लांबीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) आणि हिंदी महासागरातील वाढती स्पर्धा पाहता, या ISR क्षमतेमधील दरी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक मोठे आव्हान बनली आहे. वाचा सविस्तर
13 Jul 2026 03:10 PM (IST)
LPG Cylinder Update: जागतिक स्तरावर राजकीय उलथापालथ आणि त्याचा परिणाम भारतात सर्वात पहिला दिसून आला तो म्हणजे इंधन आणि सिलेंडरच्या स्वरुपात. या सगळ्यावर सरकारने सिलेंडरबाबत वेगवेगळे नियम काढलेत. बऱ्याच गोष्टींमध्ये बदल केला आहे. आताही भारतात वापरला जाणारा पारंपरिक १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर हळूहळू कालबाह्य होत आहे का? असा प्रश्न एका ताज्या बातमीने हा चर्चेत आणला आहे. वास्तविक पाहता, सरकारी तेल कंपन्या आता १० किलोच्या लहान एलपीजी सिलेंडरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढवण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे गॅस बाजारपेठेत मोठे बदल घडून येऊ शकतात. वाचा सविस्तर
13 Jul 2026 03:05 PM (IST)
जालना: जालना जिल्ह्यात तब्बल दहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 20 वर्षीय तरुणाच्या हत्येचा अखेर डीएनए चाचणीच्या अहवालातून उलगडा झाला आहे. पैशांच्या व्यवहारातून झालेल्या वादातून हृषीकेश प्रकाश पवार याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह स्कॉर्पिओ गाडीतून दुधना नदीत फेकण्यात आला होता. वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नेमकं काय घडलं?
13 Jul 2026 02:59 PM (IST)
राज्याच्या काही भागांत मागील आठवड्यात अतिवृष्टीसदृश पाऊस होऊन, सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला. समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्यांचा टक्का वाढला असून, राज्यात ५९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत मात्र विदर्भात पावसानं ओढ दिलीय. तिथल्या पेरण्या खोळंबल्या आहेत. या भागात आतापर्यंत ६० टक्केच पेरण्या झाल्यानं, शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, मोसमी पावसाच्या हंगामात प्रशांत महासागरातील 'एल निनो' स्थितीचा प्रभाव वाढतोय. पावसाचं प्रमाण असमान होत आहे. जून महिन्यात दीर्घ काळ पावसानं ओढ दिल्यानंतर जुलैच्या सुरुवातीला मोमसी पाऊस सक्रिय होऊन कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीसदृश पाऊस झाला. मात्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि विदर्भातील काही भागात आतापर्यंत सरासरीहून कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील निम्मा भाग सध्या दुष्काळाच्या सावटाखाली आहे.
13 Jul 2026 02:50 PM (IST)
दिल्लीत जंतरमंतर इथं अभिजीत दिपकेंने विषय उचलला. विद्यार्थी आत्महत्या करतायत तिकडे सरकार लक्ष देत नाहीय. अभिजीत व सोनम वांगचुंक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. 16 दिवस झाले उपोषण करतायत. प्राणांतिक उपोषण करू नका असे मी फोनवरून बोललो. वांगचुक यांची प्रकृती खालावत चालली आहे
13 Jul 2026 02:40 PM (IST)
लाडकी बहीण' योजनेतून ९२ लाख लाभार्थी महिलांना वगळल्याचे समोर आले आहे. ई केवायसी न करणे, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थी महिलांना वगळ्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २८ लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आले आहेत.
13 Jul 2026 02:29 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. वारकरी अपघात दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी खबरदारीचे आवाहन केले. तसेच लाडकी बहीण योजना कायम राहणार असून, फक्त नियमांनुसार अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळली जात असल्याचे स्पष्ट केले.
13 Jul 2026 02:20 PM (IST)
मुंबईत सात वर्षीय चिमुकलीवर शौचालयात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
13 Jul 2026 02:11 PM (IST)
वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुख व्यक्त केले. भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, जखमींवर शासकीय खर्चातून उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
13 Jul 2026 02:00 PM (IST)
गुन्हेगारी विश्वातील तसेच कामगार नेते म्हणून ओळख असलेल्या बाबा फर्जन दोरडी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्ता, बेहिशेबी रोख रक्कम आणि शस्त्रसाठ्याचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. रविवारी छावणी पोलिसांनी फार्महाऊसची पुन्हा झडती घेऊन दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या शीला बाबा फर्जन दोरडी हिची चौकशी केली. खासगी खोलीत कधीच प्रवेश नव्हता, त्यामुळे तेथील रोख रक्कम, दागिने किंवा शस्त्रांबाबत माहिती नसल्याचा दावा तिने केला आहे.
13 Jul 2026 01:55 PM (IST)
महाराष्ट्राच्या प्रमुख ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ‘ अंतर्गत नोंदणी केलेल्या दहापैकी जवळपास चार महिलांना राज्यव्यापी पडताळणी प्रक्रियेनंतर योजनेतून वगळण्यात आले आहे. सरकारी नोंदीनुसार, ९२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. ही संख्या राज्य सरकारने आतापर्यंत वगळलेल्या अंदाजे ८० लाख लाभार्थ्यांपेक्षा खूप जास्त आहे. वगळण्यात आलेल्यांपैकी बहुसंख्य, म्हणजेच अंदाजे ६२ लाख लाभार्थी, आवश्यक असलेली इलेक्ट्रॉनिक ‘नो युवर कस्टमर’ (eKYC) प्रक्रिया पूर्ण करू शकले नाहीत. उर्वरित लाभार्थी योजनेच्या उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेले, सरकारी कर्मचारी असलेले, इतर कल्याणकारी योजनांचे लाभार्थी असलेले, वयोमर्यादेपेक्षा जास्त वयाचे आणि अंदाजे २९,००० प्रकरणांमध्ये पुरुष लाभार्थी असल्यामुळे अपात्र ठरले.
13 Jul 2026 01:45 PM (IST)
भारतातील आघाडीचे गायक अरिजीत सिंग, बादशाह आणि सुनिधी चौहान यांनी आणि यांसारख्या बऱ्याच सिंगर्सने एकाच वेळी नव्या आणि अनोख्या स्टार्टअपवर मोठी गुंतवणूक केली आहे. नव्याने आलेल्या आणि आपला पाया उभारणाऱ्या या स्टार्टअपची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नेमका काय आहे हा स्टार्टअप आणि याची का इतकी चर्चा सुरु आहे? ज्याचा क्रेझ सध्या जोरदार वाढला आहे.
13 Jul 2026 01:35 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आता आणखी एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ आणि ‘तिघी’ या चित्रपटांनंतर आता तो ‘समर्थ’ या आगामी चित्रपटात झळकणार असून, या चित्रपटातील त्याचा लूक आणि भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.‘समर्थ’चे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या तेजस्वी प्रतिमेसमोर उभा असलेला पुष्कराजचा साधा, सात्त्विक आणि विचारमग्न लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
13 Jul 2026 01:20 PM (IST)
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांचे शासकीय वाहन अडवून, शासकीय कर्तव्य पार पाडण्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे (रा. गेवराई पायगा, ता. फुलंब्री) यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ८ जून रोजी झालेल्या या प्रकरणात १० जुलैला म्हणजे महिनाभरानंतर कारवाई करण्यात आली आहे.
13 Jul 2026 01:15 PM (IST)
युक्रेन आणि रशिया (Ukraine and Russia) दरम्यान सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सुरक्षेला हादरवून सोडणारा एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक खुलासा समोर आला आहे. प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या एका शोधनिबंधानुसार, युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशांमधून हद्दपार करण्यात आलेले रशियाचे अनेक वरिष्ठ गुप्तचर अधिकारी (एजंट्स) आता जपानमध्ये सक्रिय झाले आहेत. रशियासाठी जपान हा केवळ एक देश नसून, युक्रेन युद्धासाठी आवश्यक असणारे प्रगत तंत्रज्ञान गोळा करण्याचा एक मुख्य सुरक्षित तळ बनला आहे. रशियन लष्कराला आपली क्षेपणास्त्रे, आधुनिक ड्रोन आणि इतर घातक शस्त्रे विकसित करण्यासाठी ज्या प्रगत तंत्रज्ञानाची गरज आहे, ते जपानमधून छुप्या मार्गाने मिळवणे हा या गुप्तचरांचा मुख्य उद्देश आहे.
13 Jul 2026 01:08 PM (IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, १४ जुलै रोजी राज्यभरात व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘हरित महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी एसटी महामंडळाने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे आणि बसस्थानक परिसरात स्थानिक हवामानाला अनुरूप तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या स्थानिक प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे.
13 Jul 2026 01:02 PM (IST)
गुन्हेगारी विश्वातील तसेच कामगार नेते म्हणून ओळख असलेल्या बाबा फर्जन दोरडी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्ता, बेहिशेबी रोख रक्कम आणि शस्त्रसाठ्याचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. रविवारी छावणी पोलिसांनी फार्महाऊसची पुन्हा झडती घेऊन दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या शीला बाबा फर्जन दोरडी हिची चौकशी केली. खासगी खोलीत कधीच प्रवेश नव्हता, त्यामुळे तेथील रोख रक्कम, दागिने किंवा शस्त्रांबाबत माहिती नसल्याचा दावा तिने केला आहे. आरोपी शीला बाबा फर्जन दोरडी हिची आजही सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर काळा दरवाजा परिसरातील रोहिला गल्ली रोडवरील बंगल्याची झडती घेतली जाणार आहे. संबंधित बंगला बाबा फर्जन यांनी हक्कसोडपत्राद्वारे आपल्या भावाच्या नावावर करून दिल्याची माहिती तपासात समोर आली असून, त्या अनुषंगाने कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक जाधव यांनी दिली.
13 Jul 2026 12:48 PM (IST)
सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित पुण्यातील गुन्हेगारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून, संघटित गुन्हेगारीविरूद्ध पुणे पोलिसांनी गेल्या काही वर्षांत 'ऑपरेशन कोयता', मोक्का, तडीपार, प्रतिबंधात्मक कारवाया, सीसीटीव्ही विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून प्रभावी मोहीम उघडली असली तरी महिलांवरील अत्याचार, साखळीचोरी, वाहनचोरी आणि नागरिकांच्या ऐवजावर डल्ला मारणाऱ्या गुन्ह्यांनी मात्र पोलिसांची डोकेदुखी कायम ठेवली आहे. दुसरीकडे खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये काही प्रमाणात घट दिसून येत आहे.
13 Jul 2026 12:36 PM (IST)
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिकेत रविवारी झालेल्या आढावा बैठकीत आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दुर्घटनेनंतरच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
13 Jul 2026 12:24 PM (IST)
बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात झाला असून, या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोरेगाव पार्क पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिक हे बंडगार्डन रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना मोबाइलद्वारे संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. ‘ज्येष्ठ नागरिकाच्या नावे बँकेत बनावट खाते उघडण्यात आले आहे. या खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अटकेची (डिजिटल ॲरेस्ट) कारवाई करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविली होती. बँक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी एका खात्यात तातडीने २१ लाख रुपये जमा करावे लागतील, असेही सांगण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबा पोटे तपास करत आहेत.
13 Jul 2026 12:12 PM (IST)
श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात यंदाही चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दर्शनासाठी आलेल्या महिला व पुरूष भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत: वारकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी कडेकोट पोलिस तैनात असताना देखील या चोऱ्या झाल्या आहेत. पोलिसांकडून साध्या गणवेशातील पोलिस व इतर पथके असतानाही या चोऱ्या घडल्या आहेत. एकूण ११ घटना घडल्या असून, त्यापैकी ९ घटना एकट्या हडपसर परिसरात नोंदविण्यात आल्या आहेत.
13 Jul 2026 12:00 PM (IST)
भाजपमध्ये पुर्नप्रवेशाच्या चचर्चादरम्यान ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः फोन करून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. वाढदिवसानिमित्त भाजपमध्ये त्यांचा जाहीर प्रवेश होणार असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी दिल्लीतील भेटीबाबतही खुलासा केला.
13 Jul 2026 11:50 AM (IST)
यंदाच्या खरीप हंगामावर ‘अल निनो’ च्या प्रभावाचे सावट असून राज्यात पावसाचे आगमन उशिरा होणे, पावसाचे प्रमाण कमी राहणे किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर पिकांच्या उत्पादनातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन आपत्कालीन पीक नियोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन सोलापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले.
13 Jul 2026 11:50 AM (IST)
इस्रायलमध्ये आगामी संसदीय निवडणुकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्यानंतर आणि गाझा, लेबनॉन, इराणसोबतच्या संघर्षानंतर देशात पहिल्यांदाचा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.
13 Jul 2026 11:40 AM (IST)
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा काही दिवसांपूर्वी तिसरी विवाहसोहळा पार पडला. आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केलं.त्यांच्या लग्नाचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत आणि चर्चा देखील होत आहे. अशातच आता अभिनेते शेखर सुमन यांनी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावर भाष्य करत टोमणा मारला आहे.
13 Jul 2026 11:30 AM (IST)
राहुल द्रविड इंग्लंड कसोटी संघाचा पुढील प्रशिक्षक बनू शकतो. ब्रेंडन मॅककुलमला कसोटी प्रशिक्षक पदावरून हटवल्यानंतर राहुल द्रविडचे नाव समोर आले आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या १-२ च्या पराभवानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने मॅककुलमला काढून टाकण्याचा निर्णय घेतला. द्रविडसोबतच, आणखी दोन अनुभवी खेळाडूही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.
13 Jul 2026 11:02 AM (IST)
इटालियन टेनिस स्टार यानिक सिनरने एक जबरदस्त कामगिरी करत विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. सेंटर कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, सिनरने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-७(७), ७-६(२), ६-३, ६-४ असा पराभव करून प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली. तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी दमदार सर्व्हिस आणि प्रभावी रॅलीचे प्रदर्शन केले. तथापि, निर्णायक क्षणी सिनरची कामगिरी सरस ठरली आणि त्याने आपले पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद निश्चित केले.



