नाशिक : शहरात स्मार्ट सिटी कंपनीच्या (Smart City) माध्यमातून सुरू असलेल्या कामांवर गेल्या सात वर्षात सुमारे 400 कोटींचा खर्च झाला असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तेवढाच निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे. अद्यापपर्यंत 60 टक्के कामे पूर्ण झाली असून, त्यात कामे पूर्ण झालेल्या 10 कामांचा समावेश आहे.
नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी गुरूवारी (दि.3) स्मार्ट सिटी कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी आढावा सादर करत पूर्ण झालेले व अपूर्ण परंतु, सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. नाशिक शहराची केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली आणि 2015 पासून कंपनीचा कारभार रोह विडी व जुने नाशिकमधील गावठाण भागात सुरू झाला. त्याचबरोबर इतरही काही पायाभूत सोयी सुविधा निर्माण करून देणाऱ्या योजना, विकासकामे व एका कंपनीने हाती घेतले आहेत.
पूर्ण झालेली कामे अशी…
विद्युत दाहिनी, महात्मा फुले कलादालन आर्ट गॅलरी, नेहरू उद्यान, कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे नूतनीकरण व सुशोभीकरण, गोदावरी नदीचे खोलीकरण करणे, प्रायोगिक तत्वावरील १.१ किमीचा स्मार्ट रोड, पं. पलूस्कर नाट्यगृहाचे नूतनीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशव्दार, गोदावरी नदीतील गाळ काढणे अशी दहा कामे पूर्ण झाल्याची माहिती कंपनीचे सीईओ सुमंत मोरे यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून एक हजार कोटींची कामे
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत दहा कामे पूर्ण झाली असून, दहा कामे सुरू आहेत. एकूणच गेल्या सात वर्षात ६० टक्के कामे पूर्ण झाले असून, त्यावर ४०० कोटींचा खर्च झाला आहे. नाशिक शहरात स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून एक हजार कोटींची कामे होणार आहेत.