फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा कोयना जलाशयात दाखल; मुनावळे परिसरात निसर्गप्रेमींची वाढली वर्दळ
कास पठार : स्थलांतरित पक्ष्यांमध्ये विशेष आकर्षण असलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फ्लेमिंगो पक्षी (रोहित पक्षी) कोयना जलाशयातील मुनावळे परिसरात दाखल झाले असून, त्यांच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि हे पक्षी पाहण्यासाठी निसर्गप्रेमी कोयना मुनावळे परिसरात भेट देत आहेत.
मुनावळे परिसरातील जलाशयाच्या उथळ भागात फ्लेमिंगोंचा थवा विसावलेला पाहायला मिळत आहे. लांब पाय, वाकडी चोच आणि गुलाबी-पांढऱ्या रंगाच्या आकर्षक पिसांमुळे हे पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जलाशयातील सुरक्षित अधिवास, मुबलक खाद्य आणि शांत वातावरणामुळे या स्थलांतरित पक्ष्यांनी कोयना जलाशयाची निवड केल्याचे जाणकारांचे मत आहे.
दरवर्षी विविध देशांमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी भारतातील जलक्षेत्रांमध्ये दाखल होतात. यंदा मुनावळे परिसरात त्यांचे दर्शन झाल्याने कोयना परिसराच्या जैवविविधतेत भर पडली आहे. स्थानिक नागरिक आणि छायाचित्रकारांकडून फ्लेमिंगोंचे छायाचित्रण सुरू असून, त्यांच्या उपस्थितीमुळे पक्षीनिरीक्षण पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
फ्लेमिंगोची काळजी घ्यावी
या दुर्मिळ पाहुण्या पक्ष्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखावे, मोठ्या आवाजाचा वापर टाळावा आणि परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन वन्यजीव अभ्यासकांनी केले आहे. कोयना जलाशयात फ्लेमिंगो पक्ष्यांचे झालेले आगमन हे परिसरातील समृद्ध पर्यावरणाचे द्योतक मानले जात असून, निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरत आहे.
फ्लेमिंगो घेत आहेत लक्ष वेधून
मुनावळे परिसरातील जलाशयाच्या उथळ भागात फ्लेमिंगोंचा थवा विसावलेला पाहायला मिळत आहे. लांब पाय, वाकडी चोच आणि गुलाबी-पांढऱ्या रंगाच्या आकर्षक पिसांमुळे हे पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
फ्लेमिंगो दिसत आहेत आता साताऱ्यात
हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला भारतातील तलाव, समुद्रकिनारे आणि कच्छच्या वाळवंटात आढळणारा एक गुलाबी रंगाचा पक्षी तो म्हणजे फ्लेमिंगो. जर तुम्हाला भारतात फ्लेमिंगो आणि त्यांचे सौंदर्य पाहायचे असेल, तर तुम्ही या पाच ठिकाणी भेट देऊ शकता. येथे तुम्हाला डझनभर फ्लेमिंगो बागडताना दिसतील. पण, आता हेच पक्ष महाराष्ट्रात तेही साताऱ्यात दिसून आल्याने सर्वांचे एकच लक्ष लागले आहे.
Virar Cirme : कॅमेरा झूम केला अन् समोर आलं धक्कादायक दृश्य; डोंगराळ भागात झाडाला लटकलेला मृतदेह






