Photo Credit- Social media
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत आणखी एक वादाची ठिणगी पडली आहे.छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मतदारसंघातून महायुतीत खटके उडत असल्याचे समोर आले आहे. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत जसा युतीधर्म निभावला नसेल तसाच युतीधर्म आम्हीही विधानसभा निवडणुकीत निभावणार असल्याची भूमिका सिल्लोड भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. तर दुसरीकडे, सिल्लोडमध्ये भाजपला त्यांचा उमेदवार द्यायचा असेल कर त्यांनी द्यावा पण मी आजूबाजूच्या मतदारसंघाच शिवसेनेचा उमेदवार उभा करणार, असा थेट इशाराचा सत्तार यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीतील वादाचा नवा अंक सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
अब्दुल सत्तार एकनाथ शिंदेंसोबत सत्त्तेत सामील झाले पण ते आतापर्यंत भाजप नेत्यांचा विश्वास संपादन करण्यात अयशस्वी ठरले. महायुतीत असतानाही त्यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना कधीच स्वीकरले नाही. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप-शिंदे सेनेत नवा वाद उफाळू आला आहे.
हेदेखील वाचा: कल्पना चावला अपघातातून नासाने घेतला धडा; सुनीता विल्यम्स प्रकऱणात बदलले नियम
सिल्लोडमध्ये भाजप नेत्यांनी अब्दुल सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तारांपुढे नव्या अडचणी उभ्या राहणार आहेत. पण भाजपने आपल्याविरोधात काम केल्यास आपणही इतर मतदारसंघात तशीच भूमिका घेऊ असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे. अब्दुल सत्तारी यांनीदेखील मराठवाड्यात भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. अब्दुल सत्तारामुळेच त्यांचा पराभव झाल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता. तर आपल्या कार्यकर्त्यांनी दानवेंना मदत केली नाही. असे सत्तार यांन म्हटले होते. त्यानंतर सत्तारांच्या याच वक्तव्यानंतर भाजप आणि सत्तारांमधील अंतर वाढत गेले.
हेदेखील वाचा: विनेश फोगाट पोहचली शेतकरी आंदोलनात; शंभू बॉर्डरवर नेमकं काय घडलं?