Photo Credit- Social Media
अंतराळ स्थानकात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना पृथ्वीवर सुखरूप आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी अनेक पर्यायांचाही विचार झाला. पण त्यात अनेक धोके असल्याने त्यांना पृथ्वीवर आणण्याचा कालावधी फेब्रुवारी 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. तोपर्यंत नासा आणखी काही पर्यायांचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांना आणण्यात नासाला कोणतीही चूक करायची नाही. याचे कारण म्हणजे यापूर्वी 2003 आणि 1986 मध्ये झालेल्या अपघातात अनेक अंतराळविरांना आपले प्राण गमावावे लागले होते. अशा परिस्थितीत नासा आता सावधगिरीने काम करत आहे. सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या साथीदारांना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पृथ्वीवर परत आणले जाईल, अशी माहिती नासाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा: कोल्हापुरातील गोकुळच्या सभेत राडा; सत्ताधारी विरोधक आमने- सामने
1 फेब्रुवारी 2003 रोजी भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला आणि इतर सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांचे स्पेस शटल कोलंबिया यान पृथ्वीच्या कक्षेत पोहचताच त्यांच्या यानाचा मोठा स्फोट झाला आणि या अपघातात कल्पना चावला यांच्यासह त्यांच्या सर्व साथीरदारांचा मृत्यू झाला. नासासाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यापूर्वी 28 जानेवारी 1986 रोजीही अपघात झाला होता. या स्फोटात 14 अंतराळवीरांना आपला जीव गमवावा लागला.
नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितले की, दोन अपघातांमुळे अंतराळवीरांशिवाय बोईंग स्टारलाइनर परत करण्याच्या निर्णयावर मोठा प्रभाव पडला. नेल्सन हे स्वतः अंतराळवीर आहेत आणि दोन स्पेस शटल अपघातांच्या तपास पथकांचा भाग आहेत. त्या काळात नासाने स्पष्टपणे चुका केल्या होत्या, असे ते म्हणाले. नासाची संस्कृती अशी होती की कनिष्ठ उड्डाण अभियंत्यांनी धोक्यांबद्दल चेतावणी देऊनही, कोणीही त्यांचे ऐकले नाही. आज लोकांना त्यांचे मन बोलण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
हेदेखील वाचा: भारतीय नौदलामध्ये भरती प्रक्रियेस सुरूवात; ‘या’ पदासाठी घेण्यात येतेय भरती
कल्पना चावला आणि त्यांच्या टीममधील सहकारी दक्षिण अमेरिकेत आकाशात मरण पावले. स्पेस शटल कोलंबिया पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत असताना ही घटना घडली. नियोजित लँडिंगच्या 16 मिनिटे आधी त्यांच्या यानाचा स्फोट झाला. आता अशा परिस्थितीत नासाने सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना फेब्रुवारी 2025 मध्ये परत आणण्याचा निर्णय घेतला. अभियंत्यांनी सध्याची परिस्थिती आणि अंतराळ यानाच्या उड्डाणातील धोके स्पष्ट केले आहेत. परतीसाठी अंतराळयान बदलण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.