ओव्हरलोड ट्रकची चार वाहनांना जोरदार धडक; टोलनाका चुकवण्याच्या प्रयत्नात घडलं सारं काही... (संग्रहित फोटो)
राजापूर : मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यापैकी एक महिलेचा मृत्यू झाला आहे. वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठार दिशेने महिलांना घेऊन निघालेला टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटला.
सुमारे १०० ते १५० फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत टेम्पो फरफटत गेला. टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. अपघातात टेम्पोचालक आणि केबिनमध्ये असलेले इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलिस ठाण्याचे पथक पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली १५-२० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील अनेक आणि जेठावर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.
आणखी एका टँकरचा अपघात
दुसऱ्या एका घटनेत, रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा गुरववाडी इथल्या अवघड वळणावर अपघात झाल्याची घटना घडली. वळणाचा अंदाज न आल्याने टँकर पलटी झाला. गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. सुदैवाने टँकर रिकामा असल्याने एलपीजी गॅस गळतीचा धोका झाला नाही. हातखंबा गावाजवळ महिन्याभरात एलपीजी टँकर अपघाताची तिसरी मोठी घटना आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात
दुसऱ्या एका घटनेत, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढतच चालले असून माणगाव तालुक्यातील लाखपाले येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातात महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले वैद्यकीय अधिकारी गंभीर जखमी झाले.