पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या तीन मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला.चितळे रोड येथील ऐतिहासिक नेहरू मार्केटच्या ठिकाणी 9 कोटी 34 लाख रुपये निधीतून भव्य व्यापारी संकुल आणि आधुनिक भाजी मार्केट उभारले जाणार आहे. यामुळे मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना हक्काची व सुसज्ज जागा मिळणार आहे.
Ahilyanagar : महागाईचा भडका, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ
सावेडी उपनगरातील प्रवाशांची सोय लक्षात घेता, 5 कोटी रुपये निधी खर्चून बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. अत्याधुनिक इमारत आणि प्रवासी सुविधांनी सज्ज अशा या स्थानकाचे भूमिपूजन संपन्न झाले. पत्रकार चौक ते डी.एस.पी. चौक दरम्यान66.37 लाख रुपये खर्चून बसवण्यात आलेल्या सेंट्रल लाईन एल.ई.डी. पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे हा मुख्य रस्ता आता प्रकाशमान झाला असून रात्रीच्या वेळी वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. या सर्वसोयी सुविधांमुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे.
Ahilyanagar News : सराफ व्यावसायिकाचा अमानुष छळ; पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक!






