एअर इंडियाचे पुणे-दिल्ली विमान रद्द (फोटो -सोशल मिडिया)
पुणे: एअर इंडियाच्या विमानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अहमदाबाद प्लेन क्रॅश दुर्घटनेनंतर एअर इंडियाची अनेक विमाने अचानक रद्द झाली आहेत. काहींचे तांत्रिक बिघडामुळे लॅंडींग देखील करण्यात आले. तर आता दिल्ली-पुणे फ्लाइटबाबत देखील अशीच माहिती समोर येत आहे. दिललीवरून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटला पक्षी धडकला. त्यामुळे या विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
दिललीवरून पुण्याला येणारी एअर इंडियाची फ्लाइटला पक्षी धडकल्याने या पुणे ते दिल्ली अशी फेरी रद्द करण्यात आली आहे. पक्षी धडकल्याने परतीची फ्लाइट कंपनीला रद्द करावी लागली आहे. मात्र दिललीवरून येणारे विमान पुणे विमानतळावर सुरक्षितपणे उतरले असल्याची माहिती एअरलाइन्सने दिली आहे.
सध्या पक्षी धडकलेल्या विमानची टेक्निकल टीम तपासणी करत आहे. मात्र आता हीच फ्लाइट पुण्यावरून दिल्लीला जाणार होती, ती आता रद्द करण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पुणे ते दिल्ली जाणाऱ्या फ्लाइटला पक्षी धडकला असल्याने उड्डाण रद्द करण्यात आले आहे. प्रवाशांची व्यवस्था एअरलाइन्सकडून करण्यात येत आहे. प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहेत .
एअर इंडियाची ८ उड्डाणे रद्द
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर हा आठवडा विमान कंपन्यांसाठी अतिशय अडचणीचा ठरत असल्याचे दिसत आहे. अमहमदाबाद विमान अपघातानंतर तांत्रिक बिघाड, सुरक्षा धोक्यांसह विविध कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत किंवा वळवली जात आहेत. या सगळ्यात, एअर इंडियाने शुक्रवारी ८ उड्डाणे रद्द केली आहेत. यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय आणि ४ देशांतर्गत उड्डाणे समाविष्ट आहेत. उड्डाणे रद्द करण्यासाठी एअरलाइनने देखभाल आणि ऑपरेशनल कारणे दिली आहेत. एअरलाइनने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. एअर इंडियाने ही उड्डाणे रद्द केली आहेत.
दुबई ते चेन्नई – AI906
दिल्ली ते मेलबर्न – AI308
मेलबर्न ते दिल्ली – AI309
दुबई ते हैदराबाद – AI2204
पुणे ते दिल्ली -AI874
अहमदाबाद ते दिल्ली -AI456
हैदराबाद ते मुंबई -AI-2872
चेन्नई ते मुंबई -AI571
Air India News: एअर इंडियाची ८ उड्डाणे रद्द; चार आंतरराष्ट्रीय विमानांचाही समावेश
एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
एअर इंडियाचे विमान एआय ३७९ फुकेतहून नवी दिल्लीला निघाले. या विमानात १५६ प्रवासी होते, परंतु उड्डाणानंतर बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर अंदमान समुद्राभोवती फिरून विमान परतले आणि इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. फुकेट विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आपत्कालीन लँडिंगनंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे आणि सर्वजण सुरक्षित आहेत.