नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ३९ सभा घेत प्रचाराचा झंझावात
मुंबई: राज्यातील २६४ नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी (2 डिसेंबर) मतदान झाले. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे या महायुतीच्या तीनही नेत्यांनी मैदानात उतरुन जोरदार प्रचार केला. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मात्र निवडणुकीत सक्रीय दिसले नाहीत. यावेळी संपूर्ण निवडणुक प्रचारात अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे लक्षवेधी ठरले. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी बहुजनवाद आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवून भाषणांवर भर दिल्याचे दिसून आले. संपूर्ण निवडणुकीचा प्रचार हा अजित पवार यांनी मांडलेल्या निधीच्या मुद्याभोवतीच फिरत राहिला.
अजित पवार यांनी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात अनेक सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सांगत असताना त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा आणि विकासकामांचे मुद्दे मांडत मतदारांना साद घातली. विकासाच्या बाबतीत अनेक सभा मधून अजित पवार यांनी विकासाच बारामती मॉडेल लोकांसमोर मांडून त्या त्या भागात तश्याच पद्धतीचा विकास करण्यासाठी मतदारांना साद घातली या निमित्ताने अजित पवारांचे बारामती मॉडेल राज्यात पुन्हा चर्चेत आले. आपल्या भाषणातून ग्रामीण भाषेत लोकांशी मोकळा संवाद साधत हलके फुलके विनोद ही अजित पवार यांच्या भाषण शैलीची खासीयत आहे. त्यामुळे माध्यमात देखील त्यांच्या भाषणांची यावेळी विशेष चर्चा दिसून आली.
भाजपसोबत असतानाही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची धर्मनिरपेक्ष विचारधारा, सर्व समाजघटकांना न्याय हीच आपली भूमिका कायम असल्याचे देखील या निवडणुक प्रचारात पुन्हा लोकांसमोर मांडले. सत्तेत राहून विकास कामे करायची आहेत. मी बारामती आणि पिंपरी चिंचवडचा विकास ज्या पद्धतीने केला तसा विकास करायचा आहे, अशा पद्धतीने त्यांनी भाषणातून मतदारांना साद घालत विकासावरही भर दिला.
अजित पवार यांनी आपल्या भाषणात स्थानिक विकासाला पाठबळ देत निधीचा मुद्दा चर्चेत आणला आणि त्यामुळे महायुती मधील चंद्रकांत पाटील यांना त्याला उत्तर द्यावे लागले तसेच शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तिजोरी आमच्या घरात आहे असे म्हणत त्याला उत्तर दिले , एकनाथ शिंदे यांना निधीला उत्तर देण्याकरिता जाहीर सभा मधून फोन करून माझे मंत्री माझ्या शब्दावर काम करतात अशी मांडणी करावी लागली , दादांच्या भाषणाला उत्तर देणारी इतर नेत्यांची भाषण झाली आणि अजितदादा त्यामुळे प्रचारात मुख्य स्थानी राहिले
दिवसभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात पाच ते सात सभा दररोज अशा पद्धतीने अजित पवार यांनी महाराष्ट्रभर प्रचारदौरे केले. महाराष्ट्राचा पुरोगामी वारसा जपत आम्ही वाटचाल करत आहोत, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला जी दिशा दाखवली त्याच पद्धतीने आम्हाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे. शेतकरी, महिला, युवकांचा रोजगार, शहरांचा सुनियोजित विकास, पाणी प्रश्न, पर्यारण, लोकसंख्या वाढ तसेच वंचित, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी, मागासवर्गीय घटक अशा सर्व बुहजन समाजाच्या मुद्द्यांवर देखील त्यांनी सभेतून भर दिला. अजित पवार यांचा सर्व प्रचारात मोठमोठ्या आश्वासनांपेक्षा गाव पातळीवरील समस्यांवर फोकस असल्याचे दिसून आले.
बीड जिल्ह्यात प्रचार दौऱ्यात असताना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या दिवशी अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत, देशमुख यांची कन्या वैभवी हिच्या शिक्षणासंदर्भात आणि कुटुंबाच्या न्यायालयीन लढ्यासंदर्भात संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. विरोधी पक्षांकडून टीका झाली तरी, अजित पवार यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेची देखील चर्चा झाली.






