गणेशोत्सवामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अनेकांच्या घरच्या गणपतींचं दर्शन (Ganeshotsav 2022) घेताना दिसत आहेत. यावरुन राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
[read_also content=”आज पुन्हा एकदा नव्या नासा ‘Artemis I’ करणार लाँच https://www.navarashtra.com/technology/today-once-again-nasa-will-launch-artemis-i-nrrd-322040.html”]
अजित पवारांनी अहमदनगरमध्ये (Ajit Pawar In Ahmednagar) म्हटलं की, गणेश उत्सव हा वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. पण याआधी कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत, अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.
अजित पवार म्हणाले की, दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा अधिकार आहे. वर्षानुवर्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी घडल्यात, ते सगळ्यांनी पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.