Photo Credit : Social Media
सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील सावंतवाडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावंतवाडीच्या सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलात साखळदंडाने बांधलेली एक महिलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आली आहे. तिला उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अमेरिकन दूतावासाला माहिती दिली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ललिता काई कुमार एस असे या अमेरिकन रहिवासी महिलेचे नाव आहे.
पोलीस तपासात अनेक गोष्टीचा समोर आल्या असून तिच्याकडे सापडलेल्या मोबाईल आणि टॅबमधील माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. ललिता काई या अमेरिकेतील प्रसिद्ध बेली डान्सर आणि योग शिक्षिका होत्या. योग क्षेत्रातील पुढील शिक्षण घेण्यासाठी त्या भारतात आल्या होत्या. योग प्रशिक्षण घेत असताना त्या तामिळनाडूतील एका तरुणाच्या संपर्कात आल्या आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतात घालवण्याचा निर्णय घेतला आणि त्या तरुणाशी विवाहबद्ध झाल्या. धक्कादायक म्हणजे गेल्या 40 दिवसांपासून त्या उपाशी आणि तहानलेल्या होत्या.
शनिवारी दुपारी एक गुराखी त्या ठिकाणी गुरे राखण्यासाठी गेला असता त्या गुराख्याला त्या एका झाडाला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. गुराख्याने तातडीने बांदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमी महिलेला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. धक्कादायक म्हणजे गेल्या 40 दिवसांपासून ती उपाशी आणि तहानलेली असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरूवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत पतीने अत्याचार करून विषारी औषधे दिल्याचे सांगितले. तसेच याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याचीही माहिती तिने दिली.
अन्न-पाणी न मिळाल्याने ती महिला अशक्त बनली होती. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी गोव्यातील ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पण महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला फारशी माहिती देता येत नसल्याने आता पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.