मुंबई – शुक्रवारी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर गजनान किर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र आज अमोल किर्तीकर यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासपभर चर्चा झाली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कीर्तिकरांच्या (Amol Gajanan Kirtikar) भेटीनंतर संजय राऊत यांनी ‘मला 100 दिवसानंतर तरुंगातून बाहेर आल्यानंतर जितका आनंद झाला नव्हता, तितका आनंद आज मला अमोल भेटायला आल्यानंतर झाला आहे’, अशी प्रितिक्रिया राऊत यांनी दिलेय.
[read_also content=”ठाकरे गटाला आणखी एक धक्का! ठाणे ग्रामीणमध्ये ठाकरे गटातील अनेक शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश https://www.navarashtra.com/maharashtra/thane-rural-many-shivsainiks-joined-the-shinde-group-in-the-presence-of-the-cm-344330.html”]
दरम्यान, पुढे बोलतना राऊत म्हणाले की, अमोल किर्तीकर यांनी त्यांच्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण वडिलांनी ऐकले नाही, आणि शिंदे गटात प्रवेश केला. आगामी काळात अमोल कीर्तिकर यांच्यासारख्या तरुणपिढीकडून शिवसेना पुढे जात आहे. आदित्य ठाकरे दौरे करत आहेत. उद्धव ठाकरेही सर्वत्र दौरे करत आहेत. वडील गेल्यानंतर मुलगा देखील शिंदे गटात जाईल अशी चर्चा होती, मात्र ही चर्चा अमोल यांनी खोडून काढली आहे, अमोल हे युवा नेते आहेत, ते आदित्यबरोबर काम करताहेत. सध्या महाराष्ट्राचे राजकारण इतके अस्थिर झाले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार, मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे, असेही राऊत यांनी म्हटले. अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण शिवसेनेच्या प्रवासात सोबत राहिलेले कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेबरोबरच आहेत असं राऊत म्हणाले.