पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत...; अमोल मिटकरींचे सूचक विधान
Amol Mitkari News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्या शिवसेनेत यांच्यात युतीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. युतीबाबत फक्त चर्चा नाही, तर लवकरच थेट घोषणा केली जाणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार आणि अजित पवार या दोन गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चाही रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांच्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
येत्या १० जूनला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहेत. या निमित्त पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या सगळ्यात दोन्ही राष्ट्रवादी पु्न्हा एकत्र येतील का, असा सवाल आमदार अमोल मिटकरी यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, दोन भाऊ एकत्र येणार असतील त्याचा राजकीय समीकरणांवर परिणाम होणारच आहे. कुणालाच कमजोर समजायचे नाही. पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत दोन्ही एकत्र येतील. पण त्याचवेळी असा कोणताही प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं, येत्या १० जूनला पुण्यात पक्षाचा मेळावा आहे, तोपर्यंत वाट पाहा, असा संकेतही त्यांनी यावेळी दिला.
MNS In BMC : मुंबई महापालिकेसाठी मनसेची जोरदार खेळी; तरुण नेतृत्व अमित ठाकरे उतरले मैदानात
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके अजित पवार यांच्या अर्थखात्यावरून सातत्याने टीका करत आहेत. तर शिंदे सेनेतील मंत्र्यांकडूनही शिंदे गटामुळे सरकार स्थापन झालं, पण आम्हाला राष्ट्रवादी नकोय, असा सूर आवळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे सरकार स्थापन झालं, पण देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सत्तेत घेतलं, असा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच आमदार महेंद्र दळवींकडून सातत्याने अजित पवार गटाला लक्ष्य केलं जात आहे. शिवसेनेने इतिहास घडवला, राज्यात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन केलं. पण हे महायुतीचे सरकार आम्हाला नकोय, आम्हालायुतीचेच सरकार हवे, असा दावा करत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रीकरण्याच्या चर्चाही सुरू असल्याचा दावा केला जात आहे.
कोलंबियात राष्ट्रपती पदाच्या उमेदवारावर गोळीबार; संशयिताला घटनास्थळी अटक