...म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट, नादुरुस्त कालव्यामुळे रब्बी पेरणी लांबली
तिवसा : खरिपाचे पीक अतिवृष्टीने वाहून गेले. अद्याप नुकसान भरपाई, रब्बीच्या पेरणीसाठी अनुदान सुद्धा सरकारकडून मिळाले नाही. अशा परिस्थितीत हिरवेगार बोंड असलेले कपाशीचे पीक काढून दहेगाव धरणाच्या पाण्यावर गव्हाचे पीक घेण्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे. प्रचलित परंपरेप्रमाणे ८ ते १५ डिसेंबरच्या दरम्यान धरणाच्या पाण्याचा पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या गव्हाची लागवड होते. मात्र, यावेळी २३ डिसेंबर येऊनही कालव्याचा बांधच दुरुस्त झाले नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या – पेरणी लांबली आहे.
दहेगाव धरणावरून तब्बल १५ गेटने पाणी सोडून सुमारे ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन दरवर्षी ओलीताखाली येते. याच पाण्यावर शेतकरी रब्बीच्या हंगामात गव्हाचे उत्पन्न घेते. मात्र, यावेळी मृद्धलसंधारण विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कालव्याचा बांध सुद्धा फुटला आहे. तर गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकठिकाणी गेट फुटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले होते. अशा दुरुस्तीचे काम यावेळी रब्बी पीक पेरणीच्या आधी होणे गरजेचे होते.
मात्र, दुरुस्तीची कामे उशिरा लागल्याने आता, गव्हाच्या पेरणीसाठी शेत तयार करून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी विवंचनेत सापडला आहे. शिरजगाव मोझरीतील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. दहेगाव धरणाच्या बांधावर जाऊन संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराला वासंबंधित सामाजिक कार्यकर्ते यांनी जाब विचारला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे कामे पूर्ण करून गुरुवारी सकाळपासून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मृजलसंधारणाच्या कार्यकारी अभियंता निकिता देशमुख यांच्याकडे केली आहे. त्यावरून गुरुवारी पाणी सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तातडीने दहेगाव धरणाची पाहणी दौरा करण्यार असेही देशमुख म्हणाल्या आहे.
कालव्याचे बांध अनेक ठिकाणी फुटले आहे. धातूरमातूर कामे केली जात आहे. अनेक ठिकाणी बांधाचे खोलीकरण झाले नाही, तर कचऱ्याचे ढिगारे सुद्धा बांधामध्ये दिसून येते. त्यामुळे धरणाचे पाणी सोडले तरी ते पाणी आमच्या शेतात न पोहचता अनेक विकाणी बाब फुटून नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी रमेश लडके यांनी दिली.
बाधाने कैल्या नाही, त्याचे पाणी धरणाच्या बांधामध्ये उत्तरते त्यामुळे माझ्या शेतात पाणी शिरते. सलग दोन वर्ष माझ्या शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे यावी धरणाचे पाणी सोडताना आधी प्रशासनाने बांध फुटून माझ्या शेतीवे नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे कबूल करावे किंवा चांगले काम करून तातडीने धरणाचे पाणी सोडावे, असं मत शेतकरी ललित हगवणे यांनी दिली.
कंत्राटदाराने जेसीपीने ओबडधोबड नाल्या काढल्या आहे. त्याची माती सुद्धा दूर टाकली नाही. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर तीच माती पुन्हा बांधांमध्ये जाऊन कॅनलचे गेट माती भरून बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण बांध सिमेटीकरण कराचे, ज्यामुळे कोणत्याही शेतक-यांचे नुकसान न होता, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहवणे शक्य होईल, अशी माहिती शिरजगाव मोझरी प्रशांत कांबळे यांनी दिली.
उशिरा रब्बीच्या पीक पेरणीमुळे शेतकऱ्यांच्या गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो. एकरी उत्पादन जास्त होण्याऐवजी उत्पन्न घटते, त्यामुळे शेतीत गव्हासाठी लागलेली लागत सुद्धा हाती येत नसल्याचे शिरजगाव मोझरीचे शेतकरी प्रमोद मेश्राम यांनी सांगितले.






