अमरावती शहरात त्रिपुरा येथील प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटले. दोन्ही समुदाय भडकले व अमरावती शहरात दंगल झाली. मात्र, दोन्ही सामुदायाला शांत करण्यासाठी व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना यश आलं आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या सातत्याने अधिकारी, पोलीस व नागरिकांसोबत बैठका घेत आहेत.
दोन्ही समुदाय भडकले असतांना त्यांना शांत करण्यात त्या यशस्वी झाल्यात. त्यामुळे, अमरावतीत आता शांतता आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मागील 50 तासापासून मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि रेस्ट हाऊसला बसून इथं बैठका घेत आहे. इथंच जेवण करतेय आणि इथुनच सर्व कामं सुरु आहेत.”
मंत्री ठाकूर पुढे म्हणाल्या की, “माझ्यासाठी कोणताही गट महत्वाचा नाही तर अमरावती महत्वाची आहे. मी कुणाला दोष देणार नाही ज्याला करायचं त्याने केलं. हे सर्व पुर्वपदावर आणण्यासाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. भाजपच्या माजी आमदारांना भेटले. काही मुस्लीम वस्त्यांमध्ये गेलो. दोनही बाजूचे लोक भडकलेले होते. सर्वांना शांत केलं. कारणं आम्हाला अमरावतीला एक औद्योगीक शहर बनवायचं आहे. आणि त्याला कुठतरी ठेच लागलेय.” अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सध्या अमरावतीत दोन दिवसांपासून सर्वत्र शांतता आहे. त्यामुळे लवकरच सर्व पूर्वपदावर येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.