महाराष्ट्र हादरला! प्रेमाला अडसर ठरत असलेल्या पत्नीला जवानाने दिलं विषारी इंजेक्शन; पाच जणांना ठोकल्या बेड्या
धुळे तालुक्यातील वलवाडी गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका जवानाने आपल्या कॉलेज गर्लफ्रेंडसाठी पत्नीला विषारी इंजेक्शन देऊन हत्या केली आहे. या घटनेमुळे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. कपिल बागुल असं या जवानाचं नाव असून पश्चिम देवपूर पोलिसांना त्यांच्यासह प्रेयसी, सासू, सासरे आणि नणंद अशा पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लाचखोर संशयित प्रशांत राठी रुग्णालयातून फरार; ACB ची घरावर छापेमारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्यात जवान असलेल्या कपिल बाळू बागुल याचे प्रज्ञा कर्डिले या महिलेसोबत कॉलेजपासून प्रेमसंबंध होते. त्यातच अलिकडे त्याची प्रज्ञासोबत जवळीक वाढली होती. त्यावरून कपिल बागुल आणि त्याची पत्नी शारदा यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे त्याने यात अडसर ठरत असलेल्या पत्नीचा काटा काढायचं ठरवलं आणि बळजबरीनं पेस्टीसाईडचं इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर शारदा अक्षरश: तडफडत होती. मात्र कपिलला थोडीसुद्धी तिची कीव आलीन नाही. त्याच्या डोळ्यादेखद शारदाचा तडफडून मृत्यू झाला.
त्याचवेळी नातेवाईकांचा फोन आला. त्याने शारदा आजारी पडली आणि अर्ध्या तासात मृत्यू झाल्याचं सांगितलं. बातमी ऐकून नातेवाईकांनी तिच्या घरी धाव घेतली. या दरम्यान कपिलने तिला हॉस्पिटलमध्ये नेल्याचं नाटक केलं. तसंच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर कुटुंबियांना संशय आला. त्यामुळे नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला.
शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका, शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप; दाम्पत्याला ठोकल्या बेड्या
मयत महिलेचा भाऊ भूषण महाजन याने यासंदर्भात फिर्यात दिली आहे. पती कपिल बाळू बागुल, सासरे बाळू बुधा बागुल, सासू विजया बागुल, नणंद रंजना धनेश माळी, आणि प्रेयसी प्रज्ञा कर्डीले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्री या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली.