मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Scam) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे चौकशीसाठी ईडीच्या (ED) ताब्यात आहेत. संजय राऊत सध्या ऑर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) असून त्यांची भेट घेण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) इच्छुक होते. मात्र, आर्थर रोड कारागृह प्रशासनाने ठाकरेंना परवानगी नाकारली. मात्र, त्यांचे भाऊ सुनील राऊत (Sunil Raut) यांनी सदर वृत्त फेटाळले.
ऑर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संजय राऊत यांची भेट घेण्यास उद्धव ठाकरे इच्छुक होते. पण, तुरुंग प्रशासनाने परवानगी नाकारली. उद्धव ठाकरेंना भेटीसाठी कोर्टाची परवानगी घेण्याचे निर्देश आर्थर रोड कारागृह प्रशासनाने दिले आहेत.
कारागृह अधिक्षकांच्या कार्यालयात संजय राऊत यांना भेटायला द्यावे असा निरोप उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑर्थर रोड कार्यालयाला पाठवण्यात आला होता. मात्र, यावर ऑर्थर रोड कारागृह प्रशासनाने नकार देत, अशी भेट घेता येणार नाही. त्यासाठी कोर्टाची परवानगी घेऊन या, असा निरोप दिला.