संग्रहित फोटो
नाशिक : राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शिक्षक दिनाच्या दिवशीच राज्यातील हजारो शिक्षक संपावर (Teachers on Strike) जावून आंदोलन करणार आहेत. काळ्या फिती लावून हे आंदोलन करणार आहेत. एका दिवसावर शिक्षक दिन (Teachers Day) आलेला आहे. परंतु, पेन्शन आणि शिक्षकांची रिक्त पदे याबाबत अद्यापही अंमलबजावणी नाही. मुख्यमंत्र्यांनी केवळ आश्वासन दिले. अंमलबजावणी केलेली नाही. म्हणून राज्यात शिक्षकांकडून ठिकठिकाणी शाळा महाविद्यालयात कामबंद आंदोलन होणार आहे.
चार महिन्यांपूर्वी शिक्षक आणि शासकीय कर्मचारी, निम्नशासकीय कर्मचारी यांनी पेन्शनकरिता जोरदार आंदोलन केले. त्याचा फटका महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयापासून तर गावांच्या कार्यालयालादेखील राज्यात शिक्षकदिनी साठ हजार शिक्षक एल्गार करणार आहेत. शिक्षकांच्या पेन्शनपासून अनेक मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. शासनाने आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन आम्ही करणार आहोत. बारावी परीक्षेच्या वेळी आम्ही केलेला बहिष्कार मागे घ्यायला लावला होता. मागण्या पूर्ण करू, असे म्हटले होते. परंतु, त्याच्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही.
विद्यार्थी तांत्रिक शिक्षणापासून वंचितः माहिती आणि तंत्रज्ञान हा विषय आता इयत्ता पहिलीपासून सर्व शाळांमध्ये शिकवला जातो. यासंदर्भात शासनाने मान्य केल्यानंतरदेखील आयटी या विषयांमध्ये हजारो शिक्षकांची गरज असताना अद्यापही शासनाने अनुदानित शिक्षकांची भरतीच केलेली नाही. त्यामुळे हजारो शाळांमधील हे पद भरले गेले नाहीत. शिक्षकांच्या मागण्याबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला.






