राज ठाकरेंनी तो व्हिडीओ सुरू करताच एकच शांतता...; शिवाजी पार्कच्या सभेत नेमकं काय झालं?
Iran Protest : इराणमध्ये रक्ताचा सडा! 500 हून अधिक आंदोलकांचा बळी, खामेनेई सरकारविरोधात जनक्षोभ
शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पण राज ठाकरेंनी भाषणाच्या सुरूवातीलाच भाजपच्या (BJP) वर्मावर घाव घातला. राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकार उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर किती मेहरबान असल्याकडे लक्ष वेधले. राज ठाकरे यांनी एक व्हिडीओचे सादरीकरण करत २०१४ ते २०२५ या कालावधीत मुंबईसह देशभरात सरकारकडून अदानी समूहाला सिमेंट, कोळशा, खाणी प्रकल्पांपासून पोर्ट बंदरांपर्यतचे प्रकल्प देण्यात आले, अदानी समुहाला मोठ्या प्रमाणात जमिनी कशा प्रकारे देण्यात आल्या, याचा तपशीलवार व्हिडीओ सादर केला. हा व्हिडीओमुळे ठाकरे बंधुं पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्याचे दिसून आले. महत्त्वाची बाब म्हणजे, व्हिडीओ सादर करण्यापूर्वी त्यांनी मुंबईतील मराठी माणसाला जागृत राहण्याचे आणि राज्य सरकारच्या गैरकारभाराकडेही लक्ष वेधले. Thackeray Brothers Alliance)
विशेष म्हणजे यापूर्वी अनेक सभांमध्ये व्हिडीओ सादर करून विरोधकांची पोलखोल करण्याची राज ठाकरेंची स्टाईल नवी नाही, पण कालच्या सभेत दाखलेल्या व्हिडीओमुळे उपस्थित श्रोत्यांवर मोठा प्रभाव पडल्याचे दिसून आले. राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडीओतून २०१४ ते २०२५ या काळातअदानी समुहाचे साम्राज्य कशाप्रकारे वाढत गेले, हे निदर्शनास आणून दिले. सभेत दाखवण्यात आलेल्या व्हिडीओला धीरगंभीर पार्श्वसंगीत असल्याने तो उपस्थितांवर खोल परिणाम करणारा ठरला. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबई आणि राज्यातील विविध भागांत अदानी समूहाला कशा पद्धतीने जमिनी व प्रकल्प देण्यात आले, याची सविस्तर यादी एकामागोमाग एक वाचून दाखवली. राज ठाकरे यांचे भाषण सुरू असताना शिवाजी पार्कमध्ये जमलेला हजारोंचा जनसमुदाय पूर्णपणे एकाग्र होऊन ऐकत होता. या वेळी संपूर्ण परिसरात अक्षरशः चिडीचूप शांतता पसरली होती, ज्यातून सभेची गंभीरता आणि उपस्थितांवरील प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता.
Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल
Raj Thackeray speech: मुंबई गुजरातमध्ये विलीन करण्याचे प्रयत्न
राज ठाकरें मुंबईकरांना आणखी एका धोक्याची जाणीव करून दिली. राज्य सरकारसह केंद्र सरकारकडून मुंबईवर कब्जा करण्यासाठी मोठी प्लॅनिंग सुरू असल्याचे सांगितले. मुंबईवर कब्जा करण्यासाठी सुरूवात बुलेट ट्रेनपासून झाली. वाढवण बंदर हे गुजरातजवळ आहे. बुलेट ट्रेनचे शेवटचे स्टेशन गुजरातमध्ये आहे. स्टेशनपासून काही किलोमीटर अंतरावर गुजरात मुंबईच्या दिडपट मोठे असलेले शहर वसवण्याचे काम करत आहे. मुंबई गुजरातला मिळवण्यासाठी पालघर, ठाणे या दोन जिल्हे महत्त्वाचे आहेत. गुजरातमधून मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक इथे येतील त्यांचे मतदारसंघ बनवले जात आहेत. खासदारापासून नगरसेवक अशा सर्व ठिकाणी त्यांना आपली बसवून मुंबई हस्तगत करायची आहे. त्यासाठी मुंबई महापालिका ही सर्वात मोठी चावी आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
गेल्या काही वर्षांत अदानी समूह ज्या पद्धतीने पसरत आहे, वीज क्षेत्र असू दे, बंदर असू दे, विमानतळ असू दे, राज्यात जवळपास प्रत्येक क्षेत्र अदानी समूहाच्या हातात दिलं जात आहे… आज मराठी म्हणून आपण या एका उद्योग समूहाच्या विस्ताराकडे गांभीर्याने बघितलं नाही तर या राज्यातील इंच आणि… pic.twitter.com/uiYpdBoKLr — Raj Thackeray (@RajThackeray) January 11, 2026






