अथर्व सुदामे हिंदू मुस्लिम ऐक्याच्या रील वाद निर्माण झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
Atharva Sudame reel controversy : पुणे : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुफान लोकप्रिय असलेला रिलस्टार अथर्व सुदामे हा जोरदार चर्चेमध्ये आला आहे. मराठमोळा एन्फ्लुएन्सर असलेला अथर्व सुदामे हा त्याच्या रिल्समुळे नेहमी चर्चेत असतो. समाजातील विविध विषयांवर आणि मराठी संस्कृतीवर अथर्व सुदामे व्हिडिओ बनवत असतो. यापूर्वी देखील त्याने अनेकदा संवेदनशील विषय हाताळले आहेत. मात्र यावेळी गणेशोत्सवापूर्वी अथर्व सुदामे याने बनवलेल्या व्हिडिओला रोष सहन करावा लागला आहे.
आपल्या रिल्समधून हसवणाऱ्या अथर्व सुदामेने यावेळी गणेशोत्सावाच्या निमित्ताने व्हिडिओ शेअर केली होती. यामध्ये त्याने हिंदू मुस्लीम ऐक्याचा विषय हाताळत व्हिडिओ तयार केली होता. मात्र त्यावर काही लोकांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्याने हा व्हिडीओ डिलिट केला आहे. लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे अथर्वने व्हिडिओ जारी करत माफीही मागितली आहे. अथर्व सुदामे याने या प्रकरणी माफी मागितली असली तरी काही लोकांनी त्याला पाठिंबादेखील दिला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अथर्व सुदामे याच्या व्हिडिओवरुन समाजातील काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हिंदू मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्यात आला होता. यामध्ये होते की, सुदामे स्वत: एका दुकानात गणेशमुर्ती खरेदी करण्यासाठी गेलेला दिसतोय. तिथे त्याने गणेशमुर्तीची किंमत ठरवून ती घेऊन जाणार असतो तेवढ्यात मूर्तीकाराचा मुस्लीम मुलगा त्याला जेवणाचा डबा द्यायला येतो. यावरुन मुर्तीकार मुस्लीम असल्याचे अथर्व सुदामेला दिसते. त्यानंतर मूर्तीकार आपला धर्म समजल्यामुळे तुम्हाला माझ्याकडून मूर्ती खरेदी करायची नसेल तर समोरही एक दुकान आहे, तिथून तुम्ही मूर्ती घेऊ शकता, असे सांगतो.
यावर अथर्व सुदामे म्हणतो गणपती घडवताना तुमच्या मनात चांगलेच भाव होते ना? माझे बाबा म्हणतात की आपण साखर व्हावं साखर शेवयांची खीरही गोड करते आणि शिरखुरमाही गोड बनवते. आपण वीट व्हावं जी मंदीर तसेच मशीद उभारण्यासाठी कामी येते. आपण फुल व्हावी जे हारातही वापरले जाते आणि चादर अर्पण करण्यासाठी वापरले जाते, असे म्हणताना दिसतोय. या व्हिडीओच्या माध्यमातून गणेशोत्सवामध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र काही लोकांना त्याची ही व्हिडिओ आवडली नसल्यामुळे वाद निर्माण झाला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अथर्वच्या व्हिडिओवर ब्राम्हण महासंघाने देखील आक्षेप घेतला. या व्हिडीओवर काही लोकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सुदामेने हा व्हिडीओ डिलीट केला आहे. त्याने गेल्या अनेक वर्षांपासून मी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडीओ तयार करतो. या व्हिडीओच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता, अशा शब्दांत अथर्व सुदामे याने माफी मागितली आहे. अथर्व सुदामे याने माफी मागितली असली तरी अनेकांनी सुदामेला पाठिंबा दिला आहे. त्याच्या व्हिडिओमध्ये काहीही आक्षेपार्ह नसल्याचे मत मांडले आहे.