पुणे : बुधवारी पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat Passed Away) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. गिरीश बापट हे 1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती. दरम्यान, बापटांच्या निधनानंतर कसब्यानंतर आता पुण्यात लोकसभेचीही पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळाच चर्चा रंगत असताना, आज “गिरीश बापट यांना जाऊन 3 दिवस झालेत, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा”, असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना लगावला आहे.
राजकीय वर्तुळाच चर्चा…
दरम्यान, गिरीश बापट यांना जाऊन तीन दिवसही तास होत नाहीत, तोवर त्यांच्या रिक्त जागी पोटनिवडणूक होणार का? यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. मागील महिन्यात कसबा व चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. यात भाजपाच्या बालेकिल्ला असलेल्या कसब्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तर चिंचवडमध्ये चुरशीचा सामना झाला. दरम्यान, गिरीश बापट यांच्या मृत्यूला काही तास उलटत नाहीत, तोच मात्र त्यांच्या जागी लोकसभेची पोटनिवडणूक होणार का, यावर चर्चा रंगत आहे. यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहे. तसेच उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय, तर उमेदवारीवरुन देण्यावरुन वरिष्ठांमध्ये खलबतं सुरु असल्याचं समजते.
गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना जाऊन 3 दिवसच झाले आहेत. एवढी काय घाई आहे, माणूसकी आहे कि नाही, महाराष्ट्राची काही परंपरा आहे की नाही. लोक म्हणतील यांना थोडी तरी जनाची मनाची लाज आहे कि नाही. अजित पवार म्हणाले, गिरीश बापट यांच्या मृत्यूनंतर पुण्यात लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होत आहेत. यावर अजित पवार संतापले, कोणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही, असं म्हणत चर्चा करणाऱ्यांता त्यांनी समाचार घेतला.