शिक्रापूर : पाबळ (ता.शिरुर) येथे रिक्षामध्ये प्रवासी बसू न दिल्याचा जाब विचारल्याच्या वादातून एका रिक्षाचालकाला (Beaten to Auto Driver) मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रिक्षाचालकाने शिक्रापूर (Shikrapur Crime) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, योगेश उर्फ आप्पा चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पाबळ येथे सणसवाडी येथील संजय दरेकर हे रिक्षा घेऊन गेलेले असताना सदर ठिकाणी असलेला योगेश चौधरी हा दरेकर यांच्या रिक्षात प्रवाशांना बसू देत नव्हता. त्यामुळे दरेकर यांनी चौधरी याला जाब विचारला असता चौधरी याने दरेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जखमी केले.
याबाबत संजय विनायक दरेकर (वय ४२ वर्षे रा. खंडोबा आळी, सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी योगेश उर्फ आप्पा चौधरी (रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.