मुंबई : मुंबईकरांना सेवा देणारी बेस्ट कामागारांच्या बाबतीत मात्र उदासीन दिसून येते. बेस्ट कडून तिकीट मशीन नादुरुस्त झाल्यास त्यासाठी वाहकाला जबाबदार धरून त्याच्याकडून याचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे परिपत्रक बेस्ट कडून जाहीर करण्यात आले. यात मशीन मागील कव्हर साठी १५८२ बॅटरी कव्हरसाठी ११०५, बॅटरी २२१४, थर्मल प्रिंटर १८०३, एलइडी कव्हर ४७३७, मेन बोर्ड ८४३८ रुपये, वायफाय अँटीना ब्रॅकेट ९६० तर पेपर फ्लॅप ९६० अशी किमत वसूल करण्यात येणार असल्याचे पत्रक बेस्ट प्रशासनाने काढल्यावर . बेस्ट वर्कर्स युनियनकडून कर्मचाऱ्यांना होणार्या या भूर्दंडाविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली.
या निर्णयाविरोधात वडाळा आगारात कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. बेस्ट वर्कर्स युनियनच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले असून यात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात निदर्शने केली.
अशा निर्णयामुळे बेस्ट कामगारांच्या खिशात हात घालून पैसे काढत आहे असे वाटते. आज केवळ निदर्शने देउन आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या बैठकीत बेस्ट प्रशासनाकडे आम्ही हा अन्याय कारक निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यासाठी आम्ही दिवाळी पर्यत वाट पाहू अन्यथा दिवाळीनंतर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.