सौजन्य - सोशल मिडीया
संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघात घडल्यानंतर लगेच स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनीदेखील बचावासाठी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार संजना जाधव या बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांच्यासह तालुक्यातील बनोटी सर्कल मधील वरठाण येथे जात होत्या. रांजणगाव फाट्यावर समोरुन आलेल्या पिकअप (एम.एच.४२ बी.एफ.०६१३ ) ने चालकाच्या बाजूला जोराची धडक दिली. सुदैवाने या अपघातात संजना जाधव, चालक आणि इतर कार्यकर्ते थोडक्यात बचावले आहे.
दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी माजी आमदार नितीन पाटील यांच्या गाडीचा छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना वेरूळजवळ आपघात झाला होता. यात एक म्हैस ठार झाली होती.